Home /News /money /

मंदीचं सावट असताना सोन्यामध्ये गुंतवणूक करणार आहात? त्याआधी जाणून घ्या या महत्त्वाच्या गोष्टी

मंदीचं सावट असताना सोन्यामध्ये गुंतवणूक करणार आहात? त्याआधी जाणून घ्या या महत्त्वाच्या गोष्टी

अनेक देशांमध्ये कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन आहे आणि जागतिक आर्थिक मंदीचे संकट आहेच, या दोन्ही कारणांचा नकारात्मक परिणाम सोन्याच्या पुरवठ्यावर झाला आहे.

    नवी दिल्ली, 30 मार्च : आंतरराष्ट्रीय बाजारापासून ते अगदी देशांतर्गत बाजारात सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील जाणकारांनुसार 2008 नंतर सोन्याच्या किंमतींमध्ये एवढी प्रचंड वाढ झाली आहे आहे. जगभरातील अहवालांनुसार, अनेक देशांमध्ये कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन (Coronavirus Lockdown) आहे आणि जागतिक आर्थिक मंदीचे संकट आहेच, या दोन्ही कारणांचा नकारात्मक परिणाम सोन्याच्या पुरवठ्यावर झाला आहे. परिणामी सोन्याला झळाळी मिळाली आहे. जागतिक अर्थव्यवस्था डळमळीत कोरोना व्हायरसमुळे युरोप आणि अमेरिकेतील विकसीत देशांची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. काही मीडिया अहवालांनुसार अमेरिकेत बेरोजगारी वाढली आहे. अशातच अनेक देशांच्या जीडीपीमध्ये मोठी घसरण झाली आहे. या एकंदरित परिस्थितीमध्ये सोन्यामध्ये केली जाणारी गुंतवणूक सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जात आहे. काय आहेत सोन्याचे भाव? 26  मार्चपर्यंत एमसीएक्स सोन्याची स्पॉट किंमत प्रति तोळा 41,000 इतकी होती. तर वायदे बाजारात सोन्याची एप्रिलमधील किंमत प्रति तोळा 43 हजारांच्या पुढे होती. गेल्या 12 महिन्यांचा अहवाल पाहिला तर सोन्यामध्ये मिळालेला रिटर्न 28 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. तर गेल्या 10 वर्षांत सोन्यातून 10 टक्के रिटर्न मिळाला आहे. मंदीमध्ये सोन्याची गुंतवणूक कशी ठरेल फायद्याची? बहुतेक गुंतवणूकदार मंदीच्या वेळी त्यांच्या सोन्याच्या गुंतवणूकीवर अवलंबून असतात. जेव्हा मंदी सुरू होते तेव्हा गुंतवणूकदारांनी त्यांची सर्व मालमत्ता लिक्विडेट करतात. अशा संकटांच्या वेळी गुंतवणूकदारांसमोर एक प्रश्न असतो, तो म्हणजे लिक्विडेट केलेली पैसे कुठे गुंतवायचे? त्यावेळी सोन्यामध्ये गुंतवणूक करणे फायद्याचे ठरते.  सोने हे सेफ-हेवन संपत्ती मानले जाते. अमेरिकेत व्याजदरांमध्ये कपात अमेरिकेमध्ये व्याजदरामध्ये कपात झाल्यानंतर सोन्याच्या किंमती वाढल्या आहेत. जेव्हा एखाद्या केंद्रीय बँकेकडून व्याजदरामध्ये कपात केली जाते, त्यावेळी गुंतवणूकीचा ओघ वाढतो. अशावेळी स्टॉक्स किंवा बाँड्समध्ये कमी गुंतवणूक केली जाते तर सोन्यामध्ये गुंतवणूक सुरक्षित मानली जाते. अमेरिकेमध्ये व्याजदर कमी असेल तर सोन्याच्या किंमती वाढतात. व्याजदर जितका वाढेल, तेवढेच सोन्याचे भाव देखील कमी होतात. कमी महागाई दरात सोन्यात गुंतवणूक करावी? पारंपरिक पद्धतीने लक्षात घेतलं तर, महागाईपासून वाचण्यासाठी सोन्यामध्ये गुंतवणूक फायद्याची मानली जाते. कमी महागाई दर असताना चलनाचे मूल्य कमी असते, अशावेळी गुंतवणूकदार सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यास पसंती देतात. सोन्याला सुरक्षित गुंतवणूक मानण्यात येते अन्य बातम्या SBI पाठोपाठ या बँकेच्या ग्राहकांसाठी खूशखबर, व्याजदरांमध्ये मोठी कपात घरबसल्या करू शकाल PM CARE Fund मधून गरजूंना मदत,डोनेशनच्या रकमेवर टॅक्समध्ये सूट
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या