Home /News /money /

Zomato ने Uber Eats ने घेतलं विकत, कर्मचाऱ्यांवर नोकरीची टांगती तलवार

Zomato ने Uber Eats ने घेतलं विकत, कर्मचाऱ्यांवर नोकरीची टांगती तलवार

उबर कंपनी जर एखाद्या क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर नसेल तर ती कंपनी त्या क्षेत्रातून बाहेर पडते, असं उबरचं धोरण आहे. त्यामुळेच उबर इट्स इंडिया ही कंपनी Zomato ला विकण्याचा निर्णय घेतला असावा, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

  नवी दिल्ली, 21 जानेवारी : ऑनलाइन फूड डिलिव्हरीमधली कंपनी Zomato ने उबर ईट्स इंडिया (Uber Eats India)ही कंपनी विकत घेतली आहे. Zomato ने उबर इट्सचा भारतातला बिझनेस सुमारे 35 कोटी डॉलर म्हणजे 2 हजार 485 कोटी रुपयांना विकत घेतला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार 'उबर'कडे फक्त 9.9 टक्के शेअर्स असतील. उबर ईट्स इंडिया ही कंपनी फूड डिलिव्हरीच्या क्षेत्रात फारशी चांगली कामगिरी करत नव्हती. त्यातच प्रतिस्पर्धी असलेली Zomato ही कंपनी विकत घेणार, अशी चर्चा होती. उबर कंपनी जर एखाद्या क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर नसेल तर ती कंपनी त्या क्षेत्रातून बाहेर पडते, असं उबरचं धोरण आहे. त्यामुळेच उबर इट्स इंडिया ही कंपनी Zomato ला विकण्याचा निर्णय घेतला असावा, असं कळतं.

  (हेही वाचा : आधार कार्ड हरवलं तर कुठेही जाण्याची नाही गरज, UIDAI ने सुरू केली नवी सेवा)

  असं असलं तरी हे अधिग्रहण फक्त भारतातल्या उबर इट्स कंपनीसाठी आहे. जगभरातल्या अन्य देशांमध्ये मात्र उबर इट्स आपली सेवा सुरू ठेवेल. त्याचबरोबर हा व्यवहार फक्त उबर इट्स बदद्ल आहे. उबर कॅब्जसाठी नाही. 100 जणांची जाऊ शकते नोकरी उबर इट्स आता भारतात दुसऱ्या कुठल्याही प्लॅटफॉर्म्सवर नसेल.उबर इट्स च्या युजर्सना Zomato च्या अॅपवर रिडायरेक्ट केलं जाईल. इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, भारतात उबर इट्सची टीम Zomato सोबत नसेल. याचा अर्थ असा की उबर इट्सच्या 100 कर्मचाऱ्यांना उबरच्या दुसऱ्या विभागांत पाठवलं जाईल किंवा नोकरकपातीला सामोरं जावं लागेल. पण या गोष्टीवर Zomato किंवा Uber Eats या दोन्ही कंपन्यांनी काहीही वक्तव्य करायला नकार दिला. (हेही वाचा : तुम्ही LIC पॉलिसी घेतली असेल तर सावधान! बनावट फोन कॉलमुळे बसू शकतो फटका) Uber Cabs ने यावर्षी 50 ते 200 शहरांमध्ये सेवा देण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. यामध्ये बाइक सर्व्हिसवर उबरचं जास्त लक्ष असेल. आपल्या कॅब सेवेवर जास्त लक्ष देण्यासाठीच उबर इट्स इंडियाने हा निर्णय घेतला, असं बोललं जातंय. =====================================================================================
  Published by:Arti Kulkarni
  First published:

  Tags: Money, Uber

  पुढील बातम्या