गेल्या वर्षीपासून गुगल मॅपवर टोल प्राइजची सुविधा उपलब्ध आहे. याद्वारे यूझर्स कोणत्याही ठिकाणी जाण्यापूर्वी टोलची एकूण किंमत तपासू शकतात. तसेच, यूझर्स रेग्यूलर रोड किंवा टोलवाल्या रोडमधून कोणताही एक ऑप्शन निवडू शकतात.
Google Maps द्वारे टोलची प्राइज चेक करण्यासाठी अॅपच्या अपडेटेड आणि लेटेस्ट व्हर्जनला ओपन करावं लागतं. यानंतर सध्याचं लोकेशन आणि डेस्टिनेशन सेट करायचं असतं.
डेस्टिनेशन सेट केल्यानंतर, यूझर्सला खालील टॅबमध्ये टोलची अंदाजे किंमत दिसेल. यानंतर, तुम्हाला वाटल्यास तुम्ही ती जर्नी सुरु करु शकता. येथे तुम्हाला रस्त्यासाठी डायरेक्शनही मिळेल.
जर तुम्हाला टोलचे पैसे वाचवायचे असतील तर तुम्हाला सेटिंगमधून Route Option वर जावे लागेल. येथे तुम्हाला Avoid Toll Roads चा बॉक्स चेक करावा लागेल. नंतर Done करावे लागेल. यानंतर, तुम्हाला टोल नसलेल्या रस्त्याचा मॅप दाखवला जाईल.
प्रवासाला निघण्यापूर्वी तुम्ही FASTag बॅलेन्स तपासण्यासाठी आणि गरज पडल्यास आधिच रिचार्ज करण्यासाठी तुम्ही याचा वापर शकता.