जाहिरात
मराठी बातम्या / मनी / तुम्ही LIC पॉलिसी घेतली असेल तर सावधान! बनावट फोन कॉलमुळे बसू शकतो फटका

तुम्ही LIC पॉलिसी घेतली असेल तर सावधान! बनावट फोन कॉलमुळे बसू शकतो फटका

तुम्ही LIC पॉलिसी घेतली असेल तर सावधान! बनावट फोन कॉलमुळे बसू शकतो फटका

भारतीय जीवन विमा निगम (LIC)ने आपल्या ग्राहकांना गैरव्यवहारांपासून वाचण्यासाठी अलर्ट दिला आहे. LIC ने दिलेल्या माहितीनुसार ग्राहकांना त्यांचे मोबाइल फोन आणि लँडलाइन कॉलवर फसवलं जाण्याचा धोका आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 20 जानेवारी : भारतीय जीवन विमा निगम (LIC)ने आपल्या ग्राहकांना गैरव्यवहारांपासून वाचण्यासाठी अलर्ट दिला आहे. LIC ने दिलेल्या माहितीनुसार ग्राहकांना त्यांचे मोबाइल फोन आणि लँडलाइन कॉलवर फसवलं जाण्याचा धोका आहे. काही LIC अधिकारी आणि एजंट्स IRDA चे अधिकारी ग्राहकांना फोन करतात. यामध्ये ते विमा पॉलिसीशी संबंधित फायदे वाढवून सांगतात. याद्वारे ते ग्राहकांना पॉलिसी सरेंडर करायला भाग पाडतात. अशा प्रकारे पॉलिसी सरेंडर करून चांगले रिटर्न्स देण्यासाठी काही ग्राहकांकडून मोठी रक्कम वसूल करण्यात येते.ही सगळी फसवणूक आहे. त्याचबरोबर काही ग्राहकांनी सरेंडर केलेली रक्कम दुसऱ्याच ठिकाणी गुंतवण्यात आलीय. याच प्रकारे LIC चे प्रतिनिधी असल्याचं दाखवून पॉलिसीधारकांची फसवणूक केली जाते. बनावट कॉलपासून सावधान LIC ने जारी केलेल्या अलर्टमध्ये म्हटलं आहे की, कंपनी आपल्या ग्राहकांना कोणतीही पॉलिसी सरेंडर करण्याचा सल्ला देत नाही. त्यामुळे अशा कोणत्याही नंबरवरून आलेले फोन कॉल्स अटेंड करू नका, असंही सांगण्यात आलं आहे. यासाठी LIC च्या अधिकृत वेबसाइटवर नोंदणी करून त्याबद्दलची माहिती घ्या, असंही LIC ने म्हटलं आहे. (हेही वाचा : Gold Prices Today : सोन्याच्या दरात 4 रुपयांची वाढ, असं ओळखा खरं सोनं) लायसन्स असलेल्या एजंटकडूनच घ्या पॉलिसी लायसन्स किंवा आयडी कार्ड असलेल्या एजंटकडूनच LIC पॉलिसी घ्या, असंही LIC ने सुचवलं आहे. ग्राहकांनी LIC च्या वेबसाइटवर जाऊन ग्रिव्हन्स रिड्रेसल ऑफिसरची माहिती घ्यावी आणि त्यांच्याशी संपर्क करावा, असंही LIC चं म्हणणं आहे. ==========================================================================================

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: LIC , money
  • First Published :
जाहिरात
जाहिरात