नवी दिल्ली, 22 जुलै : ओडिशाच्या बालासोर रेल्वे अपघातानंतर ट्रेनचा अपघातापासून बचाव करण्यासाठी सर्व रेल्वे गाड्यांना कवच तंत्रज्ञानाने सुसज्ज केले जावं अशा चर्चा सुरु आहेत. पण हे एवढं सोपं नाही, कारण सर्व ट्रेनमध्ये अॅक्सीडेंट प्रूफ टेक्नॉलॉजी इन्स्टॉल करण्यासाठी रेल्वे रुट्सवर खूप काम करण्याची गरज आहे. यामुळे कवच प्रणाली निवडक ट्रेनमध्ये लावण्यात आली आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान CPI खासदाराने रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना कवच प्रणालीविषयी प्रश्न विचारले. यावेळी त्यांनी कोणत्या ट्रेनमध्ये ही सिस्टम लावलेली आहे याविषयी सांगितले.
ओडिशाच्या बालासोर येथे गेल्या महिन्यात झालेल्या भीषण तिहेरी रेल्वे अपघातानंतर स्वदेशी विकसित ‘कवच’ स्वयंचलित सुरक्षा तंत्रज्ञान चर्चेत आहे. या अपघातात सुमारे 300 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला असून 800 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. अपघातानंतर या रेल्वे मार्गावर ‘कवच’ बसविण्यात आले नव्हते असे रेल्वेने सांगितले होते. या ट्रेनमध्ये आहे कवच प्रणाली एचटीच्या रिपोर्टनुसार, सीपीआय बिनॉय विश्वम यांनी संसदेत विचारले की, देशातील एकूण गाड्यांपैकी किती ट्रेनमध्ये ‘कवच’ बसवण्यात आले आहे. या प्रश्नाच्या उत्तरात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी उत्तर दिले की, दक्षिण मध्य रेल्वेच्या सिकंदराबाद विभागातील (30), हैदराबाद विभाग (56), गुंटकल विभाग (28) आणि विजयवाडा विभाग (7) यांच्यातील एकूण 121 लोकोमोटिव्ह (इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट रेकसह) सुसज्ज आहेत. रेल्वे मंत्री म्हणाले, “कवच बसवलेल्या लोकोमोटिव्हद्वारे चालवल्या जाणाऱ्या गाड्या लोको लिंकनुसार रेल्वेच्या ऑपरेशनल गरजेनुसार बदलतात.” त्याचवेळी ‘कवच’च्या बांधकामावर सरकारने आतापर्यंत किती पैसा खर्च केला, असा सवाल विरोधी पक्षाच्या खासदाराने केला. यावर, रेल्वेमंत्र्यांनी उत्तर दिले की, त्याच्या अंमलबजावणीसाठी एकूण 351.91 कोटी रुपये खर्च झाले आहेत. ‘कवच’ बनवण्यात एकूण 3 कंपन्यांचा सहभाग आहे. Indian Railways: रेल्वे प्रवाशांसाठी गुडन्यूज! आता केवळ 20 रुपयात मिळेल पोटभर जेवण कवच टॅक्नॉलॉजी काय? कवच एक ऑटोमेटिक ट्रेन प्रोटेक्शन सिस्टम आहे. जी भारतीय रेल्वेने आरडीएसओसोबत मिळून विकसित केली आहे. ज्यावेळी एखाद्या कारणामुळे ट्रेनचा लोकोपायलट रेल्वे सिग्नलला जंप करतो. तेव्हा कवच सिस्टम अॅक्टिव्ह होते. तेव्हाच लोकोपायलटला अलर्ट करतो आणि नंतर ट्रेनच्या ब्रेक्सला कंट्रोल करु लागतो. यासोतबच कवच सिस्टमला जर हे कळालं तर एकाच ट्रॅकवह दुसरी ट्रेनही येत आहे. तर तो दुसऱ्या ट्रेनलाही अलर्ट पाठवतो. यानंतर दुसरी ट्रेन एका निश्चित अंतरावर येऊन स्वतःच थांबते. Indian Railway: बदलेल पॅसेंजर ट्रेनचं रुप! प्रत्येक कोचमध्ये असेल AC,पाहा कधी मिळेल ही सुविधा ही संपूर्ण सिस्टम अल्ट्रा हाय रेडिओ फ्रिक्वेन्सीद्वारे कम्युनिकेट करते. आत्मनिर्भर भारत उपक्रमाचा एक भाग म्हणून 2022 च्या अर्थसंकल्पात या तंत्रज्ञानाची घोषणा करण्यात आली होती. या तंत्रज्ञानाखाली एकूण 2 हजार किमीचे रेल्वे नेटवर्क आणण्याची योजना होती.