Home /News /money /

World Best Companies: Apple ते Google, या 5 अमेरिकन कंपन्या जगावर करतात राज्य

World Best Companies: Apple ते Google, या 5 अमेरिकन कंपन्या जगावर करतात राज्य

World Best Companies: Apple ते Google, या 5 अमेरिकन कंपन्या जगावर करतात राज्य

World Best Companies: Apple ते Google, या 5 अमेरिकन कंपन्या जगावर करतात राज्य

World Best Companies: आजच्या घडीला प्रत्येक क्षेत्रात अमेरिकन कंपन्यांचा दबदबा आहे, या कंपन्यांमुळंच अमेरिका महासत्ता बनू शकली.

    मुंबई, 30 जुलै: अमेरिका ही जगातील एक महासत्ता आहे, या शक्तीमागे अमेरिकेची मजबूत अर्थव्यवस्था आहे. अमेरिकन अर्थव्यवस्थेला सर्वात जास्त शक्ती अमेरिकन कंपन्यांकडून मिळते. आजच्या घडीला प्रत्येक क्षेत्रात अमेरिकन कंपन्यांचा दबदबा आहे, या कंपन्यांमुळंच अमेरिका महासत्ता बनू शकली. आज आम्ही तुम्हाला अमेरिकेतील 5 सर्वोत्तम कंपन्यांबद्दल सांगत आहोत, ज्या जगभरात प्रसिद्ध (World Best Companies) आहेत. 1. Apple (अ‍ॅपल)- अ‍ॅपल कंपनीचे बहुतेक मोबाईल जगभर वापरले जातात. अ‍ॅपल कंपनी केवळ अमेरिकेतच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. मार्केट कॅपनुसार ही सर्वात मोठी यूएस कंपनी आहे. Apple कंपनीची स्थापना 1 एप्रिल 1976 रोजी झाली. आकडेवारीनुसार या कंपनीत काम करणारा प्रत्येक तिसरा कर्मचारी भारतीय आहे. सौदी अरामको (Saudi Aramco) ही जगातील एकमेव कंपनी अॅपलच्या पुढे आहे. आज अ‍ॅपल मोबाईल फोन मार्केटचा राजा आहे. 28 जुलै 2022 पर्यंत, Apple चे मार्केट कॅप 2.54 ट्रिलियन डॉलर आहे. या कंपनीला या पदापर्यंत पोहोचवण्याचं श्रेय स्टीव्ह जॉब्स यांना जातं. या कंपनीत सुमारे 1,54,000 कर्मचारी आहेत. 2. मायक्रोसॉफ्ट (Microsoft)- मायक्रोसॉफ्ट ही जगातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी आहे. मायक्रोसॉफ्ट ही यूएस स्टॉक मार्केटमधील सर्वात मोठी ट्रेडिंग कंपनी आहे. 28 जुलै 2022 रोजी यूएस स्टॉक मार्केटमध्ये मायक्रोसॉफ्टचे मार्केट कॅप 2.01 ट्रिलियन डॉलर होते. या कंपनीची सुरुवात विंडोज सॉफ्टवेअरनं केली होती, जी आज जगभरात त्याच्या सॉफ्टवेअरसाठी ओळखली जाते. या कंपनीत 1.81 लाख नियमित कर्मचारी आहेत. तिची स्थापना 4 एप्रिल 1975 रोजी बिल गेट्स यांनी केली होती. हेही वाचा- ATM Card वर मिळतो 5 लाखांपर्यंतचा विमा, क्लेमसाठी 'हे' नियम माहीत असणं आवश्यक 3. Google (ALPHABET Inc.)- गुगल ही अमेरिकन कंपनी आहे. तिचे मुख्यालय कॅलिफोर्निया येथे आहे. Google ची स्थापना 1998 मध्ये लॅरी पेज आणि सर्जी ब्रिन यांनी केली होती. सध्या गुगलमध्ये सुमारे 139,995 कर्मचारी आहेत. या कंपनीचे मार्केट कॅप (Google Market Cap) 1.49 ट्रिलियन डॉलर आहे. ही कंपनी इंटरनेटवर आधारित अनेक सेवा आणि उत्पादने विकसित करते. या कंपनीचा जगभरात दबदबा आहे. 4. अ‍ॅमेझॉन (Amazon)- अमेझॉन ही एक अमेरिकन बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपनी आहे, जी जगातील सर्व ई-कॉमर्स कंपन्यांमध्ये प्रथम क्रमांकावर आहे. या कंपनीच्या माध्यमातून कोणतीही व्यक्ती आपली वस्तू विकू शकते आणि कोणीही ती वस्तू खरेदी करू शकते. सध्या Amazon चे मार्केट कॅप 1.23 ट्रिलियन डॉलर आहे. या कंपनीची सुरुवात ऑनलाइन पुस्तक विक्रीने झाली आणि आज कंपनी जगभरातील प्रत्येक वस्तूची विक्री करत आहे. या कंपनीचे संस्थापक जेफ बेझोस आहेत. Amazon मध्ये सुमारे 1.6 दशलक्ष पूर्णवेळ कर्मचारी आहेत. 5. टेस्ला (Tesla)- टेस्ला कंपनीसाठी 2021 हे वर्ष सर्वोत्कृष्ट ठरले, परंतु या वर्षी कंपनीचे मार्केट कॅप सातत्याने घसरले आहे. मात्र, घसरणीनंतरही ही कंपनी अमेरिकेतील टॉप-5 कंपन्यांमध्ये कायम आहे. सध्या टेस्लाचे मार्केट कॅप 736 अब्ज डॉलर आहे. टेस्लाचे मुख्यालय कॅलिफोर्नियामध्ये आहे. ही कंपनी सर्वोत्तम इलेक्ट्रिक कारसाठी ओळखली जाते. याशिवाय कंपनी सोलर पॅनल्सची निर्मितीही करते. एलोन मस्क हे टेस्ला कंपनीचे सीईओ आहेत.
    Published by:Suraj Sakunde
    First published:

    Tags: America, Apple, Google, Microsoft

    पुढील बातम्या