Home /News /money /

LIC IPO चे वाटप कधी होणार? गुंतवणूकदारांना किती नफा होऊ शकतो? चेक करा डिटेल्स

LIC IPO चे वाटप कधी होणार? गुंतवणूकदारांना किती नफा होऊ शकतो? चेक करा डिटेल्स

LIC IPO चे सबस्क्रिप्शन 4 मे रोजी उघडले. इश्यूची किंमत 902-949 रुपये प्रति शेअर ठेवण्यात आली होती. यामध्ये पॉलिसीधारक आणि कर्मचाऱ्यांसाठी काही शेअर्स राखीव ठेवण्यासोबतच किमतीत सूट देण्यात आली.

    मुंबई, 10 मे : LIC च्या मेगा IPO मध्ये गुंतवणूक केलेले गुंतवणूकदार आता शेअर वाटपाची आतुरतेने वाट पाहत आहेत. सोमवार हा त्यावर बोली लावण्याचा शेवटचा दिवस होता आणि त्याला 2.95x सबस्क्रिप्शन मिळाले. अशा प्रकारे या मेगा IPO मधून सरकार सुमारे 21,000 कोटी रुपये उभे करू शकले. हा देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा IPO आहे. LIC च्या IPO अंतर्गत, 16,20,78,067 शेअर्स ऑफर करण्यात आले आणि गुंतवणूकदारांनी या शेअर्ससाठी 47,83,25,760 बोली लावल्या. एलआयसी पॉलिसीधारकांसाठी राखीव श्रेणीला सहा पटीने सबस्क्रिप्शन मिळाले, तर कर्मचाऱ्यांच्या हिस्सा 4.4 पट सबस्किप्शन मिळाले आहे. LIC च्या IPO ला क्वालिफाईड इन्स्टिट्यूशनल बायर (QIB) श्रेणीतील शेअर्सचे 2.83 पट सबस्क्रिप्शन मिळाले. या श्रेणीसाठी राखीव असलेल्या 3.95 कोटी शेअर्ससाठी 11.20 कोटी बोली लावण्यात आल्या. गैर-संस्थात्मक गुंतवणूकदार (NII) श्रेणी अंतर्गत, 2,96,48,427 शेअर्स ऑफर करण्यात आले ज्यासाठी 8,61,93,060 बोली लावल्या गेल्या. अशा प्रकारे NII श्रेणीला 2.91 पट सबस्क्रिप्शन मिळाले. किरकोळ वैयक्तिक गुंतवणूकदारांनी 6.9 कोटी शेअर्सच्या ऑफरच्या तुलनेत 13.77 कोटी शेअर्ससाठी बोली लावली. या विभागाला 1.99 पट सबस्क्रिप्शन मिळाले आहे. Bank Loan: आणखी दोन बँकानी कर्जाचे व्याजदर वाढवले; ग्राहकांवर किती अधिकचा भार वाढणार शेअर्सचे वाटप कधी होणार? LIC IPO चे सबस्क्रिप्शन 4 मे रोजी उघडले. इश्यूची किंमत 902-949 रुपये प्रति शेअर ठेवण्यात आली होती. यामध्ये पॉलिसीधारक आणि कर्मचाऱ्यांसाठी काही शेअर्स राखीव ठेवण्यासोबतच किमतीत सूट देण्यात आली. सोमवारी संध्याकाळी, DIPAM चे सचिव, तुहिन कांत पांडे यांनी सांगितले की, LIC IPO ला प्रत्येक श्रेणीतील गुंतवणूकदारांकडून मोठे यश मिळाले. या IPO मुळे अनेक नवीन डिमॅट खाती उघडण्यात आली. आता LIC IPO च्या शेअर्सचे वाटप 12 मे रोजी होणार आहे. शेअर मिळाले किंवा नाही कसे तपासायचे? तुम्ही शेअर वाटपाची स्थिती दोन प्रकारे तपासू शकता. तुम्ही NSE किंवा BSE च्या वेबसाइटला भेट देऊन शेअर वाटपाची स्थिती तपासू शकता. सर्वप्रथम तुम्हाला NSE च्या अधिकृत वेबसाइट https://www.nseindia.com/ ला भेट द्यावी लागेल. त्यानंतर इक्विटीचा पर्याय निवडा आणि ड्रॉपडाउनमध्ये LIC IPO चा पर्याय निवडा. यानंतर तुम्हाला तुमचा अर्ज क्रमांक आणि पॅन कार्डचा तपशील द्यावा लागेल. ही प्रक्रिया केल्यानंतर, व्हेरिफाय करा आणि सबमिट करा. अशा प्रकारे तुम्ही LIC IPO च्या शेअर वाटपाची स्थिती सहज तपासू शकता. कर्ज महागल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री, Car Loan चा EMI किती वाढणार? चेक करा डिटेल्स BSE वेबसाइटवरून सर्व प्रथम BSE च्या अधिकृत वेबसाइट https://www.bseindia.com/investors/appli_check.aspx वर क्लिक करा. मेनूमध्ये LIC IPO निवडा. LIC IPO साठी दिलेला तुमचा अर्ज क्रमांक एंटर करा. त्यानंतर तुमचा पॅन कार्ड क्रमांक टाका. 'I am not robot' वर क्लिक करा आणि कॅप्चा व्हेरिफाय करा. आता शेवटी 'सबमिट' बटणावर क्लिक करा. तुम्ही स्क्रीनवर LIC IPO अलॉटमेंट स्टेटस पाहू शकता. GPM वर स्थिती काय? LIC च्या IPO मध्ये, गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यातील शेअर्स 16 मे पर्यंत जमा केले जातील. LIC चे शेअर्स 17 मे रोजी शेअर मार्केटमध्ये लिस्ट होतील आणि त्यानंतर त्यामध्ये ट्रेडिंग सुरू होईल. ग्रे मार्केटमध्ये सोमवारी त्याचा प्रीमियम 36 रुपये होता, जो आधीच्या दिवसाच्या तुलनेत 24 रुपये कमी आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, एकेकाळी तो 92 रुपयांपर्यंत गेला होता, मात्र त्यानंतर सातत्याने घसरण होत राहिली. म्हणजेच, ग्रे मार्केटला ते 985 रुपयांवर लिस्ट होण्याची अपेक्षा आहे, जे त्याच्या वरच्या बँडपेक्षा सुमारे तीन टक्के जास्त आहे.
    Published by:Pravin Wakchoure
    First published:

    Tags: Investment, LIC, Money

    पुढील बातम्या