जाहिरात
मराठी बातम्या / मनी / World Vada Pav Day: वडापाव विकून उभारली 50 कोटींची कंपनी, कल्याणमध्ये सुरू झालेल्या कंपनीची देशभर आहेत 350 आउटलेट्स

World Vada Pav Day: वडापाव विकून उभारली 50 कोटींची कंपनी, कल्याणमध्ये सुरू झालेल्या कंपनीची देशभर आहेत 350 आउटलेट्स

World Vada Pav Day: वडापाव विकून उभारली 50 कोटींची कंपनी, कल्याणमध्ये सुरू झालेल्या कंपनीची देशभर आहेत 350 आउटलेट्स

जागतिक वडापाव दिन असाही एक दिवस असतो हे तुम्हाला कदाचित माहीत नसेल. पण गोली वडापाव नावाने देशभऱ 350 आउटलेट्स असणाऱ्या वडापाव चेनची सुरुवात कल्याणमध्ये कशी झाली आणि वडापाव विकून 50 कोटींची उलाढाल कशी करतो याची प्रेरक कथा मात्र माहिती करून घ्यायलाच हवी.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra, Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 23 ऑगस्ट:  जागतिक वडापाव दिन (world vada pav day) असा काही दिवस साजरा वगैरे करतात हे कदाचित तुम्हाला माहीत नसेल. 23 ऑगस्ट हाच तो दिवस. कधीही भूक लागली तर चौकाचौकात मिळणाऱ्या वडापावासाठी असा दिवस असावा याचं मराठी माणसाला फारसं विशेष वाटणार नाही कदाचित पण हाच वडापाव विकून कोट्यवधींची उलाढाल असणारा व्यवसाय सुरू करणाऱ्याविषयी माहिती असायलाच हवी. गोली वडापाव नावाने देशभऱ 350 आउटलेट्स असणाऱ्या वडापाव चेनची सुरुवात कल्याणमध्ये कशी झाली आणि वडापाव विकून 50 कोटींची उलाढाल कशी करतो याची प्रेरक कथा मात्र माहिती करून घ्यायलाच हवी. काही मुलांना शिकण्याची आवड नसते. त्यामुळे घरीदारी त्यांना त्यावरून ऐकून घ्यावं लागतं. सारखं हिणवलं जातं, टोमणे मारले जातात. मुंबईतल्या एका मुलालाही असंच सतत ऐकून घ्यावं लागत होतं. त्याचे वडील त्याला म्हणायचे शिकला नाहीस, तर वडापाव (VadaPav) विकावा लागेल. या पठ्ठ्याने ते शब्द खरेच केले. पण त्यात इतकं यश कमावलं की त्याच्या वडापावच्या कंपनीची उलाढाल तब्बल 50 कोटींची आहे आणि देशभरात 350 आउटलेट्स आहेत. त्यांच्या कंपनीचं उदाहरण हार्वर्ड बिझनेस स्कूल, आयएसबी हैद्राबाद, आयएमडी स्वित्झर्लंड अशा अनेक नामांकित विद्यापीठांमध्ये दिलं जातं. आता अनेक मुलांचे आईबाप त्याचं उदाहरण आपल्या मुलांना देतात. या वडापावच्या कंपनीचं नाव आहे गोली वडापाव (Goli Vada Pav)आणि याचे संस्थापक आहेत व्यंकटेश अय्यर (Vykantesh IYer).

पाहा VIDEO World Vadapav Day : पुण्यातील 50 वर्ष जुना गार्डनचा वडापाव, आजही आहे खवय्यांची पहिली पसंती

 एका मध्यमवर्गीय तमिळ ब्राम्हण कुटुंबात जन्मलेल्या व्यंकटेश यांनी चांगलं शिकून डॉक्टर, इंजिनीअर किंवा सीए व्हावं अशी त्यांच्या आई-वडिलांची इच्छा होती. पण व्यंकटेश यांना डॉक्टर, इंजिनीअर होण्यात फारसा रस नव्हता. त्यांनी पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं आणि फायनान्स क्षेत्रात नोकरी सुरू केली. व्यवसाय सुरू करण्यापूर्वी त्यांनी रिटेल क्षेत्रात आपला अनुभव पक्का असावा यावर त्यांनी लक्ष केंद्रित केलं होतं. चांगला अनुभव मिळाल्यावर त्यांनी व्यवसायात उतरायचं ठरवलं. व्यवसाय कोणता निवडला तर वडापावचा. जे लहानपणी त्यांचे वडील त्यांना उपहासानं म्हणायचे. फेब्रुवारी 2004 मध्ये व्यंकटेश अय्यर यांनी ठाणे जिल्ह्यातील कल्याणमध्ये गोली वडापावचं पहिलं आउटलेट सुरू केलं. आपल्या व्यवसायातून जास्तीत जास्त गरजू लोकांना रोजगार मिळाला पाहिजे अशी त्यांची इच्छा होती.  कॉलेज पार्टी ते क्रिकेट मॅचपर्यंत वडापाव पहिल्या पसंतीचा पदार्थ - घरी इडली, डोसा, पोंगल असे पदार्थ रोजच खाले जात असत. पण मुंबईत बाहेर सर्वत्र एक पदार्थ दिसतो तो म्हणजे वडापाव. कॉलेज पार्टी ते क्रिकेट मॅचपर्यंत सगळेजण आवडीनं वडापाव खातात. गर्दी खेचणारा हा पदार्थ आहे. त्यामुळे हाच वडापाव आपण विकायचं असं ठरवल्याचं व्यंकटेश अय्यर सांगतात. गोली वडापावच्या आउटलेटवर त्यांनी वडापावचे काही नवीन प्रकारही उपलब्ध केले आहेत. त्यामध्ये पनीर वडापाव, शेजवान, मिक्स व्हेज, पालक मका असे अनोखे प्रकार आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या प्रत्येक आउटलेटवर सर्व पदार्थांची चव सारखीच असते. असं पडलं गोली वडा पाव नाव - व्यंकटेश अय्यर यांनी हा व्यवसाय सुरू करायचं ठरवलं तेव्हा लोकांशी चर्चा सुरू केली. तेव्हा नेहमी त्यांना विचारलं जायचं काय गोल देणार आहात? बटाटेवडा करताना बटाटयाच्या सारणाचा चपटा गोळा बेसनाच्या पिठात घालून तळला जातो. त्याला गोळी म्हणतात. हे त्यांच्या लक्षात आल्यानं त्यांनी आपल्या कंपनीच्या नावात गोली हे नाव असलं पाहिजे हे नक्की केलं होतं. अशाप्रकारे त्यांच्या कंपनीचं नाव गोली वडा पाव ठरलं . नारायण मूर्ती यांचा प्रभाव - आपल्या कंपनीत शिक्षण अर्धवट सोडलेल्या मुलांना, आपल्या कंपनीत नोकरी देण्यावर व्यंकटेश अय्यर यांचा भर आहे. गरीब मुलांच्या शिक्षणासाठीही ते मदत करतात. त्यांच्या कंपनीत ‘थ्री ई’ म्हणजे एज्युकेशन, एम्प्लॉयमेंट आणि आंत्रप्रिन्युअरशिप यांना महत्त्वाचं स्थान आहे. आपल्या कंपनीतील कर्मचाऱ्यांना शेअर्स देऊन त्यांनाही कंपनीचे भागीदार बनवणारे इन्फोसिसचे (Infosys) संस्थापक नारायण मूर्ती (Narayan Murthy)यांचा व्यंकटेश अय्यर यांच्यावर मोठा प्रभाव असून, त्यांना ते आदर्श मानतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात