मुंबई, 1 नोव्हेंबर : जर तुमच्या किंवा तुमचे नातेवाईक, मित्रमंडळी यांच्या घरात छोट्या चिमुकलीचं आगमन झालं असेत तर ही बातमी नक्की वाचा. मुलीच्या नावाने गुंतवणूक (Investment Option) करण्याचा विचार करत असाल तर आज एका सरकारी योजनेबद्दल माहिती घेऊया. अगदी कमी पैसे गुंतवून मोठी रक्कम जोडू शकता. या सरकारी योजनेचे (Government Scheme) नाव आहे सुकन्या समृद्धी योजना (SSY). या योजनेद्वारे तुम्ही तुमच्या मुलीचे भवितव्य तर सुरक्षित करू शकताच पण या उत्तम गुंतवणुकीच्या पर्यायामध्ये पैसे गुंतवून तुम्हाला आयकर वाचवण्यासही मदत होते. दररोज 1 रुपये वाचवूनही या योजनेचा लाभ मिळू शकतो.
सुकन्या समृद्धी योजना काय आहे?
सुकन्या समृद्धी योजना (SSY) ही केंद्र सरकारची मुलींसाठीची एक अल्प बचत योजना आहे, जी बेटी बचाओ बेटी पढाओ योजनेअंतर्गत सुरू करण्यात आली आहे. सुकन्या ही लघु बचत योजनेतील सर्वोत्तम व्याजदर योजना आहे.
किती रुपयांची गुंतवणूक करता येईल?
सुकन्या समृद्धी योजनेत (Sukanya Samruddhi Scheme ) फक्त 250 रुपयांत खाते उघडता येते. म्हणजेच तुम्ही दररोज 1 रुपया वाचवला तरीही तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता. कोणत्याही एका आर्थिक वर्षात किमान 250 रुपये जमा करणे आवश्यक आहे. कोणत्याही एका आर्थिक वर्षात, SSY खात्यात एका वेळी किंवा अनेक वेळा दीड लाखांपेक्षा जास्त जमा करता येणार नाही.
EPFO Alert : PF खातेधारकांना ऑनलाईन फसवणुकीचा धोका, काय खबरदारी घ्याल?
किती व्याज मिळते?
सध्या सुकन्या समृद्धी योजनेमध्ये 7.6 टक्के दराने व्याज दिले जात आहे ज्यात आयकर सूट आहे. यापूर्वी 9.2 टक्क्यांपर्यंत व्याजही मिळाले आहे. वयाच्या 8 वर्षानंतर मुलीच्या उच्च शिक्षणासाठी खर्च झाल्यास 50 टक्के रक्कम काढता येते.
मॅच्युरिटीनंतर मिळणार 15 लाख
समजा तुम्ही या योजनेत दर महिन्याला 3000 म्हणजेच वार्षिक 36000 रुपये गुंतवले तर 14 वर्षांनंतर तुम्हाला वार्षिक 7.6 टक्के चक्रवाढ दराने 9,11,574 रुपये मिळतील. 21 वर्षांच्या म्हणजेच मॅच्युरिटीवर ही रक्कम सुमारे 15,22,221 रुपये असेल. सध्या SSY मध्ये 7.6 टक्के दराने व्याज दिले जात आहे ज्यात आयकर सवलतही आहे.
New IPO : नोव्हेंबरमध्ये कमाईच्या अनेक संधी; Paytm सह अनेक कंपन्यांचे IPO येणार
खाते कसे उघडायचे?
सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत खाते कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा कमर्शियल ब्रान्चच्या अधिकृत शाखेत उघडता येते. चालू आर्थिक वर्षात सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा करता येतील. सुकन्या समृद्धी योजना खाते उघडल्यानंतर, मुलगी 21 वर्षांची होईपर्यंत किंवा 18 वर्षांची झाल्यानंतर तिचे लग्न होईपर्यंत ते चालवले जाऊ शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Investment, Money