मुंबई, 21 ऑगस्ट: आज भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत (Gold-Silver Price Today) तेजी पाहायला मिळाली आहे. गुड रिटर्न्स वेबसाइटवरील माहितीनुसार 22 कॅरेट सोन्याच्या भाव 46,600 रुपये आहे. सोन्याच्या दरात (Gold Rates Today) आज 270 रुपयांची वाढ झाली आहे. आधीच्या सत्रात सोन्याचे दर 46,130 रुपये प्रति तोळा होते. दरम्यान सोन्याच्या उलट आज चांदीचे दर (Silver Rates Today) कमी झाले आहेत. चांदीच्या दरात 300 रुपयांची घसरण होऊन दर 62,200 रुपये प्रति तोळावर पोहोचले आहेत. आज मुंबईत 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर 46 हजारांपेक्षा जास्त आहेत. जाणून घ्या महत्त्वाच्या शहरांमध्ये आज सोन्याचांदीचे दर किती आहेत. जाणून घ्या काय आहेत महत्त्वाच्या शहरातील सोन्याचे दर मुंबई- 46,400 रुपये प्रति तोळा (22 कॅरेट), 47,400 रुपये प्रति तोळा (24 कॅरेट) दिल्ली- 46,400 रुपये प्रति तोळा (22 कॅरेट) पुणे- 45,590 रुपये प्रति तोळा (22 कॅरेट), 48,8100 रुपये प्रति तोळा (24 कॅरेट) नागपूर- 46,400 रुपये प्रति तोळा (22 कॅरेट), 47,400 रुपये प्रति तोळा (24 कॅरेट) नाशिक- 45,550 रुपये प्रति तोळा (22 कॅरेट), 48,750 रुपये प्रति तोळा (24 कॅरेट) हे वाचा- EPFO Update: निवृत्तीआधी नोकरी सोडल्यास PF च्या रकमेवर व्याज मिळणार का? 9800 रुपयांनी स्वस्त आहेत दर गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये सोन्याचे दर 56,200 रुपये प्रति तोळाच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचले होते. आता सराफा बाजारात सोन्याचे दर 46,400 रुपये प्रति तोळावर आहेत. अर्थात जवळपास 9800 रुपयांनी सोन्याचे दर कमी आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







