नवी दिल्ली, 23 जून : कोरोना व्हायरसच्या (Coronavirus)संकटकाळात अनेक देशांमध्ये सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे मोठमोठ्या कंपन्यांचे नुकसान झाले आहे. अद्याप काही कंपन्या बंद देखील आहेत. या कालावधीमध्ये विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगार (Salary Cut) आले आहेत तर काही ठिकाणी कर्मचाऱ्यांना कामावरून कमी (Layoffs) देखील करण्यात आले आहे. रोजगार देणाऱ्या संस्थांसमोर देखील आर्थिक संकट आहेत. दरम्यान या काळामध्ये अनेक कंपन्या, विविध इंडस्ट्रीजने वर्क फ्रॉम होम (Work From Home) ची पद्धत स्विकारली आहे. मात्र घरून काम करणाऱ्या व्यक्तीला ही सुविधा जास्त इनकम टॅक्सच्या अनुषंगाने काहीशी महाग पडणार आहे.
सीटीसीमध्ये पगाराचा एक भाग असतो नॉन टॅक्सेबल इनकम
खाजगी क्षेत्रामध्ये कर्मचाऱ्यांचा पगार 'कॉस्ट टू कंपनी' (CTC) या प्रणालीअंतर्गत ठरवला जातो. यामध्ये अनेक कंपन्यांमध्ये पगाराचा हिस्सा 'A' आणि 'B' या दोन सेक्शनमध्ये विभागला जातो. ए पार्टमध्ये बेसिक सॅलरी, डीए आणि एचआरए असतात. तर बी भागामध्ये ट्रान्सपोर्ट अलाउन्स, एंटरटेनमेंट अलाउन्स इ. असतात.
(हे वाचा-ATM मधून पैसे काढण्यासाठी येणार 5000 रुपयांची मर्यादा, RBI ने आखला नवा प्लॅन)
कर्मचारी यासाठी खर्च केलेल्या रकमेचं बिल कंपनीकडे देतात आणि त्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर केले जातात. हे भत्त्यांवर कर आकारला जात नाही. काही ठिकाणी हे रिम्बर्समेंटच्या रुपात दिले जातात.
या भत्त्यांवर कर्मचाऱ्यांना द्यावा लागणार कर
लॉकडाऊनच्या दरम्यान अनेक कर्मचारी घरातूनच काम करत आहे, त्याशिवाय बाहेरचं जेवण किंवा कुटुंबीयांबरोबर दिवस घालवण्यासाठी बाहेर देखील ते जात नाही आहेत. परिणामी त्यांना मिळणारा प्रवास भत्ता आणि मनोरंजन भत्ता आता टॅक्सेबल होत आहे. यावर त्यांना कर द्यावा लागेल. भत्त्याच्या स्वरूपात पगारामध्ये येणाऱ्या या रकमेवर त्यांना कर भरावा लागेल. सामान्यत: विशेष सूट मिळाल्यानंतर या भत्त्यांवर कर आकारला जात नाही. जर अलाउन्स खर्च केले गेले नाही तर त्यावर टॅक्स लागतो. हा कर त्याच दराने आकारला जाईल, ज्या टॅक्स स्लॅबमध्ये कर्मचारी येतो.
(हे वाचा-90 दिवसांनतर सुरू होणार आंतरराष्ट्रीय विमानसेवा? नागरी उड्डाण मंत्र्यांचे संकेत)
दरम्यान तुमचा पगार उशिराने येत आहे किंवा सध्या था्ंबवण्यात आला आहे तर त्यावरही कर द्यावा लागेल का? तर कर्मचाऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणारी पगाराची रक्कम किंवा कंपनीकडून मिळणाऱ्या पावतीवर टॅक्स निश्चित केला जातो. बहुतांश कंपन्या पगार देतेवेळीच कर कापून घेतात. जर काही काळापासून तुम्हाला पगार मिळाला नाही आहे तर ही शिल्लक रक्कम देखील करपात्र आहे. कारण तुमच्या कंपनीने टॅक्स डिडक्टेड ऑन सोअर्स (TDS) नाही भरला आहे. त्यामुळे अॅडव्हान्स टॅक्स भरण्याची जबाबदारी कर्मचाऱ्याची आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Income tax