मुंबई, 26 जून : तुमचं एखादं घर, फ्लॅट रिकामा पडला असेल तर त्यातून तुम्ही चांगली कमाई करू शकता. घर भाड्यानं बराच काळ एखाद्या कुटुंबाला देणं हे सर्वसामान्य आहे. पण आम्ही तुम्हाला सांगतोय वेगळा पर्याय. त्यात तुम्ही नेहमीच्या भाड्यापेक्षा जास्त कमावू शकता. त्यासाठी तुम्हाला तुमच्या घराला हाॅटेल रूम बुकिंग साइटवर लिंक करावं लागेल. नंतर तुम्ही ते भाड्यानं देऊ शकता. या व्यवसायातून तुम्ही महिन्याला 70 हजार रुपये कमावू शकता. त्यासाठी तुम्हाला एअरबीएनबी, गोआयबीबो, ट्रिप अॅडव्हायझर, होमस्टे डाॅट काॅम, बुकिंग डाॅट काॅम इथे तुमच्या घराला लिंक करावं लागेल. 1 जुलैपासून रोजच्या आयुष्यातल्या ‘या’ गोष्टी बदलणार, खिशावर होणार परिणाम दिल्लीमध्ये राहणारे अमित यांनी सांगितलं की त्यांनी त्यांचं अपार्टमेंट एअरबीएनबीवर लिस्ट केलं. पूर्ण अपार्टमेंटचे एका रात्रीचे ते 3 हजार रुपये घेतात. गेल्या मार्च ते आॅक्टोबरपर्यंत त्यांनी दर महिना 15 ते 25 हजार रुपये कमावले. ही कमाई नोव्हेंबर ते फेब्रुवारीत 50 ते 75 हजार रुपयापर्यंत गेली. जयपूरमध्ये राहणाऱ्या नेहानं सांगितलं की त्यांनी त्यांचं घर ट्रिप अॅडव्हायझर, बुकिंग डाॅट काॅम, गोआयबीबोवर लिस्ट केलंय. त्या एका बेडरूमचे 1600 रुपये घेतात. टेरेस गार्डनच्या रूमचे 2500 रुपये घेतात. आॅक्टोबर ते मार्चच्या मधे त्यांनी 60 ते 80 हजारापर्यंत कमावलेत. TRAI बदलणार अनेक नियम, आता टीव्ही पाहणं होईल स्वस्त खुशखबर! पुढच्या महिन्यात स्वस्त होऊ शकतं स्वयंपाक करणं आणि कार चालवणं असं करा घर लिंक जास्त करून राज्यांमध्ये तुमच्या प्राॅपर्टीला वेबसाइटवर रजिस्टर करावं लागतं. त्यासाठी आॅनलाइन एक परमिट मिळतं. प्रत्येक राज्याचा नियम वेगळा आहे. काही राज्यांत लोकांना जिल्ह्याच्या टुरिस्ट आॅफिसमध्ये जावं लागतं. अनेक राज्य याला कमर्शियल मानत नाहीत. म्हणून कुठलाही सर्विस टॅक्स द्यावा लागत नाही. या गोष्टींची घ्या काळजी ज्या पोर्टलशी तुम्ही तुमचं घर किंवा रूम लिंक करणार त्या कंपनीला कमिशन द्यावं लागणार. प्रत्येक पोर्टलची कमिशन 3 ते 6 टक्क्यांच्या मधे असतात. छोट्या जागेचं भाडं कमीच मिळेल. तुमचं घर टुरिस्ट स्पाॅटच्या जवळ हवं. अक्षयचा ‘सूर्यवंशी’मधून 2 दिवसांचा ब्रेक, इतर मनोरंजन विश्वातील घडामोडी
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







