• Home
 • »
 • News
 • »
 • money
 • »
 • वाढणार भारत सरकारचा IT क्षेत्रावरील खर्च, वाचा 2022 पर्यंत किती होईल वाढ

वाढणार भारत सरकारचा IT क्षेत्रावरील खर्च, वाचा 2022 पर्यंत किती होईल वाढ

ग्लोबल अॅडव्हायझरी फर्म गार्टनरने गुरुवारी अशी माहिती दिली आहे की, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठी (IT Sector) सरकारी (Indian government news) खर्च 2022 मध्ये 8.6 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज (Indian government IT expenditure) आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 20 ऑगस्ट: ग्लोबल अॅडव्हायझरी फर्म गार्टनरने गुरुवारी अशी माहिती दिली आहे की, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठी (IT Sector) सरकारी (Indian government news) खर्च 2022 मध्ये 8.6 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज (Indian government IT expenditure) आहे. चालू 2021 या वर्षात आयटी क्षेत्रासाठी 13.2 टक्के वाढ अपेक्षित आहे. गार्टनरमधील वरिष्ठ संशोधन विश्लेषक अपेक्षा कौशिक यांनी अशी माहिती दिली आहे की, 'जागतिक महामारीमुळे 2020 मध्ये भारत सरकारच्या संस्थांना डिजिटल करण्याच्या पुढाकाराने मोठी झेप घेतली. साथीच्या आजाराने सरकारला त्यांचे प्राधान्यक्रम बदलण्यास भाग पाडले आहे.' त्यांनी अशी माहिती दिली आहे की, देशभरात लसीकरणाचा दर वाढल्याने सार्वजनिक आरोग्य सुधारत आहे आणि सरकार डिजिटायझेशनच्या (Digitization in India) प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करत राहतील. हे वाचा-कधी पाहिलं आहे का तरंगणारं ATM? ग्राहकांसाठी SBI ने सुरू केली ही खास सेवा किती वाढेल खर्च? गार्टनरच्या माहितीनुसार, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठी 2022 मध्ये सरकारी खर्च 8.6 टक्क्यांनी वाढू शकतो. अहवालाच्या मते, सॉफ्टवेअरवरील खर्च 2022 मध्ये 24.7 टक्के वाढून 182.3 कोटी अमेरिकन डॉलर होईल. तर डेटा सेंटरमधील खर्चाची वाढ घटेल आणि 2.2 टक्के असेल असा अंदाज आहे. गार्टनरच्या अहवालाच्या मते, दूरसंचार सेवांवरील एकूण खर्चात एक टक्क्याने घट अपेक्षित आहे.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: