मुंबई : आपण मैत्रीखातर अनेक गोष्टी करण्यासाठी तयार होतो. बरेचदा आपल्या खिशातील पैसे काढून त्याला मदत करतो. त्याने ते परत दिले नाहीत तर मैत्रीखातर एकवेळ आपण त्याला सोडूनही देतो. मात्र मैत्रीमध्ये कितीही प्रेम असेल तरी एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी. त्यामुळे तुमचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं कसं ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. मैत्रीत किंवा नातेवाईकांमध्ये कुणीही जर तुम्हाला फोन करून सांगितलं की मी लोन घेत आहे आणि मला गॅरेंटर म्हणून तू राहशील का? अशावेळी उत्साहात येऊन तुम्ही गॅरेंटर म्हणून राहू नका. याचा तुम्हाला काहीवेळा मोठा फटकाही बसू शकतो. आपण कुणाला गॅरेंटर म्हणून राहायचं याचा निर्णय त्याची एकूण फायनान्स हिस्ट्री तपासूनच ठरवा. तो लोन भरू शकणार का आणि तो तुम्हाला अडकवणार तर नाही किंवा इतर सगळ्या गोष्टी तपासायला हव्यात. तुम्ही मित्र आहे मैत्रीण आहे किंवा भाऊ आहे म्हणून तिथे गॅरेंटर म्हणून जाल आणि तुम्हाला जर महत्त्वाचे नियम माहिती नसतील तर तुम्ही फसाल.
पॉलिसी होल्डरचा मृत्यू झाल्यावर कोण भरणार प्रीमियम? काय आहे LIC चं धोरणउदाहरण द्यायचं तर तुमच्या जवळच्या व्यक्तीनं पर्सनल लोन घेतलं. गॅरेंटरमध्ये तुमचं नाव लिहिलं. त्याने पैसे भरले नाहीत किंवा EMI थकवले तर तुमच्यासोबत काय काय होऊ शकतं याचा तुम्ही विचारही करू शकणार नाही. कारण याबद्दल फार माहिती देखील नसते. म्हणूनच अशा गोष्टींमध्ये मोठ्यांचा सल्ला घेणं आवश्यक असतं. जर लोन घेणाऱ्या व्यक्तीवर जर केस झाली तर त्यामध्ये तुमचंही नाव जाईल. त्या व्यक्तीनं जर पेमेंट वेळेवर केलं नाही तर तुमचा सिबिल स्कोअर खराब होऊ शकतो. काय माहिती पुढे जाऊन तुमच्यावरही लीगल कारवाई होऊ शकते. काहीवेळा गॅरेंटरच्या खात्यावरही कारवाई केली जाऊ शकते.
वयाच्या 20 व्या वर्षी ऋषी सुनक होते कोट्यधीश; पत्नीच्या नावे आहे एवढी संपत्तीआई-वडिलांसाठी किंवा कुटुंबातील सदस्यासाठी गॅरेंटर राहाणं वेगळं आहे. तिथे आई-वडिलांना हे सगळं माहिती असतं. पण नातेवाईक आणि मित्र-मैत्रिणींसाठी जर तुम्ही गॅरेंटर म्हणून राहात असाल तर तुम्हाला या गोष्टी सांभाळणं गरजेचं आहे. नाहीतर तुमचा सिबिल स्कोअर खराब झाला तर तुम्हाला लोन मिळताना प्रॉब्लेम होऊ शकतो.