मुंबई, 1 नोव्हेंबर : इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) कमी गुंतवणुकीसाठी आणि कमी वेळेत जास्त कमाईसाठी सर्वोत्तम पर्याय आहे. सध्या आयपीओ मार्केटमध्ये चांगली तेजी आहे. अनेक आयपीओ लॉन्च केले गेले आहेत आणि गुंतवणूकदारांनी भरपूर पैसे कमवले आहेत. या महिन्यातही अनेक IPO येणार (IPO in November) आहेत, त्यामुळे गुंतवणूकदारांना कमाईची आणखी संधी आहे.
Paytm चा IPO, policybazaar चा IPO, KFC आणि पिझ्झा हट रेस्टॉरंट्स चालवणाऱ्या Sapphire Foods Sigachi Industries चा IPO या महिन्यात लाँच होणार आहेत.
PolicyBazaar IPO
ऑनलाईन विमा सेवा पोर्टल पॉलिसीबाझार (Policybazaar) आणि कर्ज देणारे पोर्टल पैसाबाजार (Paisabazaar) चालवणारी कंपनी PB Fintech Ltd चा IPO आज लॉन्च झाला असून 3 नोव्हेंबर रोजी बंद होईल. पैसाबाजार IPO साठी किंमत बँड 940-980 रुपये निश्चित करण्यात आला आहे.
PB Fintech Ltd च्या 5,710 कोटी रुपयांच्या IPO मध्ये 3,750 कोटी किमतीच्या इक्विटी शेअर्सच्या फ्रेश इश्यूचा समावेश आहे आणि सध्याच्या शेअर होल्डर्सद्वारे सुमारे 1,960 कोटींना विक्रीची ऑफर आहे. PB Fintech ने आपल्या अँकर गुंतवणूकदारांमार्फत 2,569 कोटी रुपये उभे केले आहेत.
कंपनीने 155 अँकर गुंतवणूकदारांना 980 रुपयांमध्ये 26,218,079 शेअर्स वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या अँकर गुंतवणूकदारांमध्ये गोल्डमन सॅक्स, नोमुरा, ब्लॅकरॉक ग्लोबल फंड, मॉर्गन स्टॅनली, कॅनडा पेन्शन प्लॅन इन्व्हेस्टमेंट बोर्ड, फिडेलिटी, अबू धाबी इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी, ICICI प्रुडेन्शियल म्युच्युअल फंड (MF), SBI MF, Axis MF आणि UTI MF यांचा समावेश आहे.
सिगाची इंडस्ट्रीजचा (Sigachi Industries IPO)
Sigachi Industries चा IPO आज सबस्क्रिप्शनसाठी उघडत आहे आणि 2 नोव्हेंबर रोजी बंद होईल. सिगाची इंडस्ट्रीजने त्यांच्या IPO साठी 161-163 प्रति शेअर किंमत बँड सेट केला आहे. कंपनीच्या वरच्या किंमतीच्या बँडवर फर्म शेअर विक्रीद्वारे 125.43 कोटी रुपये उभारण्याची योजना आहे. सिगाची इंडस्ट्रीजच्या IPO मध्ये पूर्वीच्या 2.84 दशलक्ष शेअर्सच्या योजनेतून 7.70 दशलक्ष शेअर्सचा फ्रेश इश्यू समाविष्ट आहे.
पेटीएम आयपीओ (Paytm IPO)
डिजिटल पेमेंट कंपनी पेटीएमचा आयपीओही याच महिन्यात सुरू होत आहे. 18300 कोटींचा हा IPO 8 नोव्हेंबरपासून गुंतवणुकीसाठी सुरू होत असून त्यात 10 नोव्हेंबरपर्यंत पैसे गुंतवता येतील. पेटीएम आयपीओची किंमत 2080-2150 रुपये असेल. हा बाजारातील आतापर्यंतचा सर्वात मोठा IPO असेल. Paytm IPO अंतर्गत 8300 कोटी रुपयांचे फ्रेश इक्विटी शेअर जारी केले जातील. त्याच वेळी, 10 हजार कोटींची ऑफर फॉर सेल (OFS) असेल. सुमारे निम्मी OFS अँट फायनान्शिअल आणि उर्वरित अलीबाबा, एलिव्हेशन कॅपिटल, सॉफ्टबँक आणि इतर विद्यमान भागधारकांच्या मालकीची आहे. Paytm IPO मध्ये गुंतवणूकदारांना किमान 6 इक्विटी शेअर्ससाठी बोली लावावी लागेल. अप्पर प्राइस बँड 2150 रुपयांच्या बाबतीत, किमान 12,900 रुपये गुंतवावे लागतील. यानंतर, तुम्ही 1 च्या पटीत गुंतवणूक करू शकता.
फिनो पेमेंट्स बँक (Fino Payment Bank IPO)
फिनो पेमेंट्स बँक IPO 29 ऑक्टोबर रोजी IPO सबस्क्रिप्शनसाठी उघडण्यात आला होता. हा इश्यू उद्यापर्यंत म्हणजे 2 नोव्हेंबरपर्यंत सबस्क्राईब करता येईल. फिनो पेमेंट्स बँकेच्या आयपीओचा साईज 1200 कोटी रुपये आहे. कंपनीने इश्यूची किंमत 560-577 रुपये निश्चित केली आहे. फिनो पेमेंट बँकेत ब्लॅकस्टोन, ICICI ग्रुप, भारत पेट्रोलियम आणि IFC सारख्या आघाडीच्या गुंतवणूकदारांची गुंतवणूक आहे. IPO मध्ये ताज्या इक्विटी शेअर्सच्या इश्यू व्यतिरिक्त, विक्रीसाठी ऑफर (OFS) देखील असेल. कंपनीचा शेअर 12 नोव्हेंबरला बाजारात लिस्ट होऊ शकतो.
Sapphire Foods India
KFC आणि पिझ्झा हट आऊटलेट्स चालवणाऱ्या Sapphire Foods India चा IPO लवकरच येणार आहे. सफायर फूड्स इंडियाचा IPO 9 नोव्हेंबरला सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि 11 नोव्हेंबरला बंद होईल. फर्म 22 नोव्हेंबर रोजी एक्सचेंजेसवर सूचीबद्ध करण्याची योजना आखत आहे. IPO मध्ये विद्यमान शेअर होल्डर्स आणि प्रमोटर्सकडून 17.57 दशलक्ष शेअर्सच्या विक्रीसाठी ऑफर आहे. OFS मध्ये, QSR मॅनेजमेंट ट्रस्टद्वारे 8.50 लाख शेअर्स विकले जातील. 5.57 दशलक्ष शेअर्स सॅफायर फूड्स मॉरिशस लिमिटेडद्वारे विकले जातील. तर WWD रुबी लिमिटेडद्वारे 4.85 दशलक्ष शेअर्स विकले जातील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Investment, Money, Share market