Worlds Fastest High Speed Train: तुम्हाला विचारलं की, जगातील सर्वात वेगाने चालणाऱ्या ट्रेनची स्पीड काय? तर स्वाभाविकच तुमचं उत्तर 300 किंवा 350 किलोमीटर प्रति तास असेल. पण येत्या काळात तिला अपडेट करण्याची गरज असेल. कारण चीनने 400 किलोमीटर प्रति तासाच्या वेगापेक्षा जास्त वेगाने चालणाऱ्या ट्रेनचं यशस्वी ट्रायल केलं आहे. चीन रेल्वेने घोषणा केली की, CR 450 हाय-स्पीड ट्रेनचं परीक्षण यशस्वीरित्या करण्यात आलं आहे आणि याचा वेग 400-450 किलोमीटर प्रति तासपर्यंत आहे.
या ट्रेनला जगातील सर्वात वेगवान ट्रेन असल्याचा दावा केला जातोय. चीनी रेल्वेने या गोष्टीवर जोर दिला की, ही ट्रेन चीनच्या हाय स्पीड रेल्वे टेक्नॉलॉजीमध्ये महत्त्वपूर्ण योगदान देईल. चला तर मग जाणून घेऊया या ट्रेनमध्ये काय खास आहे? पूर्व चीनमध्ये यशस्वी चाचणी चीन रेल्वेच्या म्हणण्यानुसार, सर्वात वेगवान, सुरक्षित, पर्यावरणपूरक हाय-स्पीड ट्रेनची पूर्व चीनच्या फुजियान प्रांतातील फुकिंग ते कियानझोऊ पर्यंत चाचणी घेण्यात आली. खरंतर चीनने हायस्पीड ट्रेन्स विकसित करण्यासाठी CR450 विज्ञान आणि तंत्रज्ञान नावीन्यपूर्ण प्रकल्प सुरू केला आहे. Railway Knowledge: भारतातील पहिली एयर कंडीशनर ट्रेन, AC नव्हता मग कोच थंड कसं ठेवायचे? इंट्रेस्टिंग आहे उत्तर या वर्षाच्या सुरुवातीला, चायना डेलीने चायना अकादमी ऑफ रेल्वे सायन्सेसचे मुख्य संशोधक झाओ होंगवेई यांचा हवाला देत म्हटलं होतं की, CR450, ज्याचा कमाल वेग 400 किमी ते 450 किमी प्रति तास आहे आणि ते बनवण्याची तयारी सुरु आहे. सध्याच्या प्रवासाच्या तासांना अर्धे करेल ही ट्रेन या नवीन हायस्पीड रेल्वे तंत्रज्ञानाने सर्व पॅरामीटर्सवर उत्कृष्ट कामगिरी केली आहे आणि विविध मेट्रिक्समध्ये चांगले परिणाम दाखवले आहेत. ट्रेन 400 किमी/तास वेगाने, ट्रेन बीजिंग ते शांघाय हा प्रवास फक्त 2.5 तासात पूर्ण करेल. जो सध्याच्या लागणाऱ्या वेळेच्या फक्त अर्धा वेळ आहे. Travel Tips: प्रवासाला जाण्यापूर्वी करा ‘हे’ काम, वाचतील टोलचे पैसे, पाहा काय आहे ट्रिक! सध्या चीनमध्ये सर्वात वेगवान हाय-स्पीड ट्रेन धावण्याचा वेग 350 किमी/तास आहे, जो जगातील सर्वात वेगवान हाय-स्पीड रेल्वे ऑपरेटिंग स्पीड आहे. रिपोर्टनुसार, जपान आणि फ्रान्समधील हाय-स्पीड ट्रेन्ससाठी सर्वाधिक ऑपरेटिंग स्पीड 320 किमी/तास आहे. चीनने लो-व्हॅक्यूम पाइपलाइनमध्ये चालणाऱ्या अल्ट्रा-हाय-स्पीड मॅग्लेव्ह ट्रेनसह अत्याधुनिक ट्रान्सपोर्टेशन सिस्टमची यशस्वी चाचणी केली आहे. कारण ही ट्रेन रुळांवर नाही तर रुळांवर लटकत धावणार आहे. यामुळे तिला स्काय ट्रेन असेही म्हटले जात आहे.