नवी दिल्ली, 18 मे: Zomato हे भारतातील पहिले ऑनलाइन फूड आणि ग्रोसरी डिलिव्हरी अॅप बनले आहे. जे त्याच्या काही यूझर्सना UPI सेवा देते. Zomato ने UPI सर्व्हिस देण्यासाठी ICICI बँकेसोबत पार्टनरशिप केली आहे. यासह, Zomato त्याच्या यूझर्ससाठी युनिफाइड पेमेंट्स इंटरफेससाठी थर्ड पार्टी अॅप्लिकेशन प्रोव्हायडरच्या रुपात लाइव्ह झाले आहे.
Zomato यूझर्स अॅपवर नवीन UPI ID तयार करण्यासाठी साइन अप करू शकतात. म्हणजेच ते Zomato अॅपवर राहून UPI पेमेंट करू शकतील आणि पेमेंट करण्यासाठी त्यांना Paytm, Google Pay आणि PhonePe किंवा Paytm सारख्या इतर UPI अॅपवर रीडायरेक्ट करण्याची गरज नाही.
एका युनिटमध्ये सर्व खोल्या थंड, असं काम करतं सेंट्रलाइज्ड AC; मात्र घरात बसवणं किती योग्य?याप्रमाणे Zomato UPI अॅक्टिवेट करा
-तुमच्या डिव्हाइसवर Zomato अॅप ओपन करा. -तुमच्या Zomato अकाउंटच्या प्रोफाइल सेक्शनवर क्लिक करा. -जोपर्यंत तुम्हाला Zomato UPI चा ऑप्शन सापडत नाही तोपर्यंत खाली स्क्रोल करा. -Activate Zomato UPI वर क्लिक करा. -तुमचा पसंतीचा Zomato UPI आयडी निवडा. (******@zoicici) -तुमचा मोबाईल नंबर निवडा. -तुमचे बँक अकाउंट मोबाईल नंबरसोबत लिंक करा.
होम लोन अकाउंट लवकरात लवकर बंद करायचंय? ट्राय करा या स्मार्ट ट्रिक्स्Zomato वर पेमेंट करणं होईल सोपं
Zomato UPI च्या सुरुवातीसह तुम्ही आता तुमच्या झोमॅटो UPI द्वारे तुमच्या जेवणाची बिले तुम्ही सहज भरू शकता. हे अतिरिक्त चरणांची किंवा भिन्न पेमेंट अॅप्समध्ये स्विच करण्याची आवश्यकता दूर करेल. यामुळे झोमॅटो यूझर्ससाठी पेमेंट प्रोसेस अधिक सोपं होईल.