मराठी बातम्या /बातम्या /मनी /

Zomato listing: झोमॅटो शेअर्समध्ये मोठी तेजी, 51 टक्क्यांहून अधिक लिस्टिंग

Zomato listing: झोमॅटो शेअर्समध्ये मोठी तेजी, 51 टक्क्यांहून अधिक लिस्टिंग

कंपनीचे शेअर BSE वर 115 रुपये, तर NSE वर 116 रुपये लिस्टिंग झाली आहे. याचा शेअरचा इश्यू भाव 76 रुपये इतका होता.

कंपनीचे शेअर BSE वर 115 रुपये, तर NSE वर 116 रुपये लिस्टिंग झाली आहे. याचा शेअरचा इश्यू भाव 76 रुपये इतका होता.

कंपनीचे शेअर BSE वर 115 रुपये, तर NSE वर 116 रुपये लिस्टिंग झाली आहे. याचा शेअरचा इश्यू भाव 76 रुपये इतका होता.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 23 जुलै: ऑनलाईन फूड ऑर्डर प्लॅटफॉर्म झोमॅटोच्या IPO चं (Initial Public Offering) आज शेअर बाजारात जबरदस्त लिस्टिंग झालं आहे. याचे भाव IPO प्राईजच्या तुलनेत जवळपास 80 टक्के प्रीमियमवर पोहोचले आहेत. कंपनीच्या शेअर्सचं BSE वर 115 रुपये, तर NSE वर 116 रुपये लिस्टिंग झालं आहे. याचा शेअरचा इश्यू भाव 76 रुपये इतका होता.

झोमॅटो शेअर लिस्टिंग 27 जुलै रोजी होणार होतं. परंतु त्याआधीचं लिस्टिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला. लिस्टिंग आधीच झोमॅटो शेयर्सचा प्रीमियम वाढला होता. या आठवड्याच्या सुरुवातीला हा 19 रुपये प्रीमियमवर ट्रेड करत होता. परंतु आता तो वाढून 29 रुपयांजवळ पोहोचला आहे.

लिस्टिंगनंतर झोमॅटो शेअर्समध्ये तेजी आहे. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास कंपनीचे शेअर NSE वर 138.50 रुपयांवर ट्रेड करत होते. कंपनीच्या शेयर्सचा मार्केट कॅप 1 लाख करोटी रुपयांहून अधिक झाला आहे. मार्केट कॅपनुसार, ही भारतातील 45व्या नंबरची कंपनी बनली आहे. कंपनीचा शेअर इश्यू प्राईज 76 रुपये होता. आज लिस्टिंगनंतर झोमॅटो शेअर 105 रुपयांवर लिस्ट होण्याची शक्यता होती. परंतु तो 116 रुपयांवर लिस्ट झाला आहे. या आयपीओमध्ये 14040 रुपयांच्या गुंतवणुकीत 195 शेअर्स खरेदी करायचे होते. दोन लॉट बुक केल्यास 290 शेअर्स आयपीओमध्ये होते.

(वाचा - Zomato IPO: तुम्हाला नाही मिळाले झोमॅटोचे शेअर? वाचा काय होणार तुमच्या पैशांचं)

मार्च 2020 नंतर झोमॅटो आयपीओ देशातील सर्वात मोठा आयपीओ इश्यू होता. Zomato IPO द्वारे 9000 कोटी रुपयांचे फ्रेश शेअर आणि 375 कोटीचे शेअर्स नोकरीडॉटकॉमची पॅरेंट कंपनी इंफोऐजद्वाराऑफर फॉर सेलअंतर्गत जारी करण्यात आले होते. Zomato ची सुरुवात 2008 मध्ये झाली होती. कंपनीची मुख्य स्पर्धा Swiggy आणि Amazon शी आहे.

First published:

Tags: Money, Zomato