जाहिरात
मराठी बातम्या / बातम्या / पेट्रोल पंप चालकांचं कमिशनसाठी आंदोलन, जवळपास 70 हजार पंप चालकांनी इंधन खरेदी थांबवली

पेट्रोल पंप चालकांचं कमिशनसाठी आंदोलन, जवळपास 70 हजार पंप चालकांनी इंधन खरेदी थांबवली

पेट्रोल पंप चालकांचं कमिशनसाठी आंदोलन, जवळपास 70 हजार पंप चालकांनी इंधन खरेदी थांबवली

डीलर्स संघटनांचा आरोप आहे की ऑईल कंपन्या आणि डीलर्समधील करारानुसार, दर 6 महिन्यांनी आमचे मार्जिन बदलले पाहिजे, परंतु 2017 पासून त्यात कोणताही बदल झालेला नाही.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 31 मे : पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Prices) मोठ्या प्रमाणात वाढले असले तरी गरज म्हणून नागरिकांना त्याची खरेदी करावी लागते. मात्र पेट्रोल पंप चालकांच्या आंदोलनमुळे इंधन तुटवडा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलवरील कमिशन वाढवण्यासाठी आज देशभरातील सुमारे 70 हजार पेट्रोल पंप तेल कंपन्यांच्या विरोधात उतरले आहेत. या पेट्रोल पंपांच्या मालकांनी 31 मे रोजी ऑइल मार्केटिंग कंपन्यांकडून (OMCs) पेट्रोल आणि डिझेल खरेदी न करण्याची घोषणा केली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ दरात वाढ केल्यानंतर पेट्रोलियम कंपन्या प्रचंड नफा कमवत आहेत, मात्र डीलर्सच्या कमिशनमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही, असे पंपमालकांचे म्हणणे आहे. मंगळवारी देशातील 24 राज्यांमधील सुमारे 70 हजार पेट्रोल पंप मालक ओएमसीच्या कमिशनमध्ये वाढ करण्याच्या मागणीविरोधात आंदोलन करत आहेत. त्यांनी कंपन्यांकडून एक दिवस तेल न घेण्याचे जाहीर केले आहे. ग्राहकांना कोणतीही अडचण येणार नाही राज्यांतील पेट्रोल डीलर संघटनांकडून हे आंदोलन करण्यात येत आहे. दिल्ली पेट्रोल डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अनुराग जैन म्हणाले की, या आंदोलनाचा किरकोळ विक्री आणि ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही. पेट्रोल पंपावर दोन दिवसांचा साठा आहे. त्यामुळे मंगळवारीही ते किरकोळ ग्राहकांना पेट्रोल आणि डिझेलची विक्री करणार आहेत. त्याचा प्रभाव फक्त कंपन्यांकडून होणाऱ्या खरेदीपुरता मर्यादित असेल. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी खुशखबर; सरकारी योजनेतून 40 लाख लोकांना रोजगार मिळणार या राज्यांमध्ये निदर्शने 24 प्रमुख राज्यांमधील पंप चालकांनी कंपन्यांकडून तेल खरेदी न करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये तामिळनाडू, कर्नाटक, केरळ, तेलंगणा, आंध्र प्रदेश, दिल्ली, पंजाब, हरियाणा, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, बिहार, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, मिझोराम, नागालँड, मणिपूर, त्रिपुरा, सिक्कीम या राज्यांचा समावेश आहे. तसेच यूपी, मध्य प्रदेशातील काही डीलर्स देखील यात सामील आहेत. पाच वर्षांपासून कमिशनचा दर बदलला नाही डीलर्स संघटनांचा आरोप आहे की ओएमसी आणि डीलर्समधील करारानुसार, दर 6 महिन्यांनी आमचे मार्जिन बदलले पाहिजे, परंतु 2017 पासून त्यात कोणताही बदल झालेला नाही. या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किंमती जवळपास दुपटीने वाढल्या आहेत. एवढेच नाही तर या काळात व्यापाऱ्यांना व्यवसायासाठी दुप्पट भांडवलही गुंतवावे लागले, त्यासाठी त्यांनी अधिक कर्ज घेतले आणि आता व्याजही अधिक भरावे लागत आहे. आज महाराष्ट्रातील 6,500 पंपांवर तेल खरेदी केले जाणार नाही. महागाईचा आणखी एक झटका; 1 जूनपासून महागणार या वस्तू, तुमच्यावर काय होणार परिणाम? पेट्रोल पंप डीलर्सना सध्या पेट्रोलच्या किरकोळ विक्रीवर प्रति लिटर 2.90 रुपये आणि डिझेलवर 1.85 रुपये कमिशन मिळते. अनुराग जैन म्हणाले, 2017 मध्ये कंपन्यांनी प्रति लिटर 1 रुपये कमिशन वाढवले ​​होते, त्यापैकी 40 पैसे परवाना शुल्काच्या नावाखाली कापले गेले. या पाच वर्षांत वीजबिल, कर्मचाऱ्यांचे पगार, बँकेचे शुल्क यासह सर्व खर्चाचा बोजा आमच्यावर पडला आहे. त्यामुळे आता कंपन्यांनी आमच्या मागण्यांचा विचार करावा, यासाठी आम्ही हा निषेधाचा मार्ग स्वीकारला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात