'या' कामासाठी पुरुषांपेक्षा जास्त कर्ज घेतात महिला

'या' कामासाठी पुरुषांपेक्षा जास्त कर्ज घेतात महिला

career, education, women - सर्वच क्षेत्रात महिला आपली कामगिरी दाखवत असतात. अनेक क्षेत्रात त्या स्वत:ला सिद्ध करतायत

  • Share this:

मुंबई, 26 जून : सर्वच क्षेत्रात महिला आपली कामगिरी दाखवत असतात. अनेक क्षेत्रात त्या स्वत:ला सिद्ध करतायत. नवी आव्हानं स्वीकारतायत. कन्झ्युमर लेंडिंग फिनटेक कंपनी जेस्टमनीच्या सर्वेनुसार आता उच्च शिक्षणातही महिलाच अग्रेसर आहेत. या सर्वेप्रमाणे उच्च शिक्षणासाठी कर्ज घेण्यात स्त्रिया अग्रेसर आहेत. त्या पुरुषांपेक्षा जास्त कर्ज घेतात.

योरस्टोरीमध्ये छापलेल्या जेस्टमनीच्या अहवालानुसार भारतीय महिलांचं हे सत्य समोर आलंय. असं मानलं जातं की भारतीयांमध्ये कर्ज घेण्यामध्ये पुरुषच जास्त असतील. पण खरी गोष्ट काही वेगळीच आहे.  बँकेकडून शिक्षणासाठी कर्ज घेणाऱ्यांमध्ये विद्यार्थिनींची संख्या 20 टक्के आहे तर विद्यार्थ्यांची 6 टकेच. शिवाय विद्यार्थ्यांच्या तुलनेत विद्यार्थिनींची कर्ज घेण्याची रक्कमही 35 टक्के जास्त आहे. 2019मध्ये आतापर्यंत महिलांनी कर्जाचं ईएमआय 20 हजार रुपये तर पुरुषांनी 15 हजार रुपये भरलेत.

दर महिन्याला कमवा 70 हजार रुपये, 'असा' सुरू करा व्यवसाय

सरकारही करतं मदत

आर्थिक अडचणींमुळे आता तुमच्या मुलीचं शिक्षण संपायला नको. या योजनेत हुशार मुलींना 50 हजार रुपयांची स्काॅलरशिप मिळते. ही स्काॅलरशिर टेक्निकल शिक्षणासाठी मिळते. या योजनेअंतर्गत AICTE च्या मान्यताप्राप्त संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दर वर्षाला 50 हजार रुपयांची स्काॅलरशिप दिली जाते. यात 30 हजार रुपये ट्युशन फी म्हणून देतात आणि 20 हजार रुपये दुसऱ्या खर्चांसाठी दिले जातात.

1 जुलैपासून रोजच्या आयुष्यातल्या 'या' गोष्टी बदलणार, खिशावर होणार परिणाम

काय आहे ही योजना?

नव्या योजनेत टेक्निकल शिक्षणात पदवी आणि पदविका घेणाऱ्या विद्यार्थिंनींना दर वर्षी स्काॅलरशिप दिली जाते. पण त्यासाठी काही नियम असतात.

माजी मुख्यमंत्र्यांच्या घरावर रात्री बुलडोझर चालवला!

दर वर्षी 4 हजार मुलींच्या शिक्षणासाठी पैसे मिळतील. त्यात 2 हजार रुपये डिप्लोमा कोर्ससाठी आणि बाकी 2 हजार डिगरी कोर्स करणाऱ्या विद्यार्थिनींना मिळतात.

AICTE ची मान्यता असलेल्या टेक्निकल इन्स्टिट्युटमधून डिप्लोमा आणि डिगरी मिळवणाऱ्या मुलींना स्काॅलरशिप मिळते.

VIDEO: ...आणि चिमुकलीनं दिली विठुरायाची शपथ

First published: June 26, 2019, 2:35 PM IST
Tags: career

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading