मुंबई, 15 फेब्रुवारी : बहुतेक गुंतवणूकदार देशातील सर्वात मोठ्या IPO च्या प्रतीक्षेत आहेत. विशेषतः किरकोळ गुंतवणूकदार देशातील सर्वात मोठ्या विमा कंपनी म्हणजेच LIC च्या IPO ची आतुरतेने वाट पाहत आहेत. हा IPO लवकरच बाजारात दाखल होणार आहे. कंपनीने सेबीकडे इश्यूसाठी अर्ज (DRHP) सादर केला आहे. मार्चमध्ये हा आयपीओ येण्याची शक्यता आहे. LIC IPO मध्ये, LIC पॉलिसी धारकांसाठी 10 टक्के हिस्सा राखीव असेल. तसेच, त्यांना काही स्वस्त दरात शेअर्स मिळू शकतात. यामुळे, या IPO बद्दल आणखीनच उत्सुकता आहे. मात्र, यावेळी भारतीय शेअर बाजारात कमजोरी दिसून येत आहे. एलआयसीचे वॅल्युएशन डॉक्युमेंट्सनुसार, कंपनीची एम्बेडेड वॅल्यू 5.39 लाख कोटी रुपये आहे. सध्या लिस्टेड खाजगी विमा कंपन्या त्यांच्या एम्बेडेड मूल्याच्या 3-4 पटीने व्यापार करत आहेत. एलआयसीचा इश्यू साईज आणि मार्केटमध्ये 66 टक्के मजबूत पकड असल्याने, नवीन व्यवसाय प्रीमियम असूनही, त्याची वाढ खाजगी विमा कंपन्यांसारखी नाही. Rakesh Jhunjhunwala यांना 10 मिनिटात 186 कोटींचा नफा, टाटाच्या ‘या’ दोन शेअर्सची कमाल IPO 53,500 कोटी ते 93,625 कोटींचा असू शकतो जर आपण LIC चे एम्बेडेड वॅल्यू 2-3.5 पटीने गुणाकार केले तर ते 10.7 लाख कोटी ते 18.7 लाख कोटी आहे. 632 कोटी शेअर्सच्या एकूण इक्विटी कॅपिटलवर आधारित, जर आपण 5 टक्के इश्यूवर नजर टाकली तर LIC चा IPO 53,500 कोटी ते 93,625 कोटी रुपयांच्या दरम्यान असू शकतो. त्यानुसार, एलआयसीची इश्यू किंमत 1963-2961 रुपयांच्या दरम्यान असू शकते. त्या तुलनेत, सरकारसाठी शेअर अधिग्रहण खर्च 0.16 रुपये प्रति शेअर आहे. हा इश्यू आणण्यापूर्वी एलआयसीमध्ये कॅपिटल रिस्ट्रक्चरिंग करण्यात आली होती. एलआयसी सुरू झाली तेव्हा त्याचे सुरुवातीचे कॅपिटल 100 कोटी रुपये होते. LIC ही त्यावेळची प्रीमियम गोळा करणारी कंपनी होती, त्यामुळे तिचे शेअर्स इतर कोणालाही वाटले गेले नाहीत. हा इश्यू आणण्यापूर्वी, सरकारने एलआयसीचे कॉर्पोरेशनमधून कॉर्पोरेटमध्ये रूपांतर करण्यासाठी 100 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती आणि 10 रुपये फेस वॅल्यूचे शेअर सरकारला वाटप करण्यात आले होते. एअर इंडियाचे नवीन CEO इल्कर आयची यांच्याविषयी वाचून व्हाल थक्क! पॅन लिंक करणे आवश्यक आहे जर LIC पॉलिसीधारकांना आयपीओसाठी अर्ज करायचा असेल, तर एलआयसीच्या वेबसाइटनुसार, त्यांना प्रथम एलआयसीच्या साइटवर त्यांचा पॅन अपडेट करावा लागेल. एलआयसीने सार्वजनिक नोटीसमध्ये म्हटले आहे की, “आयपीओमध्ये सहभागी होण्यासाठी, पॉलिसीधारकांना कंपनीच्या रेकॉर्डमध्ये त्यांचा पॅन बरोबर असल्याची खात्री करावी लागेल. तसेच, हे नमूद करणे महत्त्वाचे आहे की भारतातील कोणत्याही IPO मध्ये सहभागी होण्यासाठी गुंतवणूकदाराचे डिमॅट खाते असणे अनिवार्य आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.