आजकाल बँक खाते नसलेली व्यक्ती दिसणे फार दुर्मिळ झालंय. कारण आज जन्मलेल्या मुलापासून आजपर्यंत प्रत्येकाचे बँक खाते आहे. आपल्यापैकी अनेकांचे काही सेव्हिंग अकाउंट, करंट अकाउंट असे विविध अकाउंट असतात.
एका व्यक्तीचे किती बँक अकाउंट असायला हवेत? याविषयी तुम्ही कधी विचार केला का? आज आपण याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
बहुतेक लोकांकडे 3 ते 4 बचत खाती असतात. काही लोकांची यापेक्षा जास्त बँक खाती आहेत. कारण भारतात बँक खाते उघडण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही. RBI बँक खात्यांच्या संख्येवर कोणतीही मर्यादा घालत नाही. त्यामुळे एखादी व्यक्ती कितीही बँक खाती उघडू शकते.
तुम्ही तुमच्या खात्यांमधून कायदेशीर व्यवहार करत राहिल्यास कोणतेही नुकसान होत नाही. तुम्ही तुमचे बँक खाते बराच काळ वापरत नसल्यास, बँक तुमचे खाते बंद करू शकते. त्यामुळे, तुम्ही तुमचे सर्व अकाउंट वापरणे सुरु ठेवावं. परंतु अनेक बँक अकाउंट उघडताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.
सर्व बँकांनी सॅलरी अकाउंटव्यतिरिक्त इतर सेव्हिंग अकाउंटमध्ये मिनिमम बॅलेन्स ठेवणं गरजेचं असतं. तुम्ही असं न केल्यास तुमचे पैसे कट होऊ शकतात.
फीस कापल्यानंतरही मिनिमम बॅलेन्स मेंटेन झालं नाही. तर तुमचं बँक अकाउंट निगेटिव्ह होईल. यामुळे तुम्ही मिनिमम बॅलेन्स अवश्य ठेवावं.
अनेक बँक अकाउंटमुळे बँकांना अनेक फायदे मिळतात. एसएमएस पाठवण्यासाठी प्रत्येक बँक दर महिन्याला ठराविक रक्कम आकारते. तुम्हाला बँक खाते सांभाळण्याचा खर्चही भरावा लागेल.
बँकेला डेबिट कार्डसाठी वार्षिक शुल्क भरावे लागते. अशा वेळी, आपल्याला आवश्यक आहे तेवढेच बँक अकाउंट उघडा. यामुळे तुमची सेव्हिंग सुरक्षित राहील.