मराठी बातम्या /बातम्या /मनी /Google मध्येही तयार झाली आहे कामगार संघटना, कंपनीतील शोषणाविरुद्ध लढणार

Google मध्येही तयार झाली आहे कामगार संघटना, कंपनीतील शोषणाविरुद्ध लढणार

जगातील अग्रगण्य आयटी कंपनी गुगलमध्येही (Google) व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांमध्ये धुसफूस आहे आणि आता 200 कर्मचाऱ्यांनी गुप्तपणे कामगार संघटना स्थापन केली आहे अशी बातमी समोर आली आहे.

जगातील अग्रगण्य आयटी कंपनी गुगलमध्येही (Google) व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांमध्ये धुसफूस आहे आणि आता 200 कर्मचाऱ्यांनी गुप्तपणे कामगार संघटना स्थापन केली आहे अशी बातमी समोर आली आहे.

जगातील अग्रगण्य आयटी कंपनी गुगलमध्येही (Google) व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांमध्ये धुसफूस आहे आणि आता 200 कर्मचाऱ्यांनी गुप्तपणे कामगार संघटना स्थापन केली आहे अशी बातमी समोर आली आहे.

नवी दिल्ली, 06 जानेवारी: जगभरात सगळीकडे कंपनी व्यवस्थापन आणि कर्मचारी यांच्यात वाद हे असतातच.  IT क्षेत्रातील कर्मचाऱ्यांमध्येही सगळंच आलबेल असतं असं काही नाही. त्यांचे प्रश्न जगासमोर येत नाहीत म्हणून ते सुखात आहे असं वाटत राहतं पण प्रत्यक्ष ते तसं नसतं. जगातील अग्रगण्य आयटी कंपनी गुगलमध्येही (Google) व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांमध्ये धुसफूस आहे आणि आता 200 कर्मचाऱ्यांनी गुप्तपणे कामगार संघटना स्थापन केली आहे अशी बातमी समोर आली आहे. गुगलची कंपनी अल्फाबेटच्या कामगार संघटनेतील काही नेत्यांनी न्यूयॉर्क (New York Times) टाइम्समध्ये लेख लिहून आपली उद्दिष्ट स्पष्ट केली आहेत. कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या हितांचं रक्षण करणं हेच अल्फाबेट वर्कर्स युनियनचं उद्दिष्ट आहे असं या लेखात म्हटलं आहे. सॅन फ्रान्सिस्कोमधील 225 इंजिनीयर कर्मचाऱ्यांनी ही कामगार संघटना बनवली असून अमेरिकी तंत्रज्ञान उद्योगाच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी युनियन तयार करण्यात आली आहे.

(हे वाचा-पुण्यातील बजाज फायनान्सवर RBI ची मोठी कारवाई, यामुळे ठोठावला 2.5 कोटींचा दंड)

कंपनीच्या नियमांविरुद्ध दाद मागणे आणि युनियन तयार करण्याचा प्रयत्न करणं अशी कारणं देत गुगलने आपल्या अनेक कर्मचाऱ्यांना निलंबित केलं होतं. त्यामुळे अमेरिकेतील लेबर रेग्युलेटरची गुगलवर करडी नजर होती. पण आपण कायद्यानुसार कारवाई केल्याचं गुगलचं म्हणणं होतं.

गुप्तपणे तयार केली युनियन

साधारणपणे कंपन्या कर्मचाऱ्यांना कामगार संघटना तयार करू देत नाहीत. तसा प्रयत्न झालाच तर तो लगेच मोडून काढला जातो. गुगलच्या कर्मचाऱ्यांनी गुप्तपणे संघटना तयार केली आणि तिचं नाव कंपनीच्या नावावरून अल्फाबेट वर्कर्स युनियन (Alphabet Workers Union) असं ठेवलं. डिसेंबर 2020 मध्ये पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकाही झाल्या.

(हे वाचा-नवीन वर्षात पहिल्यांदा वधारले पेट्रोल-डिझेलचे दर, वाचा काय आहेत आजचे भाव)

आम्ही गेल्या अनेक वर्षांपासून कामगार संघटना तयार करण्याचा प्रयत्न करत होतो, त्याचप्रमाणे 'कम्युनिकेशन्स वर्कर्स कार्ड ऑफ अमेरिका'वर 226 कामगारांनी सह्या केल्या आहेत, असं कामगार नेत्यांनी लिहिलेल्या लेखात म्हटलं आहे. गुगलच्या पीपल्स ऑपरेशन्स विभागाच्या डायरेक्टर कारा सिल्वस्टिन म्हणाल्या, कामगारांचे श्रम अधिकार संरक्षित असून आम्ही त्याचा आदर करतो. पण जसं आम्ही आतापर्यंत केलंय तसंच आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांशी थेट संपर्कात राहणार आहोत आणि त्यांच्याशी संवाद साधणार आहोत.

गुगल बेकायदेशीरपणे कर्मचाऱ्यांची चौकशी करत आहे असा आरोप अमेरिकेतील श्रम नियामक संस्थेने कंपनीवर लावला आहे. यापैकी बऱ्याच जणांनी कंपनीच्या धोरणांचा विरोध केला होता आणि संघटना तयार करण्याचाही प्रयत्न केला होता. त्यानंतर त्यांना नोकरीवरून काढण्यात आलं होतं. पण गुगलला विश्वास आहे की त्यांनी केलेली कारवाई कायदेशीरच होती.

First published:

Tags: Google