मराठी बातम्या /बातम्या /मनी /

RBI मॉनिटरी पॉलिसीची यंदाची बैठक का आहे महत्त्वाची? तज्ज्ञांनी सांगितलं कारण

RBI मॉनिटरी पॉलिसीची यंदाची बैठक का आहे महत्त्वाची? तज्ज्ञांनी सांगितलं कारण

एकीकडे महागाई वाढत असताना जागतिक मंदीचं संकट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बॅंकेची पत धोरणासंदर्भात बैठक होत आहे.

एकीकडे महागाई वाढत असताना जागतिक मंदीचं संकट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बॅंकेची पत धोरणासंदर्भात बैठक होत आहे.

एकीकडे महागाई वाढत असताना जागतिक मंदीचं संकट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बॅंकेची पत धोरणासंदर्भात बैठक होत आहे.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

नवी दिल्ली, 26 सप्टेंबर : इंधनाचे वाढते दर आणि महागाईमुळे सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आले आहेत. एकीकडे महागाई वाढत असताना जागतिक मंदीचं संकट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बॅंकेची पत धोरणासंदर्भात बैठक होत आहे. या बैठकीकडे अर्थतज्ज्ञांसह सर्वच घटकांचं लक्ष लागलं आहे. या बैठकीत रिझर्व्ह बॅंक महागाई नियंत्रणासाठी सलग चौथ्यांदा धोरणात्मक दरात वाढ घोषित करण्याची शक्यता आहे. महागाई नियंत्रणासाठी रेपो रेटमध्ये वाढ करण्याशिवाय अन्य कोणताही पर्याय `आरबीआय`समोर नसल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे ही बैठक अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. `टीव्ही नाइन हिंदी`ने याविषयी माहिती देणारं वृत्त दिलं आहे.

रिझर्व्ह बॅंकेची पतधोरण बैठक होत आहे. रिझर्व्ह बॅंक 30 सप्टेंबर रोजी द्वैमासिक चलन आढावा बैठकीतला निर्णय जाहीर करेल. जगभरातल्या केंद्रीय बॅंकांकडून मिळत असलेल्या संकेतांनुसार, रिझर्व्ह बॅंकही पतधोरण आढाव्यात धोरणात्मक दरात वाढ करेल, असं मानलं जात आहे. महागाई नियंत्रणासाठी आरबीआय सलग चौथ्यांदा दर वाढवण्याची शक्यता आहे. सध्या किरकोळ महागाई दर सात टक्क्यांवर स्थिर असल्याने रिझर्व्ह बॅंकेवर रेपो रेट वाढवण्यासाठी दबाव आहे. आमचं प्राधान्य महागाई नियंत्रणात ठेवणं आहे, असं रिझर्व्ह बॅंकेनं यापूर्वीच जाहीर केलं आहे. त्यामुळे अशा स्थितीत रेपो रेट वाढवण्याशिवाय अन्य पर्याय नाही. रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरणासंदर्भातल्या बैठकीत रेपो रेटमध्ये 0.50 टक्के वाढ करण्याचा निर्णय होऊ शकतो. असं झाल्यास रेपो रेट वाढून 5.90 टक्क्यांवर पोहोचेल.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, रिझर्व्ह बॅंक रेपो रेटमध्ये 35 बेसिस पॉइंटवरून 50 बेसिस पॉइंटपर्यंत वाढ करू शकते. यूबीएस या ब्रोकरेज कंपनीच्या म्हणण्यानुसार, या धोरण आढाव्यात रिझर्व्ह बॅंक रेपो रेटमध्ये 0.25 ते 0.30 टक्के म्हणजेच 25 बेसिस पॉइंट्स ते 30 बेसिस पॉइंट्सपर्यंत वाढ करू शकते. दुसरीकडे रेपो रेटमध्ये 0.35 टक्के वाढ होऊ शकते, असं बोफा ग्लोबल रिसर्चच्या अहवालात म्हटलं आहे. डीबीएस ग्रुपच्या म्हणण्यानुसार रेपो रेटमध्ये 0.35 टक्के वाढ होऊ शकते.

आकडेवारी पाहता, रिझर्व्ह बॅंकेने मे महिन्यापासून आतापर्यंत रेपो रेटमध्ये 1.40 टक्क्यांनी वाढ केली आहे. जाणकारांच्या म्हणण्यानुसार, केंद्रीय बॅंक पॉलिसी रेट अर्ध्या टक्क्याने वाढवेल. यामुळे रेपो रेट 5.9 टक्के अर्थात तीन वर्षांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचेल. या रेपो रेटवर मार्केटसह जगाचं लक्ष लागलं आहे. एकीकडे रेपो रेट वाढवून महागाई नियंत्रणात ठेवावी लागत आहे आणि दुसरीकडे विकास दरही कायम ठेवावा लागत आहे.

Stock Market Updates : शेअर बाजार कोसळण्याची 5 मोठी कारण

`चालू आर्थिक वर्षात भारताचा आर्थिक विकास दर 7.3 टक्के राहू शकतो. 2022च्या अखेरपर्यंत महागाईचा दर सहा टक्क्यांवर राहू शकतो. रिझर्व्ह बॅंकेने महागाईची कमाल मर्यादा सहा टक्के निश्चित केली आहे; मात्र महागाई दर सातत्याने यापेक्षा जास्त आहे. ऑगस्ट महिन्यात हा दर 7 टक्क्यांवर पोहोचला होता,` असं एस अँड ग्लोबल रेटिंग्जने 26 सप्टेंबरला सांगितलं. उच्च चलनवाढ आणि वाढत्या धोरणात्मक व्याजदरांमध्ये भारताच्या जीडीपी वाढीचा अंदाज कमी असल्याचं इतर एजन्सीजचं म्हणणं आहे.

या महिन्याच्या सुरुवातीला, फिच रेटिंग्जने चालू आर्थिक वर्षातल्या वाढीचा अंदाज आधीच्या 7.8 टक्क्यांवरून 7 टक्क्यांवर आणला. 'इंडिया रेटिंग्ज अँड रिसर्च'नेदेखील त्यांच्या अनुमानात हा दर सात टक्क्यांवरून 6.9 टक्क्यांवर आणला. आशियाई विकास बॅंक अर्थात एडीबीने त्यांच्या अंदाजात हा दर 7.5 टक्क्यांवरून कमी करून 7 टक्क्यांवर आणला आहे. चालू आर्थिक वर्षात (एप्रिल -मार्च) भारतीय अर्थव्यवस्था 7.2 टक्के दरानं वाढेल, अशी रिझर्व्ह बॅंकेला अपेक्षा आहे.

रेपो रेटच्या अनुषंगानं मार्केटचा अंदाज काय आहे, याविषयी जियोजीत फायनान्शिअल सर्व्हिसेसचे रिसर्च हेड विनोद नायर यांनी `पीटीआय-भाषा`शी संवाद साधला. ते म्हणाले, `सर्व गुंतवणूकदारांचं लक्ष रिझर्व्ह बॅंकेच्या पतधोरणविषयक बैठकीकडे लागलं आहे. जागतिक घडामोडी आणि विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांच्या कलानुसार यास दिशा मिळेल, असा आमचा अंदाज आहे.`

Share Market : नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर 'या' स्टॉकमध्ये पैसे गुंतवून मिळवू शकता मोठा फायदा

स्वस्तिका इन्वेस्टमार्ट लिमिटेडचे रिसर्च हेड संतोष मीणा म्हणाले, `जागतिक कल देशांतर्गत बाजारांवर वर्चस्व गाजवेल. रिझर्व्ह बॅंकेच्या चलनविषयक पुनरावलोकनामुळे आणि सप्टेंबरच्या फ्युचर्स आणि ऑप्शन सेटलमेंटमुळे आपला बाजार अस्थिर राहील. अमेरिकेचे जीडीपीचे आकडेदेखील महत्त्वपूर्ण असतील.`

याशिवाय मार्केटच्या दृष्टीनं रुपयाचा कलदेखील महत्त्वपूर्ण असेल. मागच्या आठवड्यात शुक्रवारी प्रथमच रुपयाने प्रति डॉलर 81 ची पातळी ओलांडली. रेलिगेअर ब्रोकिंगचे रिसर्च विभागाचे उपाध्यक्ष अजित मिश्रा म्हणाले, `रिझर्व्ह बॅंकेने आर्थिक आढावा घेतल्यामुळे आणि मासिक डेरिव्हेटिव्हज कॉन्ट्रॅक्ट्सच्या सेटलमेंटमुळे बाजार अस्थिर राहील असं आम्हाला वाटतं. याशिवाय जागतिक बाजाराच्या दबावाचाही येथील दरावर परिणाम होईल.`

सॅम्को सिक्युरिटीजचे मार्केट एन्व्हायर्नमेंट हेड अपूर्व सेठ म्हणाले, `जागतिक बाजार अमेरिकेच्या जीडीपीच्या आकडेवारीवर लक्ष ठेवतील. देशांतर्गत आघाडीवर रिझर्व्ह बॅंकेचा आर्थिक आढावा हा चर्चेचा प्रमुख विषय असेल. गेल्या आठवड्यात बीएसईचा सेन्सेक्स 741.87 अंकांनी म्हणजे 1.26 टक्क्यांनी घसरला. दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 203.50 अंकांनी म्हणजे 1.16 टक्क्यांनी घसरला.`

मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेसचे रिटेल रिसर्चचे प्रमुख सिद्धार्थ खेमका म्हणाले, `भारतीय बाजारपेठ जागतिक ट्रेंडनुसार मार्गक्रमण करील. याशिवाय रिझर्व्ह बॅंकेच्या चलनविषयक आढाव्यावरही मार्केटची नजर असेल.`

बँक ऑफ बडोदाचे प्रमुख अर्थतज्ञ मदन सबनवीस यांनी याविषयी `पीटीआय-भाषा`शी संवाद साधला. ते म्हणाले, `महागाईचा दर सात टक्क्यांच्या आसपास राहणार आहे आणि अशा स्थितीत दर वाढणार आहेत. रेपो रेटमध्ये 0.25 ते 0.35 टक्क्यांची वाढ म्हणजे महागाईचा सर्वांत वाईट टप्पा संपल्याचा `आरबीआय`ला विश्वास आहे. किरकोळ चलनवाढीचा दर 4 टक्के ( दोन टक्क्यांवर किंवा खाली) राहिल याची खात्री करणं हे आरबीआयचं काम आहे.`

`वाढती महागाई हे `आरबीआय`साठी चिंतेचं प्रमुख कारण आहे आणि दरवाढीमुळे बॅंका गृहकर्जाचा व्याजदर वाढवतील; मात्र मालमत्तेची मागणी कायम असल्याने त्याचा फारसा परिणाम होणार नाही. तसंच सणासुदीच्या काळात ही मागणी आणखी वाढणार आहे, असा आम्हाला विश्वास वाटतो,` असं हाउसिंग डॉट कॉम समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी ध्रुव अग्रवाल यांनी सांगितलं. दुसरीकडे भारतीय स्टेट बॅंकेने आपल्या विशेष अहवालात म्हटलं होतं, की दरांमध्ये 0.50 टक्के वाढ निश्चित आहे. रेपो रेट 6.25 टक्क्यांपर्यंत जाईल आणि डिसेंबरच्या पतधोरण आढाव्यात अंतिम वाढ 0.35 टक्क्यांपर्यंत जाईल.

First published:

Tags: Gdp, Rbi