मुंबई, 15 फेब्रुवारी : झोमॅटोच्या (Zomato) स्टॉकमध्ये घसरण सुरूच आहे. बीएसईमध्ये आज इंट्राडे ट्रेडिंगमध्ये शेअर 6 टक्क्यांनी घसरून 75 रुपये प्रति शेअर झाला. या स्टॉकची IPO इश्यू किंमत 76 रुपये होती. गेल्या 5 ट्रेडिंग सत्रांमध्ये हा स्टॉक सुमारे 18 टक्क्यांनी घसरला आहे. त्याच वेळी, हा स्टॉक सुमारे 1 महिन्यात 41 टक्क्यांनी घसरला आहे. जगभरातील टेक शेअर्समध्ये झालेल्या घसरणीचा परिणाम या शेअरवर दिसून आला आहे. फूड डिस्ट्रिब्युशन कंपनीच्या शेअर्समध्ये मात्र थोडी रिकव्हरी झाली आहे. सध्या झोमॅटोचे शेअर्स बीएसईवर 6.31 टक्क्यांनी घसरून 77.20 रुपयांवर व्यवहार करत आहेत. जानेवारीत मोठी घसरण जानेवारीच्या अखेरीस झोमॅटोच्या शेअरच्या किमतीत मोठी घसरण झाली. जानेवारीच्या शेवटी हा स्टॉक 50 टक्क्यांहून अधिक घसरला होता. यानंतर शेअर प्रथमच 100 रुपयांपर्यंत खाली आला होता. शेअर बाजारातील या खराब कामगिरीमुळे कंपनीच्या मार्केट कॅपला मोठा फटका बसला आणि गेल्या महिन्यात तो प्रथमच एक लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आला. सध्या कंपनीची मार्केट कॅप 65 हजार कोटी रुपयांपेक्षा कमी झाला आहे. Paytm च्या शेअर नीच्चांकी पातळीवर, विजय शेखर शर्मांच्या संपत्तीत मोठी घट तज्ज्ञांचे काय म्हणणे आहे? GCL सिक्युरिटीजचे रवी सिंघल यांनी सांगितले की, या स्टॉकमध्ये आणखी घसरण दिसू शकते आणि तो 65.70 रुपयांच्या पातळीवर जाऊ शकतो. अनलॉकिंग अॅक्टिव्हिटी सुरू झाल्यामुळे या स्टॉकमध्ये वाढ होईल अशी अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत ज्या लोकांना लाँग टर्मसाठी गुंतवणूक करायची आहे, ते या स्टॉकमध्ये 65.70 रुपयांच्या आसपास आल्यावर हळूहळू खरेदी सुरू करू शकतात. LIC IPO : तुम्हीही एलआयसी आयपीओची वाट पाहताय? काय असेल इश्यू प्राईज? वाचा डिटेल्स ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत झोमॅटोचा महसूल तिमाही आधारावर 82.7 टक्क्यांनी वाढून 1,112 कोटी रुपये झाला, जो सप्टेंबर तिमाहीत 609.4 कोटी रुपये होता. दुसरीकडे, कंपनीच्या समायोजित महसुलात वार्षिक आधारावर 78 टक्क्यांनी वाढून 1420 कोटी रुपये झाली, तर तिमाही आधारावर तीच राहिली. Zomato चे ग्रॉस ऑर्डर व्हॅल्यू (GOV) डिसेंबर तिमाहीत वार्षिक 84.5 टक्के आणि तिमाही दर तिमाही 1.7 टक्क्यांनी वाढून 5,500 कोटी रुपये झाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.