जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Paytm च्या शेअर नीच्चांकी पातळीवर, विजय शेखर शर्मांच्या संपत्तीत मोठी घट

Paytm च्या शेअर नीच्चांकी पातळीवर, विजय शेखर शर्मांच्या संपत्तीत मोठी घट

Paytm च्या शेअर नीच्चांकी पातळीवर, विजय शेखर शर्मांच्या संपत्तीत मोठी घट

पेटीएमच्या लिस्टनंतर (Paytm Listing Price) विजय शेखर शर्मा यांच्या शेअर्सचे मूल्य गेल्या तीन महिन्यांत 1.5 अब्ज डॉलरने घसरले आहे. पेटीएम शेअर लिस्ट झाल्यापासून शर्मा यांना दररोज 128 कोटी रुपयांचे नुकसान होत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 15 फेब्रुवारी : पेटीएमचे (Paytm) संस्थापक विजय शेखर शर्मा (Vijay Shekhar Sharma) यांच्या कंपनीतील भागभांडवल 1 बिलियन डॉलरच्या खाली आले आहे. लिस्टिंग झाल्यापासून पेटीएमचे शेअर्स सतत घसरत आहेत, त्यामुळे विजय शेखर यांच्या शेअर्सचे मूल्य घसरले आहे. Paytm ची मूळ कंपनी One97 Communications आहे. 15 फेब्रुवारी रोजी, त्याचे शेअर्स BSE वर 2.77 टक्क्यांनी घसरून 840.05 रुपयांच्या विक्रमी नीचांकी पातळीवर आले. पेटीएमच्या लिस्टनंतर (Paytm Listing Price) विजय शेखर शर्मा यांच्या शेअर्सचे मूल्य गेल्या तीन महिन्यांत 1.5 अब्ज डॉलरने घसरले आहे. पेटीएम शेअर लिस्ट झाल्यापासून शर्मा यांना दररोज 128 कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. विजय शेखर शर्मा यांचा पेटीएममधील स्टेक सध्या 99.80 कोटी डॉलर एवढा आहे. गेल्या तीन महिन्यांत 1.59 अब्ज डॉलरचे नुकसान झाले आहे. फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीनुसार, विजय शेखर शर्मा यांची संपत्ती सध्या 1.3 अब्ज डॉलर आहे. LIC IPO : तुम्हीही एलआयसी आयपीओची वाट पाहताय? काय असेल इश्यू प्राईज? वाचा डिटेल्स कंपनीच्या प्रवक्त्यांनुसार, विजय शेखर शर्मा यांच्याकडे डिसेंबर तिमाहीत One97 कम्युनिकेशन्समध्ये 5.76 कोटी शेअर्स, किंवा सुमारे 8.9 टक्के हिस्सा होता. याशिवाय अॅक्सिस ट्रस्टी सर्व्हिसेसकडे 3.09 कोटी किंवा 4.8 टक्के शेअर्स आहेत. अॅक्सिस ट्रस्टीने हे शेअर्स केवळ शर्मा यांच्यासाठी खरेदी केले आहेत. Rakesh Jhunjhunwala यांना 10 मिनिटात 186 कोटींचा नफा, टाटाच्या ‘या’ दोन शेअर्सची कमाल 18 नोव्हेंबर 2021 रोजी स्टॉक मार्केटमध्ये लिस्टिंग झाल्यापासून, Paytm चे शेअर्स आतापर्यंत 63 टक्क्यांनी घसरले आहेत. 2150 रुपयांच्या इश्यू किंमतीवर, विजय शेखर शर्मा यांचे स्टेक व्हॅल्यू 2.58 अब्ज डॉलर होते. आता ते 99.80 कोटी डॉलरवर आले आहे. पेटीएमच्या कमी वॅल्युएशनमुळे गुंतवणूकदारांचे सुमारे 85,000 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात