मराठी बातम्या /बातम्या /मनी /

World Entrepreneurs' Day: आता तुम्हीही सुरू करू शकता स्वतःचा व्यवसाय, केंद्र सरकार देतंय 10 लाखापर्यंतची मदत

World Entrepreneurs' Day: आता तुम्हीही सुरू करू शकता स्वतःचा व्यवसाय, केंद्र सरकार देतंय 10 लाखापर्यंतची मदत

प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) एक नॉन-कॉर्पोरेट, नॉन-अग्रीकल्चर योजना आहे. 8 एप्रिल 2015 पासून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. यात कमी व्याजदरात 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज (Business loan) मिळते.

नवी दिल्ली 21 ऑगस्ट : आज (21 ऑगस्ट) जगभरात ‘जागतिक उद्योजक दिन’ (World Entrepreneurs’ Day 2021) साजरा केला जात आहे. यानिमित्त आज आम्ही तुम्हाला मोदी सरकारच्या (Modi government) एका खास योजनेबाबत माहिती देत आहोत. या योजनेच्या माध्यमातून तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता. ज्यांना व्यवसाय सुरू (Start your own business) करण्याची इच्छा आहे मात्र, त्यासाठी भांडवल नाही, अशा लोकांसाठी शासन स्वस्तात कर्ज सुविधा देत आहे. या योजनेला प्रधानमंत्री मुद्रा योजना (Pradhan Mantri Mudra Yojana) या नावाने ओळखलं जातं. चला तर मग या योजनेबाबत अधिक माहिती जाणून घेऊया.

काय आहे प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) ?

प्रधानमंत्री मुद्रा योजना (PMMY) एक नॉन-कॉर्पोरेट, नॉन-अग्रीकल्चर योजना आहे. 8 एप्रिल 2015 पासून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. यात कमी व्याजदरात 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज (Business loan) मिळते. कुठल्याही व्यावसायिक बँक, क्षेत्रीय ग्रामीण बँक (RRB), लघु वित्त बँक, सहकारी बँक, एमएफआय आणि एनबीएफसीमधून हे कर्ज घेता येते. या योजनेच्या (Mudra Yojana) मदतीने देशात उद्योगधंदे, रोजगार वाढावा हा सरकारचा मानस आहे. विक्रेते, ट्रेडर्स आणि दुकानदारांना मुद्रा लोन (Business loan from govt) दिले जाते. याशिवाय मधमाशीपालन, कुक्कुटपालन, मत्स्यपालन अशा कृषीपूरक उद्योगांसाठी देखील ही योजना लागू आहे.

Gold Price Today: मुंबईत सोन्याचे दर 46 हजारांपेक्षा जास्त,आजही किंमतीत मोठा बदल

तीन प्रकारांमध्ये मिळतं लोन

शिशू (Mudra Sishu ), किशोर (Mudra Kishor ) आणि तरुण (Mudra Tarun) या तीन प्रकारांमध्ये ही योजना विभागण्यात आली आहे. शिशू विभागासाठी 50 हजार रुपयांपर्यंत, किशोर प्रकारामध्ये 50 हजार ते 5 लाख रुपये आणि तरुण प्रकारामध्ये 10 लाख रुपयांचे लोन घेता येऊ शकते.

असा कराल लोनसाठी अर्ज

मुद्रा लोन घेण्यासाठी एका अर्जासोबत आधार कार्ड, वोटर आयडी, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स यांपैकी एक ओळखपत्र द्यावे लागेल. रहिवासी दाखला म्हणून वीज बिल, टेलिफोन बिल, गॅस बिल, पाणी बिल यांपैकी काहीही देऊ शकता. याशिवाय तुम्हाला बिजनेस सर्टिफिकेट जमा करावं लागेल. जर मुद्रा लोन घेणारी व्यक्ती महिला असेल तर तिला व्याजदरात आणखी ०.२५ टक्क्यांची सूट मिळते.

वाढणार भारत सरकारचा IT क्षेत्रावरील खर्च, वाचा 2022 पर्यंत किती होईल वाढ

अशा प्रकारे या सरकारी योजनेचा लाभ घेऊन, तुम्हीही आपला स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता. चला तर मग आजच्या दिवसापासूनच करूया सुरुवात नव्या व्यवसायचा विचार करायला.

First published:

Tags: Business News, Loan, Scheme