मुंबई: सणासुदीच्या काळात ऑफर्स असतात. याशिवाय थोडे बोनसचे पैसेह हाताशी असतात. नव्या गोष्टी खरेदी करण्यासाठी सणावार उत्तम असंही मानलं जातं. त्यामुळे लोन काढून बऱ्याचदा वस्तू घेतल्या जातात. तुम्ही जर पर्सनल लोन काढणार असाल तर तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स घेऊन जायचे आहेत याची माहिती आम्ही देणार आहोत.
आयत्यावेळी तुमची कोणतीही गडबड होऊ नये यासाठी एक चेकलिस्ट तयार करा. सगळे डॉक्ट्युमेंट्स जमा केल्यानंतरच लोनची प्रक्रिया सुरू होईल अन्यथा तुमची प्रक्रिया अडकून राहील. त्यामुळे चेक लिस्ट तयार केल्यानंतर डॉक्युमेंट एकत्र करून ठेवा.
ओळखपत्र
तुम्हाला बँकेत तुमचं ओळखपत्र म्हणून वोटिंग कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, तुम्ही आता जिथे काम करता त्या कंपनीच्या आयडी कार्डचे झेरॉक्स आणि ट्रू कॉपी, पासपोर्ट या गोष्टी द्यायच्या आहेत.
तुम्हीही कुणाच्या लोनचे आहात गॅरेंटर? तुम्हाला 'या' गोष्टी माहिती आहेत का?
वीजबिल, इलेक्शन कार्ड, टेलिफोन बिल, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन किंवा रेशन कार्ड पैकी तुम्हाला काहीतरी एक बँकेत जमा करावं लागणार आहे.
तुम्ही नोकरी करत असाल तर ही कागदपत्र आवश्यक
मागच्या तीन महिन्यातील सॅलरी स्लीप
दोन वर्षातील IT रिटर्न ड्युटी अॅकनॉलेजमेंट जे आयडी डिपार्टमेंटकडून मिळालं असेल ते द्यायचं आहे.
दोन वर्षातील फॉर्म नंबर १६
कर्मचाऱ्याचा अंडरटेकिंग सहीसह फॉर्म
बँकेचं मागील 6 महिन्यांचं बँक अकाउंट स्टेटमेंट
जे व्यवसाय करतात त्यांच्यासाठी कोणती कागदपत्र आवश्यक
3 वर्षांच्या IT रिटर्न
शॉप एस्टॅब्लीशमेंट अॅक्ट
टॅक्स रजिस्ट्रेशन कॉपी
कंपनी रजिस्ट्रेशन लायसन
मागच्या एक वर्षातील बँक स्टेटमेंट
यासोबत तुम्ही ज्या गोष्टीसाठी लोन काढणार त्यासंबंधित अधिकचे कागदपत्र बँकेला देणं बंधनकारक आहे. यामध्ये कोणतंही कागदपत्र कमी असेल तर तुमची प्रोसेस होऊ शकणार नाही. तुम्ही कार, पर्सनल, किंवा इतर कोणतं लोन काढताय त्यावर इतर कागदपत्रांची यादी बँकेकडून तुम्हाला मिळू शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Home Loan, Instant loans, Loan, Pay the loan, Sbi home loan