जाहिरात
मराठी बातम्या / मनी / आता विकता येणार नाहीत जुने दागिने! हॉलमार्किंगचं नियोजन बिघडलं, नवा नियम काय?

आता विकता येणार नाहीत जुने दागिने! हॉलमार्किंगचं नियोजन बिघडलं, नवा नियम काय?

हॉलमार्किंग नियम

हॉलमार्किंग नियम

आता सरकारने देशात हॉलमार्कशिवाय सोन्याचे दागिने आणि इतर प्रोडक्ट्सच्या विक्री आणि खरेदीवर बंदी घातली आहे. जुने दागिने विकणे किंवा तोडणे आणि नवीन दागिने बनवणे किंवा बदलणे यासाठी हॉलमार्किंग बंधनकारक करण्यात आलेय.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 19 मे : तुमच्या घरातील जुने दागिने विकून तुम्ही नवीन दागिने बनवण्याचा विचार करताय का? तर ही बातमी तुम्ही वाचणं गरजेचं आहे. कारण सरकारने दागिन्यांच्या विक्रीसाठी नवीन नियम केले आहेत. आता घरात ठेवलेले जुने दागिने तुम्ही हॉलमार्क केल्याशिवाय विकू शकणार नाहीत. सरकारने गोल्ड हॉलमार्किंग, सोने खरेदी-विक्रीसाठी नवीन नियम जारी केले आहेत. या नियमांनुसार आता घरांमध्ये ठेवलेल्या जुन्या सोन्याच्या दागिन्यांचे हॉलमार्किंगही बंधनकारक करण्यात आलेय. नवीन नियमांमध्ये म्हटले आहे की, 1 एप्रिल 2023 पासून सर्व सोन्याचे दागिने आणि कलाकृतींवर हॉलमार्क यूनिक आइडेंटिफिकेशन नंबर असणं गरजेचं आहे. यापूर्वी म्हटलं जात होतं की, हॉलमार्किंग फक्त नव्या दागिनांच्या खरेदीसाठी लागू होईल. मात्र आता असं होणार नाही.

News18लोकमत
News18लोकमत

मनीकंट्रोलच्या रिपोर्टनुसार, सरकारने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. आता जुन्या दागिन्यांची विक्री करण्यासाठी हॉलमार्किंग अनिवार्य केलेय. BIS च्या मते, ज्या ग्राहकांकडे हॉलमार्क नसलेले सोन्याचे दागिने आहेत त्यांनी ते विकण्यापूर्वी किंवा नवीन डिझाइनसाठी देवाणघेवाण करण्यापूर्वी हॉलमार्क करणे अनिवार्य असेल.

Online Payment Tricks: ऑनलाइन फ्रॉड टाळायचंय? मग अजिबात विसरु नका ‘या’ गोष्टी

हॉलमार्किंग कसं करायचं?

वापरलेल्या दागिन्यांना हॉलमार्क करून घेण्यासाठी ग्राहकांकडे 2 ऑप्शन असतील. बीआयएस नोंदणीकृत ज्वेलर्सकडून हॉलमार्क न केलेल्या जुन्या दागिन्यांना हॉलमार्क करुन घेऊ शकता. BIS नोंदणीकृत ज्वेलर्स हॉलमार्क न केलेले सोन्याचे दागिने BIS Assaying and Hallmarking Center येथे घेऊन जातील. ग्राहकांसाठी दुसरा ऑप्शन म्हणजे कोणत्याही BIS-मान्यताप्राप्त हॉलमार्किंग केंद्रांवर दागिन्यांची चाचणी करून हॉलमार्क करून घेणे.

एका व्यक्तीचे किती बँक अकाउंट असावेत? एका पेक्षा जास्त असतील तर काय होतं?

किती पैसे द्यावे लागतील?

दागिन्यांची संख्या 5 किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास हॉलमार्किंगसाठी, ग्राहकाला प्रत्येक दागिन्यासाठी 45 रुपये द्यावे लागतील. 4 पीस हॉलमार्क करण्यासाठी 200 रुपये द्यावे लागतील. BIS द्वारे मान्यताप्राप्त हॉलमार्किंग केंद्र दागिन्यांची तपासणी करेल आणि त्याचे सर्टिफिकेट देईल. ग्राहक आपले हॉलमार्क नसलेले सोन्याचे दागिने विकण्यासाठी हा रिपोर्ट घेऊन कोणत्याही सोनाराकडे जाऊ शकतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात