मुंबई, 31 मे : तुम्हाला जर पैसे कमवायचे असतील आणि त्यासाठी चांगल्या कामाच्या शोधात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. तुम्ही भारतीय रेल्वेशी (Indian Railway) कनेक्ट होऊन चांगले पैसे कमवू शकता. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) हा भारतीय रेल्वेचाच एक भाग आहे. यामध्ये तिकीट बुकिंगपासून (Ticket Booking) अनेक प्रकारच्या सुविधा देण्यात येतात. तुम्हीदेखील IRCTC सोबत तिकीट एजंट म्हणून काम करून महिन्याला चांगले पैसे कमवू शकता. महत्त्वाचं म्हणजे यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याचीही गरज नाही. तुम्ही जिथे असाल तिथून हे काम करू शकता. तुम्ही बुक केलेल्या तिकिटावर IRCTC तुम्हाला कमिशन देईल. आज अनेक लोक तिकीट एजंट होऊन चांगली कमाई करत आहेत. तिकीट एजंट होण्यासाठी तुम्हाला थोडी फी भरावी लागेल. पेट्रोल पंप चालकांचं कमिशनसाठी आंदोलन, जवळपास 70 हजार पंप चालकांनी इंधन खरेदी थांबवली तिकीट एजंट होण्यासाठी काय करावं लागेल? ज्याप्रमाणे रेल्वे काउंटरवर (Railway ticket counter) क्लार्क तिकीट काढतात, त्याचप्रमाणे तुम्हाला प्रवाशांनाही तिकिटं काढून द्यावी लागतील. तिकीट एजंट होण्यासाठी तुम्हाला IRCTC वेबसाइटवर जाऊन फॉर्म भरावा लागेल. IRCTC ने तुमचा अर्ज मंजूर केल्यावर तुम्ही अधिकृत तिकीट बुकिंग एजंट (Ticket booking agent) व्हाल आणि रेल्वे तिकिटं आणि विमानाची तिकिटं बुक करू शकाल. कमिशन किती मिळतं? IRCTC नॉन-एसी कोचचं तिकीट बुक करण्यासाठी तिकीट एजंटला प्रतितिकीट 20 रुपये आणि एसी तिकिटासाठी 40 रुपये कमिशन देते. याशिवाय तिकिटाच्या किमतीच्या एक टक्के रक्कमही एजंटला दिली जाते. तिकीटांच्या संख्येवर कोणतीही मर्यादा नाही. म्हणजेच तुम्ही तुमच्या एजन्सीच्या नावाने महिनाभरात कितीही तिकिटं बुक शकता आणि त्यावर कमिशन मिळवू शकता. IRCTCने तुमचा अर्ज मंजूर केल्यानंतर रेल्वे तिकिटांसह तुम्ही देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान प्रवासाचं (Flight Tickets) तिकीटदेखील बुक करू शकता. महागाईचा आणखी एक झटका; 1 जूनपासून महागणार या वस्तू, तुमच्यावर काय होणार परिणाम? तिकीट एंजट बनण्यासाठी फी किती? जर एखाद्या व्यक्तीला एका वर्षासाठी एजंट बनायचं असेल तर त्याला 3,999 रुपये फी भरावी लागेल. त्याचप्रमाणे दोन वर्षांसाठी 6,999 रुपये फी आहे. त्याचबरोबर एजंट म्हणून एका महिन्यात 100 तिकिटांचं बुकिंग करण्यासाठी प्रत्येक तिकिटासाठी 10 रुपये फी भरावी लागेल, तर एका महिन्यात 100 ते 300 तिकिटं बुक करण्यासाठी प्रतितिकीट आठ रुपये फी द्यावी लागेल. एका महिन्यात 300 पेक्षा जास्त तिकिटं बुक करण्यासाठी प्रति तिकिटासाठी 5 रुपये फी भरावी लागेल. अशा रितीने तुम्ही तिकीट एजंट होऊन घरबसल्या पैसे कमवू शकता. तुम्ही जितकी जास्त तिकिटं बुक कराल, तितकं जास्त कमिशन तुम्हाला मिळतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.