सध्याच्या काळात ऑनलाइन पेमेंट करण्याचे प्रमाण वाढलेय. मात्र अनेकदा असं करताना फ्रॉड होण्याची भीती असते. यासोबतच वाढती सायबर गुन्हेगारी पाहता ऑनलाइन पेमेंट करणं नेहमीच सुरक्षित नसतं. ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी लोक Google Pay (G Pay), Paytm, PhonePe सारख्या अॅपचा वापर UPI पेमेंटसाठी करता. मात्र हे करताना एक साधारण चूक तुम्हाला हानिकारक ठरु शकते. या चुका टाळून आपण फ्रॉडपासून बचाव करु शकतो. आज आपण अशाच पाच ट्रिक जाणून घेणार आहोत. ज्यामुळे तुम्ही ऑनलाइन फ्रॉडला बळी पडणार नाही.
यूपीआय पेमेंटवर एक स्ट्राँग स्क्रीन लॉक, पासवर्ड किंवा पिन अवश्य ठेवा. यामुळे फोन चुकीच्या हातात गेला तरीही तुमची फसवणूक होत नाही. यासोबतच पर्सनल डेटाही लीक होत नाही. मोबाईल किंवा यूपीआय पीनचा पासवर्ड ठेवताना तुमचं नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर सारखे पासवर्ड ठेवणं टाळावं.
तुमचा यूपीआय पिन कधीच कोणासोबत शेअर करु नका. असं केल्यास तुमच्यासोबत धोका होऊ शकते. पिनच्या मदतीने तुमचा फोन अॅक्सेस केला जाऊ शकतो.
कोणत्याही अनव्हेरीफाइड लिंकवर क्लिक करु नका. कारण काही काही लिंकवर क्लिक केल्यावर तुमच्या अकाउंटमधील पैसे गायब होऊ शकतात. यासोबच कोणासोबतही ओटीपी शेअर करु नका.
तुम्ही ज्या यूपीआय अॅपने पेमेंट करता. ते अॅप नेहमी अपडेट करणं गरजेचं असतं. हे अॅप अपडेट केल्याने तुम्हाला चांगल्या सुविधा मिळतात. यासोबतच अपडेटच्या माध्यमातून तुम्ही सिक्योरिटीही वाढते.
ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी लोक अनेक अॅपचा वापर करतात. मात्र असं करणं टाळावं. यासोबतच ऑनलाइन पेमेंट करताना अॅप स्टोअर किंवा प्ले स्टोअरवर व्हेरिफाय असलेल्या अॅपच डाउनलोड करावं.