मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

अपहरण करून बाळाला परराज्यात विकलं; 48 तासांत मुंबई पोलिसांनी घडवली मायलेकराची भेट

अपहरण करून बाळाला परराज्यात विकलं; 48 तासांत मुंबई पोलिसांनी घडवली मायलेकराची भेट

Crime in Mumbai: 10 महिन्यांच्या चिमुकल्याचं अपहरण करून त्याला तामिळनाडूत विकल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत उघडकीस आली आहे.

Crime in Mumbai: 10 महिन्यांच्या चिमुकल्याचं अपहरण करून त्याला तामिळनाडूत विकल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत उघडकीस आली आहे.

Crime in Mumbai: 10 महिन्यांच्या चिमुकल्याचं अपहरण करून त्याला तामिळनाडूत विकल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत उघडकीस आली आहे.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 04 सप्टेंबर: 10 महिन्यांच्या चिमुकल्याचं अपहरण करून त्याला तामिळनाडूत विकल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत उघडकीस आली आहे. फिर्यादी महिला आपल्या बाळाला घेऊन रस्त्याच्या कडेला आडोशाला झोपली होती. दरम्यान आरोपीनं तिच्या 10 महिन्यांच्या बाळाचं अपहरण करून त्याला तामिळनाडूत विकलं आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर अवघ्या 48 तासांत मुंबई पोलिसांनी आरोपींच्या तावडीतून चिमुकल्याची सुटका करत मायलेकराची भेट घडवली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहे.

संबंधित फिर्यादी महिलेचं नाव मुमताज (वय- 40) त्या नालासोपारा परिसरात वास्तव्याला आहेत. काही दिवसांपूर्वी त्या आपल्या दोन्ही मुलांना घेऊन भावाकडे माहीम याठिकाणी राहायला आल्या होत्या. दरम्यान 1 सप्टेंबर रोजी फिर्यादी मुमताज यांचा आपल्या भावासोबत घरगुती कारणातून कलह झाला होता. त्यामुळे मुमताज आपल्या मुलांना घेऊन रागाच्या भरात घराबाहेर पडल्या होत्या. घरातून बाहेर पडल्यानंतर त्या माहिम परिसरातील एका रस्त्याच्या कडेला आडोशाला आपल्या बाळाला घेऊन झोपल्या होत्या.

हेही वाचा-...मग डोक्यात एकच घाव कसा? जन्मदात्याच्या हत्येच्या प्रकरणात मुलाचं फुटलं बिंग

घटनेच्या रात्री तिघंही झोपी गेले असता, आरोपीनं गुपचूप 10 महिन्याच्या बाळाचं अपहरण केलं. यानंतर मुमताज यांनी तातडीनं बांद्रा पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच फरहाना शेख हिच्यावर आपल्याला संशय असल्याचंही मुमताज यांनी पोलिसांना सांगितलं. कारण संबंधित महिलेनं फिर्यादीला आणि तिच्या बाळाला जेवण आणून दिलं होतं. तसेच बाळाला मला देशील का? असंही विचारलं होतं. यानंतर पोलिसांनी आरोपी महिलेचं स्केच बनवून आपल्या सूत्रांकडे पाठवलं. त्यानंतर संबंधित महिला बांद्रा येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांना समजली.

हेही वाचा-चहा मागितल्यानं सासूला जबरी शिक्षा; बुलडाण्यातील सुनेचं अमानुष कृत्य आलं समोर

यानंतर पोलिसांनी सापळा रचून आरोपीला महिलेला माहिम दर्गा परिसरातून अटक केली. तसेच आरोपी महिलेनं संबंधित बाळाला परंदाम गुंडेती नावाच्या व्यक्तीला दिलं असून तो खार दर्गा परिसरात वास्तव्याला असल्याचं सांगितलं. यानंतर पोलिसांनी तातडीनं चक्र फिरवत त्यालाही अटक केली आहे. गुंडेतीला अटक केली असता, त्यानं बाळाला तामिळनाडूत विकलं असल्याचं सांगितलं. यानंतर आरोपी गुंडेतीला घेऊन मुंबई पोलिसांचं पथक तामिळनाडूला रवाना झालं. येथून पोलिसांनी नाक्का राजू नरसिम्हा (35) आणि विशिरिकाप्ल्या धर्मराव (50) अशा दोघांना अटक केली.

हेही वाचा-गळा दाबून गर्भवती पत्नीच्या पोटावर मारली लाथ; मुंबईतील फौजदाराचं धक्कादायक कृत्य

आरोपी धर्मराव हा सरकारी नोकर असून त्याला मुलबाळं नाही. त्यामुळे त्याने काही दिवसांपूर्वी नरसिम्हाकडे बाळ मिळेल का अशी मागणी केली होती. तेव्हा आरोपी नरसिम्हानं आरोपी फरहाना शेख आणि आरोपी परंदाम गुंडेती यांची ओळख करुन दिली होती. याप्रकरणी न्यायालयानं आरोपी शेखला 8 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहेत. तर अन्य तीन आरोपींना आज शनिवारी न्यायालयात हजर केलं जाणार आहे. मुंबई पोलिसांच्या सतर्कतेमुळे अवघ्या 48 तासांत परराज्यात विकलेल्या चिमुकल्याला परत आणणं शक्य झालं आहे.

First published:

Tags: Baby kidnap, Crime news, Mumbai