1 जुलैपासून रोजच्या आयुष्यातल्या 'या' गोष्टी बदलणार, खिशावर होणार परिणाम

LPG, SBI, RTGS,NEFT - 1 जुलैपासून तुमच्या आयुष्यात मोठे बदल होणार आहेत. हे बदल आहेत पुढीलप्रमाणे -

News18 Lokmat | Updated On: Jun 26, 2019 12:26 PM IST

1 जुलैपासून रोजच्या आयुष्यातल्या 'या' गोष्टी बदलणार, खिशावर होणार परिणाम

मुंबई, 26 जून : 1 जुलैपासून तुमच्या आयुष्यात मोठे बदल होणार आहेत. त्याचा परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. हे बदल स्वयंपाकाचा गॅस आणि रोजच्या आयुष्याशी जोडलेले आहेत. RBI तर्फे आॅनलाइन पैशांच्या देवाणघेवाणीबद्दल असेल. बचत योजनांचे नवे दर लागू होतील. हे बदल आहेत पुढीलप्रमाणे -

1. RTGS आणि NEFT संबंधी नियमात मोठा बदल - डिजिटल ट्रँन्झॅक्शनला प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेनं आरटीजीएस आणि एनईएफटी दर रद्द केलेत. RBI नं पैसे ट्रान्सफर करायचा दर 1 जुलैपासून रद्द करायची घोषणा केलीय. पैसे पाठविण्यासाठी NEFT आणि RTGS या सुविधांचा वापर मोठ्या प्रमाण करण्यात येत असतो. मात्र या अतिरिक्त शुल्कामुळे लोक या माध्यमातून व्यवहार करायला टाळत होते. बँकेच्या या निर्णयामुळे ती अडचण आता दूर होणार आहे.RTGS मधून तुम्ही मोठी रक्कम ट्रान्सफर करू शकता. तर NEFT द्वारे 2 लाखापर्यंत ट्रान्सफर करू शकता.

2. महाग होऊ शकतो गॅस सिलेंडर - 1 जुलैपासून गॅसच्या नव्या किमती लागू होतील. याआधी 1 जूनला गॅसच्या किमतीत वाढ झाली होती.

मोदी सरकारची मुलींच्या शिक्षणासाठी आहे 'ही' मोठी योजना

3. रिझर्व्ह बँकेनं ( RBI ) बेसिक सेव्हिंग अकाउंटबद्दलचे नियम सोपे केलेत. या खातेधारकांना चेक बुक आणि इतर सुविधा आता उपलब्ध होतील. आता बँक ग्राहकांना या सुविधांसाठी खात्यात कमीत कमी पैसे ठेवण्याची सक्ती करू शकत नाही. पूर्वी असं नव्हतं. खात्यात कमीत कमी रक्कम ठेवावी लागे. पण आता सर्व नियम बदललेत.

Loading...

प्लॅस्टिकपासून बनवलं पेट्रोल, एका लिटरचे फक्त 40 रुपये

4. बचत योजनांच्या व्याजदरांवर कात्री - एनएससी, पीपीएफ यावर आता मोठा निर्णय होऊ शकतो. मोदी सरकार NSC आणि PPF सहित छोट्या बचत योजनांच्या व्याज दरात कपात करण्याचा निर्णय घेऊ शकते. CNBC आवाजच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार व्याज दर 0.30 टक्के कमी होऊ शकतात. ही कपात जुलै ते सप्टेंबर या तिमाहीसाठी लागू होईल. सरकारनं उचललेल्या पावलांनंतर बँकांवर आपल्या डिपाॅझिटवर व्याज दर कमी करण्यासाठी दबाव वाढेल. सरकार स्माॅल सेव्हिंग्ज स्कीमवर दर तिमाही व्याज दर ठरवतं. त्यात बदल करायचा की नाही हे सरकारवर अवलंबून आहे.

TRAI बदलणार अनेक नियम, आता टीव्ही पाहणं होईल स्वस्त

5. SBI च्या नियमात बदल, 42 कोटी ग्राहकांवर परिणाम - SBI नं सांगितलंय की 1 जुलैपासून RBI च्या रेपो रेटप्रमाणे गृहकर्जावर व्याजदर लागू होतील.

6. महाग होतील महिंद्राच्या कार्स - महिंद्रा अँड महिंद्रानं पॅसिंजर व्हेइकल्सवर 36000 रुपये नफा करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे महिंद्रा स्कॉर्पियो, बोलेरो, एक्सयूवी500 कार्स महाग होणार.

VIDEO: अ‍ॅम्ब्युलन्स अडवली तर 10 हजारांचा दंड? इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 26, 2019 12:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...