नवी दिल्ली, 17 मे : लोक अनेकदा त्यांच्या स्वप्नातील घर खरेदी करण्यासाठी होम लोन घेतात. परंतु होम लोनचा दीर्घ कालावधी आणि व्याजामुळे लोकांना ते लवकरात लवकर फेडून टाकायचे असते. यासाठी तुमच्याकडे चार क्लोजर किंवा प्रीपेमेंटचा ऑप्शन असतो. बहुतेक बँका आणि NBFC प्रीपेमेंट सुविधा देतात. पण होम लोन हे दीर्घ मुदतीचे कर्ज असते आणि त्यावर बँका आणि आर्थिक मदत करणाऱ्या कंपन्यांना चांगलं उत्पन्न मिळत असतं. त्यामुळे अनेक कंपन्या प्रीपेमेंटवर काही चार्जही लावतात. मात्र, प्रत्येकाला हे शुल्क भरावे लागणार नाही.
RBI ने रेपो रेट 2.5 टक्क्यांनी वाढवला आहे. त्यानंतर अनेक बँकांनी MCLR मध्ये देखील वाढ केली. ज्याचा थेट परिणाम होम आणि ऑटो लोनवर होतो. जे ग्राहक 1 वर्षापूर्वी होम लोनसाठी 7 टक्के वार्षिक व्याज देत होते, ते आता सुमारे 9.5 टक्के झाले आहे. तुम्हाला तुमचं होम लोन लवकरात लवकर बंद करायचं असेल किंवा त्याचं ओझं कमी करायचं असेल तर या स्मार्ट ट्रिक्स ट्राय करा. गेल्या काही वर्षांत तुमचे उत्पन्न वाढले असेल आणि बचत वाढत असेल. तर तुम्ही कर्जाचा काही भाग प्रीपे करू शकता. यामुळे तुमच्या कर्जाची मूळ रक्कम कमी होईल. त्यासोबतच त्यावरील व्याजाचे दायित्वही देखील कमी होईल. व्याज म्हणून जाणारी रक्कम कमी केल्याने तुमच्यावरील एकूण भार कमी होईल.
तिकिट हरवलं तरीही करु शकता ट्रेनने प्रवास! करा फक्त छोटसं कामप्रीपेमेंटवर लागेल चार्ज
बर्याच बँका सुमारे 2% प्रीपेमेंट चार्ज आकारतात. परंतु प्रत्येकाला हे चार्ज द्यावं लागत नाही. फ्लोटिंग रेटवर कर्ज घेणाऱ्यांना हे चार्ज भरावं लागत नाही. मात्र, गृहकर्ज निश्चित दराने असेल तर त्यावर चार्ज आकारले जाऊ शकते. होम लोन घेणारे अनेक प्रकारे प्रीपेमेंट करू शकतात. तुमचं उत्पन्न वाढलं असेल, तर तुम्ही तुमचा EMI वाढवू शकता. जेणेकरून तुम्ही निश्चित कालावधीपूर्वी कर्जाची परतफेड करू शकाल. इच्छा असल्यास तुम्ही आपण प्रीपेमेंट म्हणून दरवर्षी एक निश्चित रक्कम जमा करू शकता. जर तुम्ही वर्षभर बचत करत असाल किंवा तुम्हाला बोन मिळत असेल तर तुम्ही याचा वापर कर्ज फेडण्यासाठी करु शकता. हे पैसे भरुन तुम्ही होम लोन लवकरात लवकर फेडू शकता.
एका व्यक्तीचे किती बँक अकाउंट असावेत? एका पेक्षा जास्त असतील तर काय होतं?अल्प मुदतीसाठी घ्या कर्ज
याशिवाय, तुम्ही तुमचं लोन कमी करण्यासाठी लोनचा टेन्योर कमी ठेवा. तुम्ही 15 वर्षांच्या ऐवजी 25 किंवा 30 वर्षांसाठी कर्ज घेतले तर तुमचा EMI नक्कीच कमी असेल. परंतु एकूण कर्जावरील व्याज दुप्पट असू शकते. कमी कालावधीचे कर्ज म्हणजे तुम्हाला कमी व्याज द्यावे लागेल. तुम्ही जास्त डाउन पेमेंट देखील करू शकता. डाउन पेमेंट वाढवल्याने तुम्हाला वाढत्या व्याजदरांना तोंड देण्यासाठी तुमच्या होम लोनला स्ट्रक्चर करण्यात मदत होऊ शकते. अडव्हान्सच्या रुपात अधीक पैसे लावल्याने तुमचं होम लोन कमी होईल.