जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Personal Loan: प्री-अप्रूव्ह्ड पर्सनल लोनचे काय आहेत फायदे अन् ते कुणासाठी ठरू शकतं बेस्ट? वाचा तज्ज्ञांचं मत

Personal Loan: प्री-अप्रूव्ह्ड पर्सनल लोनचे काय आहेत फायदे अन् ते कुणासाठी ठरू शकतं बेस्ट? वाचा तज्ज्ञांचं मत

Personal Loan: प्री-अप्रूव्ह्ड पर्सनल लोनचे काय आहेत फायदे अन् ते कुणासाठी ठरू शकतं बेस्ट? वाचा तज्ज्ञांचं मत

Personal Loan: प्री-अप्रूव्ह्ड पर्सनल लोनचे काय आहेत फायदे अन् ते कुणासाठी ठरू शकतं बेस्ट? वाचा तज्ज्ञांचं मत

Pre-approved offer: प्री-अप्रूव्ह्ड पर्सनल लोन हा एक असुरक्षित कर्ज पर्याय मानला जातो. तुम्ही तो कोणत्या कारणासाठी वापरू शकता, हे आज आपण पाहणार आहोत.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 27 ऑक्टोबर: सणासुदीच्या काळात आपण मोठ्या प्रमाणावर खरेदी करतो. यामुळेच सण-उत्सवात पैशांची जास्त गरज भासते. यावेळी बहुतांश उत्पादनांवर सणासुदीच्या ऑफर्स आहेत. अशा परिस्थितीत ऑफरचा फायदा घेऊन ग्राहक कमी किंमतीत त्यांना आवश्यक वस्तू खरेदी करू शकतात. दरम्यान बँका पात्र ग्राहकांना आर्थिक उत्पादनांवर अनेक उत्तम ऑफर देखील देतात. पूर्व-मंजूर वैयक्तिक कर्ज (प्री-अप्रूव्ह्ड पर्सनल लोन) हे देखील त्या आर्थिक उत्पादनांपैकी एक आहे. हे कर्ज एक असुरक्षित कर्ज पर्याय मानलं जातं. परंतू तुम्ही कोणत्याही कारणासाठी पूर्व-मंजूर वैयक्तिक कर्ज वापरू शकता. एखाद्या व्यक्तीला बँकांकडून प्री-अप्रूव्ह्ड पर्सनल लोन कधी मिळतं आणि या ऑफर स्वीकारल्या पाहिजेत का ते आज आपण पाहणार आहोत. ही ऑफर कोणाला मिळते? बँकेतील उत्कृष्ट आर्थिक ट्रॅक रेकॉर्ड अनेकदा ग्राहकांना प्री-अप्रूव्ह्ड पर्सनल लोन ऑफरसाठी निवड केली जाते. मुख्य निकषांपैकी एक म्हणजे जास्तीक जास्त काळ सातत्याने उच्च क्रेडिट स्कोअर राखणं. सध्याच्या किंवा मागील कर्जासाठी नियमित परतफेड रेकॉर्ड असणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. पूर्व-मंजूर कर्ज देण्यापूर्वी, कर्जदाते तुमच्या परतफेडीच्या क्षमतेचं मूल्यांकन करू शकतात, त्यामुळे तुमच्या उत्पन्नाची पातळी देखील महत्त्वाची आहे. Bank-bazaar.com चे सीईओ आदिल शेट्टी म्हणतात, “बऱ्याचदा चांगल्या क्रेडिट स्कोअर असलेल्या ग्राहकांना पूर्व-मंजूर वैयक्तिक कर्जे दिली जातात. तुमचे उत्पन्न आणि वेळेवर परतफेडीचा इतिहास हे पूर्व-मंजूर कर्ज ऑफरसाठी तुमच्या पात्रतेचे महत्त्वाचे घटक आहेत. या ऑफरमुळं तुम्हाला जास्त वेळ वाट न पाहता अगदी सहजतेनं कर्ज मिळतं. पण जेव्हा कर्ज कधी घेतलंच तर कोणताही विलंब किंवा चूक न करता वेळेवर त्याची परतफेड केली पाहिजे.” पूर्व-मंजूर वैयक्तिक कर्जाचे फायदे-

  • पूर्व-मंजूर कर्जे सामान्यतः नियमित वैयक्तिक कर्जापेक्षा अधिक आकर्षक व्याजदराने दिली जातात.
  • हे फक्त मर्यादित कालावधीसाठी ऑफर केलं जातात. त्यामुळे निर्णय घेण्यास उशीर करू नये.
  • तुमचं उत्पन्न आणि वेळेवर परतफेडीचा इतिहास हे अशा ऑफरसाठी तुमच्या पात्रतेचे महत्त्वाचे घटक आहेत.

हेही वाचा:  Mutual Funds Tips : SIP म्हणजे काय? कसा मिळतो फायदा पूर्व-मंजूर वैयक्तिक कर्ज ऑफरमुळं तुम्हाला कर्ज मंजुरीसाठी प्रतीक्षा करण्याची गरज नाही. बँकेला तुमची क्रेडिट प्रोफाइल आधीच माहिती असते आणि तिला तुमच्या KYC कागदपत्रांचा एक्सेस असतो. नियमित वैयक्तिक कर्जाच्या तुलनेत पूर्व-मंजूर कर्जे साधारणपणे आकर्षक व्याजदरावर दिली जातात. काहीवेळा बँका झिरो प्रक्रिया शुल्क, झिरो प्री-पेमेंट शुल्क, झिरो फोरक्लोजर शुल्क यासारखे विशिष्ट फायदे देतात. आणखी एक फायदा म्हणजे तुम्हाला कर्जासाठी अर्ज करण्यासाठी बँकेच्या शाखेत जाण्याची गरज नाही. यासाठी तुम्ही ऑनलाइन किंवा मोबाईल अॅपद्वारे सहज अर्ज करू शकता.

News18लोकमत
News18लोकमत

आपण ते स्वीकारावे का? अशा ऑफर तेव्हाच स्वीकारल्या पाहिजेत जेव्हा तुम्हाला पैसे कसे आणि कुठे वापरायचे हे माहित असेल. कमी व्याजदरात उपलब्ध आहे म्हणून तुम्ही कर्ज घेऊ नये. जर तुम्ही चांगले नियोजन केलं असेल आणि आधीच कर्जाच्या शोधात असाल तर पूर्व-मंजूर कर्ज घेणे चांगले ठरू शकते. कर्ज मंजूर करण्यापूर्वी कर्जाची रक्कम तुमच्या गरजांसाठी पुरेशी आहे की नाही हे तपासणे आवश्यक आहे. तसेच कर्जाच्या अटी व शर्तीही काळजीपूर्वक वाचाव्यात. पूर्व-मंजूर कर्जे केवळ मर्यादित कालावधीसाठी दिली जातात. त्यामुळे निर्णय घेण्यास उशीर करू नका. तुम्हाला पैशांची गरज असल्यास आणि ते आरामात परतफेड करू शकत असल्यास तुम्ही आकर्षक व्याजदर आणि इतर लाभांसह पूर्व-मंजूर वैयक्तिक कर्ज ऑफर स्वीकारू शकता. योग्य परतफेडीचा कालावधी निवडा आणि पूर्व-मंजूर कर्ज स्वीकारण्यापूर्वी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे तुम्हाला समान करार मिळेल याची खात्री करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात