जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Property Rule : फक्त रजिस्ट्री केल्याने घर-जमिनीचे मालक होत नाही, 'हे' डॉक्यूमेंट देतात मालकी हक्क!

Property Rule : फक्त रजिस्ट्री केल्याने घर-जमिनीचे मालक होत नाही, 'हे' डॉक्यूमेंट देतात मालकी हक्क!

प्रॉपर्टी रुल

प्रॉपर्टी रुल

Property Rule : घर, दुकान असो किंवा जमीन असोत. जास्तीत जास्त लोक प्रॉपर्टी खरेदी करुन रजिस्ट्री करतात. यानंतर प्रॉपर्टी आपल्या नावावर झाली असा विचार करुन ते निश्चिंत होतात. पणक फक्त रजिस्ट्रीचे पेपर मालकी हक्क देत नाही. तर यासाठी आणखी कोणते पेपर्स लागतात याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 16 जानेवारी : जास्तीत जास्त लोक प्रॉपर्टी खरेदी करताना समोरच्या व्यक्तीची रजिस्ट्री पाहतात. यानंतर ते स्वतःही रजिस्ट्री करतात आणि निश्चिंत होतात. त्यांना वाटतं की, प्रॉपर्टी ची रजिस्ट्री झाली म्हणजे प्रॉपर्टी आता त्यांच्या नावावर झाली आहे. मात्र असं होत नाही. फक्त रजिस्ट्री केल्यानेच कोणतीही प्रॉपर्टी तुमची होत नाही. यासाठी तुम्हाला अजून एक डॉक्यूमेंट घेणं गरजेचं असतं.

News18लोकमत
News18लोकमत

फक्त रजिस्ट्री करून प्रॉपर्टी तुमचीच होईल असं तुम्हाला वाटत असेल तर हा तुमचा गैरसमज आहे. भविष्यात कोणत्याही प्रकारचा त्रास टाळण्यासाठी, तुम्ही त्याचे नामांतरण म्हणजेच म्यूटेशन चेक करणे आवश्यक आहे. तुम्हाला हे देखील माहित असले पाहिजे की केवळ सेल डीडने नामांतर होत नाही. आजोबा आणि वडिलांच्या संपत्तीवर लोन घेता येतं का? काय सांगतो नियम? नामांतर केल्याशिवाय संपत्ती तुमच्या नावावर होत नाही सेल डीड आणि नामांतरण या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सामान्यतः लोक विक्री आणि रूपांतरणला एकच मानतात. रजिस्ट्री झाली म्हणजे संपत्ती आपल्या नावावर झाली असं मानलं जातं. पण हे योग्य नाही. जोपर्यंत कोणत्याही मालमत्तेचे नाव नामांतरण केलं जातं नाही, तोपर्यंत कोणतीही व्यक्ती रजिस्ट्री करून घेतली असली तरीही ती संपत्ती स्वतःची मानू शकत नाही. कारण नामांतरण हे दुसऱ्या व्यक्ती जवळ असते. Property Knowledge: तुम्ही खरेदी करत असलेलं घर अवैध तर नाही ना? अवश्य तपासा ही कागदपत्र नामांतरण कसं करायचं? भारतात रिअल इस्टेटचे प्रामुख्याने तीन प्रकार आहेत. पहिली शेतजमीन, दुसरी निवासी जमीन, तिसरी औद्योगिक जमीन यासोबतच घरांचाही समावेश आहे. या तिन्ही प्रकारच्या जमिनींचे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने नामांतर करण्यात आले आहे. जेव्हा जेव्हा एखादी मालमत्ता सेल डीडद्वारे खरेदी केली जाते किंवा इतर कोणत्याही मार्गाने संपादन केली जाते तेव्हा त्या कागदपत्रासह संबंधित कार्यालयात हजर राहून मालमत्तेचे नामांतरण अवश्य करुन घ्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात