मराठी बातम्या /बातम्या /मनी /महागाईचा आणखी एक झटका; 1 जूनपासून महागणार या वस्तू, तुमच्यावर काय होणार परिणाम?

महागाईचा आणखी एक झटका; 1 जूनपासून महागणार या वस्तू, तुमच्यावर काय होणार परिणाम?

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

पेट्रोल-डिझेल, गॅस आणि किराणामालाच्या दरांतील वाढ कायम आहे. अशातच आणखी एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.

  नवी दिल्ली 30 मे : पेट्रोल-डिझेल, गॅस आणि किराणामालाच्या दरांतील वाढ कायम आहे. अशातच आणखी एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. जून महिन्यापासून कारच्या किमतीत (Car Price) वाढ होणार आहे. थर्ड पार्टी मोटर व्हेईकल (Third Party Motor Vehicle Insurance) इन्शुरन्सच्या किमती वाढल्याने कारच्या किमती वाढणार असल्याचं म्हटलं जातं आहे. थर्ड पार्टी मोटर व्हेईकल इन्शुरन्स जूनपासून महागणार आहे, त्यामुळे व्हेईकल इन्शुरन्सचा प्रीमियम वाढणार आहे. 1 जून 22 पासून सरकार काही नियम बदलणार आहे, त्यामध्ये थर्ड पार्टी मोटर व्हेईकल इन्शुरन्सचाही समावेश आहे. सरकारने याबद्दलची अधिसूचना आधीच प्रसिद्ध केली होती.

  Petrol Diesel Prices: कच्च्या तेलाच्या किंमतीत पुन्हा वाढ; चेक करा पेट्रोल-डिझेलचे नवे दर

  2019-20 मध्ये, प्रायव्हेट कार्सचा एका वर्षासाठीचा थर्ड पार्टी इन्शुरन्स 2072 रुपये होता, परंतु जून 2022 मध्ये दरवाढीनंतर तो 2094 रुपये असेल. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने यापूर्वीच अधिसूचना प्रसिद्ध करून याबद्दल माहिती दिली आहे. थर्ड पार्टी इन्शुरन्सची एका वर्षाच्या प्रीमियमची रक्कम कारच्या इंजिन क्षमतेवर किंवा सीसीवर अवलंबून असेल. 1000 सीसीपेक्षा कमी क्षमतेच्या कारसाठी विमा प्रीमियम 2094 रुपये असेल. 1000 ते 1500 सीसी कारसाठी थर्ड पार्टी इन्शुरन्स 3221 रुपयांवरून 3416 रुपयांपर्यंत वाढवण्यात आला आहे. 1500 सीसी पेक्षा जास्त क्षमतेच्या कारसाठी इन्शुरन्स प्रीमियम 7890 रुपयांवरून 7897 रुपये करण्यात आला आहे. या संदर्भात टीव्ही 9 हिंदीने वृत्त दिलंय.

  इलेक्ट्रिक व्हेईकलचे वाढणार दर

  इलेक्ट्रिक व्हेईकलचे (Electric Vehicle) दरही वाढणार आहेत. पॉवर आउटपुट 65 kW पेक्षा जास्त असलेल्या प्रायव्हेट इलेक्ट्रिक व्हेईकलसाठी 6712 रुपये इन्शुरन्स प्रीमियम भरावा लागणार आहे. 3 kW पेक्षा कमी क्षमतेच्या इलेक्ट्रिक स्कूटरसाठी प्रीमियम 457 रुपये असेल. 3 kW ते 7 kW इलेक्ट्रिक व्हेईकलसाठी इन्शुरन्स प्रीमियम 607 रुपये भरावा लागेल. 7 किलोवॅट ते 16 किलोवॅट क्षमतेच्या दुचाकींसाठी इन्शुरन्स प्रीमियम 1161 रुपये असेल तर 16 किलोवॅटपेक्षा जास्त क्षमतेच्या दुचाकींसाठी इन्शुरन्स प्रीमियम 2383 रुपये असेल. हे दर एका वर्षाच्या इन्शुरन्स प्रीमियमचे आहेत. विम्याचा नवा नियम 1 जूनपासून लागू होणार आहे.

  कार लोन EMI दीर्घकालीन फायदेशीर की हानिकारक? समजून घ्या संपूर्ण हिशेब

  दुचाकीही महागणार

  थर्ड पार्टी इन्शुरन्सचा प्रीमियम फक्त कार आणि इलेक्ट्रिक गाड्यांसाठीच नाही तर दुचाकींसाठीही वाढला आहे. 150 ते 350 सीसीच्या दुचाकीसाठी इन्शुरन्स प्रीमियम 1366 रुपये असेल, तर 350 सीसीपेक्षा जास्त क्षमतेच्या दुचाकीसाठी इन्शुरन्स प्रीमियम 2804 रुपये असेल. त्यामुळे 1 जूननंतर दुचाकीही महागणार आहेत.

  व्हेईकल इन्शुरन्ससंदर्भातील सरकारचा हा नवा आदेश 1 जूनपासून लागू होणार आहे. त्यामुळे दुचाकी आणि कार, तसंच इलेक्ट्रिक व्हेईकलच्या एका वर्षासाठीच्या थर्ड पार्टी इन्शुरन्सची किंमत महागणार आहे. यापूर्वी 2019-20 मध्ये सरकारने थर्ड पार्टी मोटर इन्शुरन्सच्या प्रीमियममध्ये वाढ केली होती. आता 2022 मध्ये पुन्हा वाढ करण्यात येत आहे. त्यामुळे वाहनांच्या किमती वाढणार असून वाहन खरेदी करण्याच्या विचारात असणाऱ्या नागरिकांच्या खिशांवर भार पडणार आहे.

  First published:
  top videos

   Tags: Car, Electric vehicles, Price hike