मराठी बातम्या /बातम्या /मनी /टाटा ग्रूपला 'ग्लोबल टी'चा दर्जा मिळवून देणाऱ्या या जवळच्या व्यक्तीलाच गमवलं, रतन टाटा झाले भावुक

टाटा ग्रूपला 'ग्लोबल टी'चा दर्जा मिळवून देणाऱ्या या जवळच्या व्यक्तीलाच गमवलं, रतन टाटा झाले भावुक

रतन टाटांच्या अतिशय जवळच्या व्यक्तीचं निधन; चहा उद्योगात दिलं होतं महत्त्वाचं योगदान

रतन टाटांच्या अतिशय जवळच्या व्यक्तीचं निधन; चहा उद्योगात दिलं होतं महत्त्वाचं योगदान

रतन टाटांच्या अतिशय जवळच्या व्यक्तीचं निधन; चहा उद्योगात दिलं होतं महत्त्वाचं योगदान

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

    मुंबई: टाटा उद्योग समूहानं उद्योगपती रतन टाटांच्या मार्गदर्शनाखाली विविध क्षेत्रांमध्ये यशस्वी वाटचाल सुरू ठेवली आहे. या वाटचालीमध्ये अनेक सहकाऱ्यांनी रतन टाटांना मदत केली आहे. मात्र, यातील एका सहकाऱ्यानं टाटांची साथ सोडली आहे.

    रतन टाटा यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे टाटा सन्सचे माजी संचालक आर. के. कृष्णकुमार यांचं निधन झालं आहे. ते 84 वर्षांचे होते. टाटा चहाला जगात दुसऱ्या क्रमांकावर पोहोचवण्याचं श्रेय कृष्णकुमार यांनाच जातं. कृष्णकुमार सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि रतन टाटा ट्रस्टचे विश्वस्तही होते.

    रतन टाटा झाले भावुक

    आर. के. कृष्णकुमार यांच्या निधनाबद्दल रतन टाटा यांनी शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले, "माझे मित्र आणि सहकारी आर. के. कृष्णकुमार यांच्या निधनानं मला जे दु:ख झालं आहे ते शब्दांत व्यक्त करता येणार नाही. ते एक असे नेते होते, ज्यांच्याशी माझे केवळ व्यावसायिकच नव्हे तर वैयक्तिक संबंधदेखील चांगले होते.

    हे सौहार्दपूर्ण संबंध नेहमीच माझ्या स्मरणात राहतील. ते टाटा समूहातील एक खरे सैनिक होते." रतन टाटा यांच्या व्यतिरिक्त टाटा सन्सचे विद्यमान अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनीदेखील कृष्णकुमार यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.

    Ratan Tata : कोणत्याही उद्योजकानं रतन टाटांकडून शिकाव्या अशा 4 गोष्टी

    कृष्णकुमार यांनी टाटा कंपनीच्या अनेक उद्योगांमध्ये महत्त्वाचं योगदान दिलं आहे. पण, टाटांच्या 'इंडियन हॉटेल्स' या कंपनीमध्ये त्यांचं विशेष योगदान होतं. सन 2000 मध्ये, त्यांच्याच नेतृत्वाखाली टाटांनी टेटली ही ब्रिटिश कंपनी 271 दशलक्ष पाऊंड्समध्ये विकत घेतली होती.

    कृष्णकुमार यांच्या नेतृत्वाखाली कंपनीनं चहाचा व्यवसाय जगभर पसरवला. त्यांच्या नेतृत्वाखाली टाटा ब्रेव्हरेज व्यवसायानं जगात दुसऱ्या क्रमांकाचं स्थान मिळवलं. 2013 पर्यंत आर. के. कृष्णकुमार हे इंडियन हॉटेल्सचे उपाध्यक्ष होते.

    Ratan Tata unknown Facts : आई-वडील नाही तर 'या' खास व्यक्तीनंं सांभळलं रतन टाटांना

    स्टारबक्समध्ये महत्त्वाची भूमिका

    आज ज्या स्टारबक्सची जगभरात चर्चा आहे, त्याला खास बनवण्यात कृष्ण कुमार यांचं महत्त्वाचं योगदान आहे. स्टारबक्स आणि टाटांच्या जॉईंट व्हेंचरमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. उद्योग क्षेत्रातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना पद्मश्री सन्मानानंही गौरवण्यात आलं होतं.

    इंडियन हॉटेल्स असो किंवा टाटा ग्लोबल ब्रेव्हरेजेस, दोन्ही कंपन्यांमधील त्यांचं योगदान कौतुकास्पद आहे. टाटा कंझ्युमरअंतर्गत, टाटा कॉफी, टेटली आणि स्टारबक्सनं संपूर्ण जगात आपला ठसा उमटवला आहे. इंडियन हॉटेल्सअंतर्गत ताज, विवांता, जिंजर आणि ताज एअरनं आपली ओळख निर्माण केली आहे.

    First published:
    top videos

      Tags: Ratan tata, Tata group