नवी दिल्ली, 25 जुलै: रेल्वेचे जाळे फक्त भारतातच नाही तर जगभरात आहे. जगातील जास्तीत जास्त देशांच्या आतील राज्य आणि शहरांच्या कनेक्टिव्हिटीसाठी ट्रेन हा सर्वात चांगला ऑप्शन मानतात. जगभरात अनेक रेल्वे असे रेल्वे स्टेशन आहेत ज्यांची एक वेगळी ओळख आहे. आज आपण जगातील सर्वात लांब प्लॅटफॉर्मविषयी जाणून घेणार आहेत. तरंच भारतातील सर्वात जास्त प्लॅटफॉर्म कर्नाटकातील हुबली रेल्वे स्टेशनवर आहे. तर देशातील सर्वात मोठं रेल्वे स्टेशन हावडा जंक्शन आहे. इथे 26 प्लॅटफॉर्म आहेत. पण तुम्हाला माहितीये का की, जगातील सर्वात मोठं रेल्वे स्टेशन कोणतं? नाही ना… चला तर मग जाणून घेऊया.
सध्या हे स्टेशन भारतात नसून अमेरिकेतील एका शहरात आहे. विशेष म्हणजे या रेल्वे स्टेशनवर सर्वात जास्त प्लॅटफॉर्मही आहेत. म्हणजेच हे स्टेशन त्याच्या दोन गुणांसाठी प्रसिद्ध आहे. अमेरिकेत असलेले हे स्टेशन 1903 ते 1913 या काळात बांधले गेले. या रेल्वे स्टेशनचं नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवले गेले आहे. Indian railway: देशातील किती ट्रेनमध्ये आहे अॅक्सीडेंट प्रूफ टेक्नॉलॉजी? पाहा रेल्वेमंत्री काय म्हणाले ग्रँड सेंट्रल टर्मिनल - जगातील सर्वात मोठे रेल्वे स्टेशन ग्रँड सेंट्रल टर्मिनल हे जगातील सर्वात मोठे रेल्वे स्टेशन आहे. हे अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरामध्ये आहे. ज्या काळात जड यंत्रे नसायची त्या काळात हे सुंदर स्टेशन बांधले गेले. हे सर्वात मोठे रेल्वे स्टेशन बनवण्यासाठी दोन वर्षांहून अधिक काळ लागला होता. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या न्यूयॉर्क रेल्वे स्टेशनवर एकूण 44 प्लॅटफॉर्म आहेत. म्हणजेच येथे एकाच वेळी एकूण 44 गाड्या उभ्या राहू शकतात. या स्टेशनवर दररोज सरासरी 660 मेट्रो उत्तर गाड्या जातात. तसंच 1,25,000 प्रवासी प्रवास करतात. या रेल्वे टर्मिनलमध्ये दोन अंडरग्राउंड लेवल्स आहेत. येथे 41 ट्रॅक वरच्या लेव्हलवर आहेत आणि 26 ट्रॅक खालच्या लेव्हलवर आहेत. हे स्टेशन 48 एकर जागेवर बांधले आहे. IRCTC ने आणलंय श्रीलंकाचं खास टूर पॅकेज! पाहा रामायणासंबंधित खास ठिकाणं अनेक हॉलिवूड फिल्मच्या शूटिंग येथे झाल्या आहेत या स्टेशनवर एक सीक्रेट प्लॅटफॉर्मही आहे. जे स्टेशनच्या शेजारी असलेल्या वॉल्डोर्फ एस्टोरिया हॉटेलच्या खाली आहे. प्रेसिडेंट फ्रँकलिन रुसवेल्ट हॉटेलमधून थेट या सिक्रेट प्लॅटफॉर्मवर व्हीलचेयरने उतरले होते. जेणेकरुन ते जनता आणि मीडियाचा सामना करण्यापासून वाचू शकले होते. दरवर्षी स्टेशनवरुन जवळपास 19 हजार वस्तू हरवतात त्यामधील जवळपास 60 टक्के प्रशासनाद्वारे परत केल्या जातात. अनेक हॉलिवूड फिल्ममध्ये हे सुंदर रेल्वे स्टेशन दाखवण्यात आले आहेत. कारण इथे नेहमीच चित्रपटांची शूटिंग होते.