मराठी बातम्या /बातम्या /मनी /

ATM Card वर मिळतो 5 लाखांपर्यंतचा विमा, क्लेमसाठी 'हे' नियम माहीत असणं आवश्यक

ATM Card वर मिळतो 5 लाखांपर्यंतचा विमा, क्लेमसाठी 'हे' नियम माहीत असणं आवश्यक

ATM Card वर मिळतो 5 लाखांपर्यंतचा विमा, क्लेमसाठी हे नियम माहीत असणं आवश्यक

ATM Card वर मिळतो 5 लाखांपर्यंतचा विमा, क्लेमसाठी हे नियम माहीत असणं आवश्यक

ATM Card Insurance: एटीएम कार्डसह उपलब्ध सेवांपैकी सर्वात महत्त्वाची सेवा म्हणजे विनामूल्य विमा होय. मात्र, याबाबत माहिती नसल्यामुळं मोजकेच लोक या विम्याचा दावा करतात.

    मुंबई, 30 जुलै: आजच्या काळात एटीएम कार्ड (ATM Card)  न वापरणारे मोजकेच लोक असतील. प्रधानमंत्री जन-धन योजना (Pradhan Mantri Jan Dhan Yojana) आणि रुपे कार्डमुळं (RuPay Card) एटीएम आता प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनले आहेत. यामुळे रोख रकमेवरील अवलंबित्व तर कमी झाले आहेच, पण पैसा अधिक सुरक्षित आणि व्यवहार सुलभ झाला आहे. आता एखादी वस्तू घ्यायची असेल तर त्यासाठी मोठी रोकड घेऊन जाण्याची गरज नाही. एक छोटं एटीएम कार्ड सर्व काम करतं. याशिवाय, एटीएम कार्डसह, असे काही फायदे (ATM Card Benefits) आहेत, ज्याबद्दल लोकांना माहिती नाही. माहितीअभावी मोफत उपलब्ध असलेल्या आवश्यक सुविधा वापरण्यापासून लोक वंचित राहतात. बँकाही ग्राहकांना माहिती देत ​​नाहीत- एटीएम कार्डसह उपलब्ध सेवांपैकी सर्वात महत्त्वाची सेवा म्हणजे विनामूल्य विमा (ATM Card Insurance) होय. बँकेने ग्राहकाला एटीएम कार्ड जारी करताच, ग्राहकाला अपघाती विमा किंवा जीवन विमा मिळतो. मात्र, याबाबत माहिती नसल्यामुळं केवळ काही लोकच या विम्याचा दावा करतात. लोकांमधील आर्थिक साक्षरतेचा अभाव हे त्याचं एक प्रमुख कारण आहे. खेड्यापाड्यातील लोकांचा विसर पडला, सुशिक्षित शहरी लोकही एटीएमशी संबंधित अटी आणि शर्तींकडे लक्ष देत नाहीत. बँका त्यांच्या ग्राहकांना एटीएमद्वारे मिळणाऱ्या विम्याची माहितीही देत ​​नाहीत. कार्डनुसार तुम्हाला इतकं कव्हरेज मिळतं- जर एखादी व्यक्ती कोणत्याही राष्ट्रीयकृत आणि गैर-राष्ट्रीयीकृत बँकेचं एटीएम किमान 45 दिवस वापरत असेल, तर तो एटीएम कार्डसोबत येणाऱ्या विम्याचा दावा करण्यास पात्र ठरतो. बँका ग्राहकांना विविध प्रकारचे एटीएम कार्ड देतात. एटीएम कार्डच्या श्रेणीनुसार त्याच्यासोबत येणारी विम्याची रक्कम ठरवली जाते. ग्राहकांना क्लासिक कार्डवर (Classic Card)  01 लाख रुपये, प्लॅटिनम कार्डवर (Platinum Card) 02 लाख रुपये, नॉर्मल मास्टर कार्डवर (Master Card) 50,000 रुपये, प्लॅटिनम मास्टर कार्डवर (Platinum Master Card) 05 लाख  रुपये आणि व्हिसा कार्डवर (Visa Card) 1.5-02 लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण उपलब्ध आहे. प्रधानमंत्री जन-धन योजनेंतर्गत खातं उघडणाऱ्या ग्राहकांना 01 ते 02 लाख रुपयांपर्यंतचा विमा उपलब्ध आहे. हेही वाचा- ATMमधून पैसे निघाले नाहीत, मात्र खात्यातून रक्कम कट झालीये? लगेच करा हे काम एटीएम विम्याचा दावा कसा करावा? जर एटीएम कार्डधारक अपघाताचा बळी झाला आणि एका हातानं किंवा एका पायानं अपंग झाला तर त्याला 50 हजार रुपयांचं संरक्षण मिळतं. त्याचप्रमाणं, दोन्ही हात किंवा दोन्ही पाय गमावल्यास, 01 लाख रुपयांचा विमा लाभ उपलब्ध आहे. मृत्यूच्या बाबतीत, कार्डवर अवलंबून, कव्हरेज रु. 01 लाख ते रु. 05 लाखांपर्यंत असते. एटीएम कार्डसह उपलब्ध असलेल्या विम्याचा दावा करण्यासाठी, कार्डधारकाच्या नॉमिनीला संबंधित बँकेकडं अर्ज करावा लागेल. बँकेत एफआयआरची प्रत, हॉस्पिटलमधील उपचाराचं प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रं सादर केल्यावर विमा दावा प्राप्त होतो. मृत्यू झाल्यास, कार्डधारकाच्या नामनिर्देशित व्यक्तीनं मृत्यू प्रमाणपत्र, एफआयआर प्रत, आश्रित प्रमाणपत्र, मृत व्यक्तीच्या प्रमाणपत्राची मूळ प्रत इत्यादी सादर करणं आवश्यक आहे.
    Published by:Suraj Sakunde
    First published:

    Tags: ATM, Insurance

    पुढील बातम्या