Home /News /money /

कमीत कमी पैशात सुरु करा हा व्यवसाय; महिन्याला होऊ शकते मोठी कमाई

कमीत कमी पैशात सुरु करा हा व्यवसाय; महिन्याला होऊ शकते मोठी कमाई

कमीतकमी गुंतवणुकीत जास्तीत जास्त नफा मिळवणारा व्यवसाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. भारत सरकारकडूनही यात मदत मिळणार आहे. या व्यवसायातून दिवसाला हजारो रुपयांची कमाई करू शकता.

  नवी दिल्ली, 24 डिसेंबर : कोरोना (Covid 19) काळात नोकरी गेल्याने आज बरेच जण व्यवसायाकडे वळले आहेत. कमीत कमी भांडवलात जास्त नफा देणारे व्यवसाय (Business), तसंच या संकटकाळात व्यवसाय करताना कोणत्या गोष्टीची मागणी आहे याचा देखील विचार करणे गरजेचे आहे. त्यामुळे कमीतकमी गुंतवणुकीत जास्तीत जास्त नफा मिळवणारा व्यवसाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. भारत सरकारकडूनही (Government of India) यात मदत मिळणार आहे. या व्यवसायातून दिवसाला हजारो रुपयांची कमाई करू शकता. धूप अगरबत्तीचा (Agarbatti) व्यवसाय कमी पैशात सुरू होऊ शकतो. सर्वसामान्य माणसाला हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर हा एक चांगला पर्याय आहे. यासाठी खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने (KVIC) रोजगार निर्मितीसाठी नवीन कार्यक्रम सुरु केला असून याअंतर्गत तुम्ही हा व्यवसाय सुरु करू शकता. ‘खादी अगरबत्ती आत्म निर्भर मिशन’ अंतर्गत बेरोजगार आणि प्रवासी श्रमिक नागरिकांसाठी ही योजना सुरु केली असून आहे. या योजनेत व्यवसाय सुरु कारण्याबरोबरच अनेकांना रोजगार देखील देऊ शकणार आहात. पब्लिक आणि प्रायव्हेट मोडमध्ये या योजनेची सुरुवात केली असून घरच्याघरी देखील तुम्ही हा व्यवसाय सुरु करू शकता. अगरबत्ती तयार करण्याचं मशीन - अगरबत्ती तयार करण्यासाठी बाजारात अनेक मशीन उपलब्ध आहेत. यामध्ये मिक्सर मशीन, ड्रायर मशीन आणि मेन प्रॉडक्शन मशीन उपलब्ध आहेत. अगरबत्तीची पेस्ट तयार करण्यासाठी वेगळं मशीन आणि ती काडीवर लावण्यासाठी वेगळं मशीन वापरलं जातं. त्यामुळे इतक्या प्रकारच्या मशीनच्या वापर केला जातो. या मशीनमध्ये ऑटोमॅटिक आणि सेमी ऑटोमॅटिक मशीन मिळतात. मशीन निवडल्यानंतर तिचे इंस्टॉलेशन डिलर कडून करून घेऊन आणि मशीनवर काम करण्याचे ट्रेनिंग घेणे सुद्धा आवश्यक आहे. त्यामुळे तुमच्या बजेटनुसार आणि मागणीनुसार तुम्ही या मशीन विकत घेऊ शकता.

  (वाचा - 'या' कंपनीत असणार 50 टक्के महिला स्टाफ; हजारोंच्या संख्येत निघणार Job vacancy)

  मशीनची किंमत - भारतात अगरबत्ती बनवण्याच्या मशीनची किंमत 35000 रुपयांपासून 175000 रुपयांपर्यंत आहे. या मशीनने तुम्ही 1 मिनिटात 150 ते 200 अगरबत्ती बनवू शकता. ऑटोमॅटिक मशीनची किंमत 90000 ते 175000 रुपयांपर्यंत आहे. आटोमॅटिक मशीनने काम सुरू केले तर खूप वेगाने अगरबत्ती बनतात. एक ऑटोमॅटिक मशीन एका दिवसात 100 किलो अगरबत्ती बनवते. कच्च्या मालाचा पुरवठा - मार्केटमधील चांगल्या सप्लायर्सशी संपर्क साधा. यासाठी अगरबत्ती उद्योगातील लोकांची मदत घेऊ शकता. यामध्ये तुम्ही मागवलेला कच्चा माल काही प्रमाणात खराब निघत असल्याने जरा जास्त मागवावा. त्यामुळे अचानक माल संपल्यानंतर काम थांबवण्याची गरज पडणार नाही. अगरबत्ती बनवण्याचे साहित्य - अगरबत्ती बनवण्याच्या साहित्यात गम पावडर, कोळशाची पावडर, बांबू, नर्गिस पावडर, सुगंधी तेल, पाणी, सेंट, फुलांच्या पाकळ्या, चंदनाचं लाकूड, जिलेटिन पेपर, शॉ डस्ट, पॅकिंग मटेरियल इत्यादी गोष्टी लागतील. या सर्व गोष्टी बाजारात उपलब्ध आहेत. त्यामुळे या व्यवसायासाठी लागणारे साहित्य अतिशय स्वस्त आणि हवे तेव्हा उपलब्ध होणारे असल्याने हा व्यवसाय करणं फार अवघड नाही. पॅकेजिंग आणि मार्केटिंग - कोणत्याही व्यवसायात उत्पादनाचे पॅकिंग खूप महत्त्वाचे ठरते. त्यामुळे तुमच्या पॅकिंगवर विशेष भर द्या. यासाठी एक्सपर्टचा सल्ला घ्या आणि आकर्षक पॅकेजिंग बनवा. यासाठी पॅकवर धार्मिक फोटो वापरून कस्टमरचे लक्ष आकर्षित करून घेऊ शकता. याचबरोबर बजेट असेल तर अगरबत्तीचे मार्केटिंग करण्यासाठी वृत्तपत्र, टीव्हीमध्ये जाहिरात द्या. शक्य असल्यास कंपनीची ऑनलाइन वेबसाईट तयार करुन आणि यावर उत्पादनाचे मार्केटिंग करण्याबरोबरच विक्री देखील करू शकता. अगरबत्ती बनवण्यासाठी लागणारा कालावधी - ऑटोमेटिक मशीनवर तुम्ही 1 मिनिटात 150 ते 200 अगरबत्ती बनवू शकता. हाताने करत असाल, तर कर्मचार्‍यांच्या क्षमतेवर अवलंबून आहे. महत्त्वाचे म्हणजे चांगल्या प्रतीची मशीन वापरल्याने तुमचे उत्पादन देखील वाढू शकते. यासाठी तुमच्याकडे उत्तम प्रतीची मशीन असणे गरजेचे आहे. त्याचबरोबर कुशल कामगार देखील आवश्यक आहेत. या कामासाठी कामगारांना ट्रेनिंग दिल्यानं उत्पादनामध्ये देखील वाढ होऊ शकते.

  (वाचा - FASTag Recharge करताना घ्या काळजी, अन्यथा भरावा लागेल चार्ज)

  व्यवसाय सुरू करण्यासाठी येणारा खर्च - हा व्यवसाय 13,000 रूपयांच्या खर्चाने घरगुती पद्धतीने हाताने तयार करून सुरू करू शकता. मशीन लावणार असाल तर 5 लाख रूपयांपर्यंत खर्च येऊ शकतो. यामध्ये मागणीनुसार आणि विक्रीनुसार लागणार्‍या साहित्याचे प्रमाण कमी किंवा जास्त करून, खर्च कमी करू शकता. त्यामुळे यासाठी मशीन खरेदी करायचे असल्यास खर्च वाढू शकतो. किती होईल नफा - जर 30 लाखांचा वार्षिक व्यवसाय झाला, तर 10 टक्के फायद्यासह दरमहा 25 हजार रुपये कमवू शकता. त्यामुळे वर्षाला तुम्ही या व्यवसायाच्या माध्यमातून 3 लाख रुपयांपर्यंतची कमाई करू शकता. मार्केटिंगच्या मदतीने जितकी जास्त विक्री कराल, तितका नफा जास्त होणार आहे. त्यामुळं या व्यवसायामध्ये मार्केटिंगला खूप महत्त्व आहे.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Small business

  पुढील बातम्या