हैदराबाद, 26 जून: आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रोड्डी यांच्या आदेशानंतर प्रशासनाने माजी मुख्यमंत्री एन.चंद्रबाबू नायडू यांच्या प्रजा वेदिका या इमारतीवर बुलडोझर चालवला. मंगळवारी रात्री प्रशासनाने प्रजा वेदिका पाडण्यास सुरुवात केली. त्याआधी जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिक्षक यांची दोन दिवस बैठक झाली होती. प्रशासनाने इमारतीतील फर्नीचर आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे हटवली होती. सरकारच्या या कारवाईचा विरोध करण्यासाठी तेलगू देशम पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. त्यामुळे पोलिसांनी एक मोठी तुकडी या परिसरात तैनात केली होती.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तेलुगु देशम पक्षाचे अध्यक्ष चंद्रबाबू नायडू यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत देखील कपात करण्यात आली आहे. नायडूंचा मुलगा नारा लोकेश यांची झेड श्रेणीची सुरक्षा काढून टाकण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री लोकेश यांची सुरक्षा 5+5 वरून 2+2 अशी करण्यात आली आहे. नायडू काही दिवसांपूर्वीच सहकुटुंब सुट्टीसाठी परदेशात गेले होते. मंगळवारी रात्रीच ते प्रजा वेदिका या आपल्या निवासस्थानी परत येणार होते.
5 जून रोजी रेड्डींना लिहले होते पत्र TDPचे सर्वेसर्वा चंद्रबाबू नायडू यांचे निवासस्थान असलेल्या प्रजा वेदिकाची निर्मिती गेल्या वर्षी करण्यात आली होती. या निवासस्थानाचा वापर सरकार आणि पक्षाच्या कामकाजासाठी करण्यात येत होता. नुकत्याच झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत टीडीपीचा दारूण पराभव झाला होता. या पराभवानंतर नायडू यांनी 5 जून रोजी मुख्यमंत्री वाय.एस.जगन मोहन रेड्डी यांना पत्र लिहले होते. नायडू यांनी मुख्यमंत्री रेड्डी यांना विनंती केली होती की प्रजा वेदिकाचा वापर निवासस्थान म्हणून करण्याची परवानगी द्यावी. तसेच प्रजा वेदिकाचा वापर पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि लोकांना भेटण्यासाठी करायचा असल्याचे नायडू यांनी पत्रात लिहले होते. VIRAL FACT : या विचित्र हास्यामागे दडलंय काय? हे आहे सत्य

)







