मराठी बातम्या /बातम्या /मनी /

कोण आहेत वाय. व्ही. सुब्बा रेड्डी, ज्यांनी येस बँकेतून वाचवले बालाजी देवस्थानचे 1300 कोटी

कोण आहेत वाय. व्ही. सुब्बा रेड्डी, ज्यांनी येस बँकेतून वाचवले बालाजी देवस्थानचे 1300 कोटी

येस बँकेवर संकट ओढवण्याच्या महिनाभर आधीच आंध्र प्रदेशातील तिरुपती वेंकटेश्वर मंदिर ट्रस्टने येस बँकेतून तब्बल 1 हजार 300 कोटींची रक्कम काढली होती. या निर्णयामागे देवस्थानचे अध्यक्ष वाय. व्ही. सुब्बा रेड्डी होते. याआधी अनेक वादात देखील वाय. व्ही सुब्बा रेड्डी अडकले होते.

पुढे वाचा ...
  • Published by:  Janhavi Bhatkar

मुंबई, 07 मार्च : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) येस (Yes) बँकेवर आर्थिक निर्बंध लादले आहे. येस बँकेच्या खातेदारांना 5 मार्च ते 6 एप्रिलदरम्यान बँकेतून फक्त 50 हजार रुपये काढण्याची परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान हे वृत्त आल्यानंतर दक्षिणेकडील एका घटनेने सर्वांना आश्चर्य वाटत आहे. हे संकट येण्याच्या काही महिने आधीच आंध्र प्रदेशातील तिरुपती वेंकटेश्वर मंदिर ट्रस्टने येस बँकेतून तब्बल 1 हजार 300 कोटींची रक्कम काढली होती. या निर्णयामागे देवस्थानचे अध्यक्ष वाय. व्ही. सुब्बा रेड्डी होते. अध्यक्षपदाची धुरा स्वीकारल्यानंतर लगेचच त्यांनी हा निर्णय घेतला होता. देवस्थानाने चार प्रायव्हेट बँकांमध्ये हा फंड जमा केलेला होता, ज्यामध्ये येस बँकेचाही समावेश होता.

कोण आहेत वाय. व्ही. सुब्बा रेड्डी?

तिरुपती वेंकटेश्वर देवस्थानाचे अध्यक्ष आहेत. तिरुपतीमधील टीटीडी ट्रस्टकडूनच बालाजी मंदिराचं संपूर्ण कामकाज पाहिलं जातं. यावर संपूर्णपणे सुब्बा रेड्डी यांचं नियंत्रण आहे. मुख्यत: या शहरातील सर्व धार्मिक कार्यांवर वाय. व्ही सुब्बा रेड्डी यांचा अंकूश आहे.

(हे वाचा- 1 एप्रिलपासून बदलणार PAN, आयकर, GSTचे नियम, तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम)

त्यांनी काही दिवसांपूर्वीच देवस्थानच्या अध्यक्षपदाची धुरा सांभाळली होती. ते माजी आमदार असून आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन यांचे नातलग आहेत.

बालाजी देवस्थानचा पैसा काढून घेण्याचा योग्य निर्णय

तिरुमाला तिरुपती देवस्थान (TTD) देशातील एक श्रीमंत देवस्थान ट्रस्ट आहे. तेराशे कोटींची रक्कम येस बँकेतून ट्रस्टने काढून घेतल्यामुळे, सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या निर्णयात सर्वात मोठी भूमिका वाय. व्ही. सुब्बा रेड्डी यांची होती. येस बँकेतून पैसा न काढण्यासाठी वाय. व्ही. सुब्बा रेड्डी यांच्यावर दबाव होता.

(संबधित-तिरुपती मंदिराने Yes Bank च्या संकटाला आधीच ओळखलं, असे वाचवले तब्बल 1300 कोटी)

येस बँकेतून एवढी रक्कम काढण्यासाठी मोठा विरोध देखील झाला. त्यानंतर सुद्धा वाय. व्ही. सुब्बा रेड्डी यांनी घेतलेला निर्णय देवस्थानच्या फायद्याचा ठरला.

मुख्यमंत्री जगनमोहन यांचे काका आणि ख्रिश्चन धर्मीय असल्याची टीका

मुख्यमंत्री वाय.एस. जगनमोहन रेड्डी यांनी वाय.व्ही. सुब्बा रेड्डी यांना तिरुपतीचा अध्यक्ष बनवताना सुब्बा रेड्डी ख्रिश्चन असल्याचा आरोप झाला होता. मात्र, वाय. व्ही सुब्बा रेड्डी यांनी विरोध करत ते ख्रिश्चन नसल्याचं सांगितलं. वास्तविक, जगनमोहन यांच्या कुटुंबीयांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. सुब्बा हे त्यांचे काका लागतात.

(हे वाचा- येस बँकेला रुळावर आणण्यासाठी सरकारचा प्लान तयार, SBI करणार मोठी गुंतवणूक)

त्यांनी एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं आहे की, 'मी जन्म हिंदू झाला आणि एक हिंदू मरेन. माझ्यावर ज्या प्रकारचे आरोप केले जात आहेत ते धक्कादायक आहेत. मी काही महिन्यांनी सबरीमाचं दर्शन घेतो. मी नियमितपणे शिर्डीला जातो. जर कुणाला माझ्या धर्माबद्दल शंका असेल तर त्याने हैदराबादमध्ये माझ्या घरी यावं, त्याला माझा धर्म समजेल.’

First published:

Tags: Tirumala temple, Yes bank