एन्कम्ब्रन्स सर्टिफिकेट - हा डॉक्यूमेंट त्या प्रॉपर्टी कर्ज आहे की नाही हे सांगतो. प्रॉपर्टी कर्जमुक्त असल्याची खात्री करावी.
प्रॉपर्टी टॅक्सची पावती- घराच्या सध्याच्या मालकाकडून प्रॉपर्टी टॅक्सची पावती मागवा. यावरून ती कॉलोनी किंवा सेक्टर वैध आहे की नाही हे देखील समजेल.
सेल्स डीड काळजीपूर्वक तपासा - ओनरशिप ट्रान्सफरसाठी हे मुख्य कागदपत्र आहे. यामध्ये दोन्ही पक्षांचे नाव आणि वय, पत्ता आणि संपत्तीची माहिती देण्यात आलेली असते.
पॉवर ऑफ अॅटर्नी- तुम्ही थेट मालकाकडून प्रॉपर्टी खरेदी करत नसाल, तर तुम्ही विक्रेत्याची पॉवर ऑफ अॅटर्नी तपासली पाहिजे. यावरून त्या मालमत्तेची विक्री करण्याचे अधिकार त्याला खरोखर आहेत की नाही हे स्पष्ट होईल.