जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / World Vadapav Day : पुण्यातील 50 वर्ष जुना गार्डनचा वडापाव, आजही आहे खवय्यांची पहिली पसंती

World Vadapav Day : पुण्यातील 50 वर्ष जुना गार्डनचा वडापाव, आजही आहे खवय्यांची पहिली पसंती

World Vadapav Day : पुण्यातील 50 वर्ष जुना गार्डनचा वडापाव, आजही आहे खवय्यांची पहिली पसंती

पुण्यातील गार्डन वडापावला 50 वर्षांची परंपरा (Garden Vadapav, Pune) असून आजही तो खवय्याची पहिली पसंती आहे.

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

    पुणे, 23 ऑगस्ट : आज 23 ऑगस्ट म्हणजेच जागतिक वडापाव दिवस ( World Vadapav Day) आहे. वडापाव हा अनेकांना आवडणारा पदार्थ आहे. तो खाण्यास कमी वेळ लागत असल्यानं धावपळीच्या आयुष्यात अनेकदा तात्पुरती भूक भागवण्यासाठी वडा-पावचा आधार घेतला जातो. अनेक मुंबईकरांसाठी नाश्ता, लंच, डिनर सर्व काही वडापाव असतो.  मुंबईतील वेगवेगळ्या भागात वडापाव प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर पुण्यातील वडापावनंही (Vadapav in Pune) खवय्यांच्या मनात खास जागा केली आहे.  पुण्यातील कॅम्प परिसरातली गार्डनचा वडापाव (Garden Vadapav, Pune) हा देखील चांगलाच प्रसिद्ध आहे. जागतिक वडापाव दिवसानिमित्त या वडापावची आपण वैशिष्ट्यं जाणून घेऊ या. या वडापावचे सध्याचे मालक नंदू नायकू यांच्या आई-वडिलांनी 50 वर्षांपूर्वी म्हणजेच 1972 साली कॅम्पमधील गार्डन भागात हा वडापाव सुरू केला आहे. तेव्हापासूनच हा वडापाव पुणेकर खवय्यांचा लाडका वडापाव म्हणून ओळखला जातो. या वडापावची खासियत म्हणजे हा वडापाव इतर वडापावपेक्षा आकारानं मोठा असतो. तसेच या वडापावसोबत मिळणाऱ्या मिरचीची चव देखील इतर मिरचीपेक्षा वेगळी आहे.तसंच सोबत देण्यात येणारा चटणीही चविष्ट असते, असं ग्राहक सांगतात. 144 वर्षांच्या लज्जतदार चवीची अखंड परंपरा, 4 पिढ्यांनी जपलं पुणेकरांशी नातं, VIDEO पाच ते सहा हजार वडापावची दररोज विक्री हा वडापाव एवढा फेमस आहे की वडापाव घेण्यासाठी लोकांची रांग तर लागतेच त्यासोबतच रस्त्याच्या दुतर्फा देखील लोक वडापाव खात उभे असतात. एका वडापावची किंमत 20 रुपये असून   दिवसाला पाच ते सहा हजार वडापावची रोज विक्री असते असं नायकू यांनी यावेळी सांगितलं. सकाळी नऊ वाजता ते रात्री दहा वाजेपर्यंत हा वडापाव उपलब्ध असतो. त्याचबरोबर कुणाला घरपोच वडापाव हवा असेल तर स्विगी किंवा झोमॅटोवरूनही तुम्ही तो मागू शकतो. पुण्यात घरपोच हा वडापाव मिळत असला तरी प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन तो खाण्याची मजा काही औरच आहे.

    गुगल मॅप वरून साभार

    वडापावचा पत्ता  GV9H+247, जेजे गार्डन, कॅम्प, पुणे, महाराष्ट्र 411001 हा गार्डनच्या वडापावचा पत्ता आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात