मराठी बातम्या /बातम्या /मनी /1 लाखाचे 8 लाख! ही गुंतवणूक करणारे झाले मालामाल, तुम्ही हा शेअर खरेदी केलाय का?

1 लाखाचे 8 लाख! ही गुंतवणूक करणारे झाले मालामाल, तुम्ही हा शेअर खरेदी केलाय का?

Share Market: सुबेक्सनं एका वर्षाच्या कालावधीत तब्बल 837.34 टक्के वाढ नोंदवून गुंतवणूकदारांना लक्षाधीश केलं आहे. 2021 मधल्या मल्टिबॅगर स्मॉल (Small) आणि मिड कॅप (Mid Cap) शेअर्सच्या यादीतला हा एक महत्त्वाचा शेअर ठरला आहे.

Share Market: सुबेक्सनं एका वर्षाच्या कालावधीत तब्बल 837.34 टक्के वाढ नोंदवून गुंतवणूकदारांना लक्षाधीश केलं आहे. 2021 मधल्या मल्टिबॅगर स्मॉल (Small) आणि मिड कॅप (Mid Cap) शेअर्सच्या यादीतला हा एक महत्त्वाचा शेअर ठरला आहे.

Share Market: सुबेक्सनं एका वर्षाच्या कालावधीत तब्बल 837.34 टक्के वाढ नोंदवून गुंतवणूकदारांना लक्षाधीश केलं आहे. 2021 मधल्या मल्टिबॅगर स्मॉल (Small) आणि मिड कॅप (Mid Cap) शेअर्सच्या यादीतला हा एक महत्त्वाचा शेअर ठरला आहे.

  नवी दिल्ली, 10 जुलै: शेअर बाजारात (Share Market) योग्य शेअरमध्ये योग्य वेळी गुंतवणूक करणं आणि योग्य वेळी ती काढून घेणं महत्त्वाचं ठरतं. अनेकदा शेअर बाजार पडला की लोकं घाबरून गुंतवणूक काढून घेतात आणि नंतर त्याचा त्यांना पश्चाताप होऊ शकतो. अनेकदा दीर्घ काळ ठेवलेला शेअर प्रचंड नफा देऊन जातो. अशाच एका शेअरनं सध्या लोकांना मालामाल केलं आहे. हा शेअर आहे आयटी क्षेत्रातील सुबेक्स (Subex) या कंपनीचा.

  सुबेक्सनं एका वर्षाच्या कालावधीत तब्बल 837.34 टक्के वाढ नोंदवून गुंतवणूकदारांना लक्षाधीश केलं आहे. 2021 मधल्या मल्टिबॅगर स्मॉल (Small) आणि मिड कॅप (Mid Cap) शेअर्सच्या यादीतला हा एक महत्त्वाचा शेअर ठरला आहे.

  शेअर बाजारातले जाणकार गुंतवणूकदार मनी मॅग्नेट चार्ली मुंगर (Money magnet Charlie Munger) यांनी एकदा म्हटलं होतं, की शेअर खरेदी करणं किंवा विक्री करणं यातून नव्हे, तर योग्य काळ शेअर राखून ठेवल्यानं चांगला नफा कमावता येतो. सुबेक्सच्या शेअरनं त्यांचं हे मत सप्रमाण सिद्ध केलं आहे. ज्या गुंतवणूकदारांनी सुबेक्सचे शेअर्स वर्षापूर्वी खरेदी केले होते आणि ते तसेच ठेवले होते, त्यांना त्या शेअर्सनी लाखो रुपयांचा फायदा करून दिला आहे.

  हे वाचा-मुलांच्या सुरक्षित भविष्यासाठी या बँकेची खास ऑफर, उघडता येईल स्पेशल खातं!

  बंगळुरू स्थित सुबेक्स या सॉफ्टवेअर कंपनीच्या (Software Company) शेअरची किंमत 9 जुलै 2020 रोजी फक्त 7.82 रुपये इतकी होती. बरोबर वर्षभरानंतर शुक्रवारी, 9 जुलै 2021 रोजी राष्ट्रीय शेअर बाजारात अर्थात एनएसईमध्ये (NSE) त्याची किंमत 71.20 रुपये झाली आहे. म्हणजेच वर्षभरात या शेअरनं 800 टक्क्यांहून अधिक वाढ नोंदवली आहे. गेल्या सहा महिन्यांत हा शेअर 150 टक्क्यांहून अधिक वाढला आहे. गेल्या एका महिन्यात या कंपनीनं 22.88 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ नोंदवली आहे. त्यामुळे 2021मध्येदेखील हा घसघशीत कमाई करून देणारा शेअर ठरला आहे.

  आतापर्यंत सुबेक्सने दिलेल्या परताव्याच्या (Return) हिशेबाने एका वर्षापूर्वी गुंतवलेल्या रकमेच्या साधारण आठपट रक्कम मिळाली आहे. एखाद्या गुंतवणूकदारानं वर्षापूर्वी या शेअर्समध्ये एक लाख रुपये गुंतवले असते, तर त्याला आता 8.37 लाख रुपये मिळाले असते. 6 महिन्यांपूर्वी कोणी यात एक लाख रुपये गुंतवले असते, तर त्याला आता 1.53 लाख रुपये मिळाले असते. एका महिन्यापूर्वी 1 लाख रुपये गुंतवणाऱ्या व्यक्तीला एक लाख 22 हजार रुपये मिळाले असते. म्हणजे अवघ्या महिन्याभरात त्याला 22 हजारांचा नफा झाला असता. गुंतवणूकदारांना लक्षाधीश करणाऱ्या या कंपनीचं बाजारमूल्य सध्या सुमारे 3750 कोटी रुपये आहे.

  हे वाचा-सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता 'हा' क्लेम करणं झालं अधिक सोपं

  कोविड-19च्या (Covid-19) पहिल्या लाटेत शेअर बाजारात बड्या शेअर्सची धूळधाण झाल्यानं गुंतवणूकदारांनी स्मॉल आणि मिड कॅप म्हणजेच लघू आणि मध्यम कंपन्याच्या शेअर्सकडे आपलं लक्ष वळवलं आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना कमी पैशात भरपूर नफा मिळवून देण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

  First published:

  Tags: Money, Share market