मराठी बातम्या /बातम्या /मनी /

नोकरी ऐवजी करा 'हा' व्यवसाय दिवसाला कमवाल 4 हजार रुपये

नोकरी ऐवजी करा 'हा' व्यवसाय दिवसाला कमवाल 4 हजार रुपये

नोकरी न करता व्यवसाय करण्याचा विचार तुम्हीही करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

नोकरी न करता व्यवसाय करण्याचा विचार तुम्हीही करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

नोकरी न करता व्यवसाय करण्याचा विचार तुम्हीही करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

नवी दिल्ली, 23 जुलै: पैसे कमवणं हे चरितार्थ चालवण्यासाठी सर्वांत महत्त्वाचं आहे. कोरोना काळात अचानक नोकऱ्या गेल्यामुळे लोकांना व्यवसाय करण्याचं महत्त्व लक्षात आलं आहे. अनेकजण नोकरी गेल्यामुळे नवी नोकरी न शोधता थेट व्यवसाय करायचा विचार (Thinking about starting a business) करायला लागले आहेत. त्यामुळे नोकरी न करता व्यवसाय करण्याचा विचार तुम्हीही करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आम्ही तुम्हाला आज अशा एका व्यवसायाची माहिती देणार आहोत ज्यात तुम्ही दिवसाला 4 हजार रुपये कमवू शकाल. म्हणजे महिन्याला एक लाख रुपये. व्यवस्थित जाणून घ्या हा व्यवसाय काय आहे. हा व्यवसाय आहे केळ्याचे वेफर्स (Banana Chips or Wafers) तयार करण्याचा. केळ्याचे वेफर्स आरोग्यासाठी चांगले असतात. सध्या केळ्याच्या वेफर्सनाच भरपूर मागणी आहे. अनेक जण व्रतवैकल्य करतात तेव्हा केळ्याचे वेफर्सच खातात त्याचमुळे या वेफर्सना मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि ते विकलेही जातात. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे केळ्याच्या वेफर्सचं मार्केट लहान (Small Market) आहे त्यामुळे मोठमोठ्या ब्रँडेड कंपन्या (Branded Companies) केळ्याचे वेफर्स तयार करत नाहीत. त्यामुळेच या व्यवसायात भरपूर स्कोप आहे. चला तर मग पाहूया हा व्यवसाय कसा सुरू करायचा. 70 वर्षांपूर्वी 350 खासगी बँकांमधले कोट्यवधी रुपये बुडाले; तरी Privatisation चा निर्णय का? वाचा Inside Story केळ्याचे वेफर्स तयार करण्यासाठी लागेल हे सामान केळ्याचे वेफर्स तयार करण्यासाठी वेगवेगळी मशीन्स वापरली जातात त्याचबरोबर कच्चा माल (Raw Material) म्हणून कच्ची केळी, मीठ, तेल तसंच इतर मसाले वापरायला लागतात. हा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्हाला आवश्यक असलेल्या काही यंत्रांची (Machinery) नावं खाली दिली आहेत. केळं धुण्यासाठीची टाकी आणि केळं सोलणारं यंत्र केळाचे काप करणारं यंत्र केळ्याचे काप तळणी यंत्र मसाले एकत्र करण्याचं यंत्र पाउच प्रिंटिंग मशीन प्रयोगशाळेतील उपकरणं देशात येणार स्वतःची Digital Currency; RBI चा मोठा खुलासा इथून खरेदी करा ही मशीन्स केळ्याचे वेफर्स तयार करण्याचा तुमचा विचार असेल आणि तुम्ही त्याची तयारी केली असेल तर सर्वांत पहिल्यांदा तुम्हाला वेफर्स बनवणारी मशीन्स (Machines) खरेदी केली पाहिजेत. ही मशीन्स तुम्हाला https://www.indiamart.com/ किंवा https://india.alibaba.com/index.html या वेबसाइट्सच्या (Online Machines buying) माध्यमातून विकत घेता येऊ शकतात. हे मशीन ठेवण्यासाठी तुमच्याकडे कमीत कमी 4000 ते 5000 स्क्वेअर फूट जागा असणं गरजेचं आहे. 28 हजार ते 50 हजार रुपयांत तुम्हाला हे मशीन मिळू शकतं. खर्चाचं गणित आपल्याला वेफर्स तयार करण्यासाठी किती कच्चा माल लागेल याचा अंदाज यायला हवा म्हणजे धंदा फायद्यात चालेल. पहिली गोष्ट म्हणजे आपण 50 किलो वेफर्स तयार करण्याचं गणित समजून घेऊया. 50 किलो वेफर्स तयार करायला तुम्हाला 120 किलो कच्ची केळी (Raw Bananas) लागतील ती तुम्हाला सुमारे 1000 रुपयांत मिळून जातील. त्याचबरोबर 12 ते 15 लिटर तेल लागेल. 15 लिटर तेल 70 रुपये लिटर दराने गृहित धरलं तर त्याचे 1050 रुपये होतील. वेफर्स तळणी यंत्र एका तासाला 10 ते 11 लिटर डिझेल वापरतं. 1 लिटर डिझेल 80 रुपयांना गृहित धरलं तर 11 लिटरचे साधारण 900 रुपये लागतील. मीठ आणि मसाल्यांसाठी जास्तीत जास्त 150 रुपये खर्च येईल. हा सगळा खर्च एकत्र केला तर एकूण 3200 रुपयांमध्ये 50 किलो वेफर्स तयार होऊ शकतात. Zomato listing: झोमॅटो शेअर्समध्ये मोठी तेजी, 51 टक्क्यांहून अधिक लिस्टिंग एक लाखांचा होईल फायदा पॅकिंगचा खर्च जमेस धरून 1 किलो केळ्याच्या वेफर्सचं पाकिट तयार व्हायला 70 रुपये खर्च येईल. जे पाकिट कुठल्याही बेकरी किंवा किराणा मालाच्या दुकानात 90 ते 100 रुपयांना विकलं जाईल. म्हणजे एका किलोच्या एका पाकिटामागे साधारण 30 रुपयांचा फायदा. पण अजून किराणा माल दुकानदार व इतर कमीशन जाईल. ते गृहित धरलं तर 1 किलो वेफर्सवर तुम्हाला निव्वळ नफा (Net profit) 10 रुपये होईल म्हणजे तुम्हाला दिवसाला 4 हजार रुपये सहज कमवता येतील. तसंच जर तुमच्या कंपनीने महिन्यात 25 दिवस काम केलं तरीही तुम्हाला महिन्याला 1 लाख रुपये कमवता येणं सहज शक्य आहे. व्यसायाचं सूत्र हेच असतं मागणी आणि पुरवठा यामध्ये असलेली तफावत शोधून काढायची आणि ती भरून काढायची. केळ्याच्या वेफर्सच्या व्यवसायात मोठ्या कंपन्या नसल्याचा फायदा होईल आणि तुम्ही भरपूर पैसे कमवू शकाल. चला तर मग लागा तयारीला.
First published:

Tags: Business, Business News, Investment, Money, Small business, Start business

पुढील बातम्या