मराठी बातम्या /बातम्या /मनी /

सध्याच्या वॅल्युएशननुसार कोणत्याही IPO मध्ये गुंतवणूक करणार नाही : राकेश झुनझुनवाला

सध्याच्या वॅल्युएशननुसार कोणत्याही IPO मध्ये गुंतवणूक करणार नाही : राकेश झुनझुनवाला

 CNBC-TV18 सोबत केलेल्या एका खास बातचितमध्ये Rakesh Jhunjhunwala यांनी शेअर बाजारात येणाऱ्या IPO आणि त्यांच्या प्रचंड वॅल्युएशनबद्दल त्यांचे काय मत आहे हे सांगितले.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 1 नोव्हेंबर : सध्या शेअर बाजारात अनेक IPO आले आहेत तर काही येणार आहेत. शेअर बाजारातील Big Bull म्हणून ओळखले जाणारे दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) म्हणतात की, सध्याच्या वॅल्युएशन मार्केटमध्ये ते नवीन IPO मध्ये गुंतवणूक करणार नाहीत. CNBC-TV18 सोबत केलेल्या एका खास बातचितमध्ये राकेश झुनझुनवाला यांनी शेअर बाजारात येणाऱ्या IPO आणि त्यांच्या प्रचंड वॅल्युएशनबद्दल त्यांचे काय मत आहे हे सांगितले.

राकेश झुनझुनवाला यांनी म्हटलं की, मला यात काहीही स्वारस्य नाही. एवढ्या वॅल्युएशनवर कोणतीही कंपनी चांगलीच असेल. मात्र तरीही मी त्यात गुंतवणूक करणार नाही. मला कोणत्याही कंपनीच्या नावाने भाष्य करायला आवडणार नाही, परंतु या वॅल्युएशनमध्ये मला त्यांच्यात रस नाही. मात्र या नवीन युगातील कंपन्या ज्या समर्पणाने आणि गतीने काम करतात त्याबद्दल मी त्यांची प्रशंसा करतो, याबद्दल मी त्यांचा आदर करतो.

New IPO : नोव्हेंबरमध्ये कमाईच्या संधी; Paytm सह अनेक कंपन्यांचे IPO येणार

फिनटेक कंपन्या आणि बँकांमधील तुलनेबद्दल राकेश झुनझुनवाला म्हणाले की, फिनटेक कंपन्या बँकांसाठी कधीही धोका बनू शकत नाहीत. असं काय आहे जे फिनटेक कंपन्या करू शकतात आणि एचडीएफसी किंवा इतर बँका करू शकत नाहीत? इतर बँका देखील कलेक्शन एजंट का बनू शकत नाहीत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

मुलीचं भविष्य करा सुरक्षित; 'या' योजनेत गुंतवणूक करा आणि मिळवा 15 लाख

एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी, डिपॉझिट हा फायनान्सचा सर्वात मोठा स्रोत आहे आणि संपूर्ण फायनान्स इंडस्ट्री चालवण्याचा सर्वात मोठा स्रोत आहे, असंही त्यांनी म्हटलं.

First published:

Tags: Money, Share market