मुंबई, 6 जुलै : प्रवासादरम्यान सामान गाडीत विसरल्याचं अनेकांसोबत घडलं असेल. अनेक वेळा प्रवासी रेल्वेत प्रवास करताना प्रवासी मोबाईल, पर्स, लॅपटॉप, चार्जर किंवा सामानाची बॅग अशा काही वस्तू विसरतात. मात्र या सामनाचे पुढे काय होते? तर तुम्ही ट्रेनमध्ये विसरलेल्या तुमच्या मौल्यवान वस्तू परत मिळवू शकता. भारतीय रेल्वेच्या (Indian Railway) नियमांनुसार, ट्रेनमध्ये विसरलेल्या वस्तू त्याच्या हक्काच्या मालकापर्यंत पोहोचवण्याची संपूर्ण प्रक्रिया आहे.
रेल्वे आपला संपूर्ण प्रवास करुन जेव्हा सर्व प्रवासी ट्रेनमधून उतरतात, तेव्हा रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) अधिकाऱ्यासह स्टेशन कर्मचारी रिकामी ट्रेन तपासतात. या तपासणीमध्ये रेल्वेच्या सुरक्षेसोबतच कोणत्याही प्रवाशाचे महत्त्वाचे सामान ट्रेनमध्ये राहिले असेल तर ते दिसून येते.
ट्रेनमध्ये एखाद्या प्रवाशाचे सामान राहिल्यास आरपीएफचे जवान ते स्टेशन मास्टरकडे जमा करतात. यासोबतच ट्रेनमध्ये किंवा स्टेशनवर कोणताही क्लेम न केलेला किंवा बुक न केलेला माल आढळल्यास त्याची पावती बनवून स्टेशन मास्टरकडे जमा केली जाते.
डिझेल इंजिन ट्रेनसाठी किती इंधन खर्च होत असेल? एका लीटरमध्ये किती धावते माहितीये का?
रेल्वेत सापडलेल्या वस्तू आरपीएफ किंवा रेल्वे कर्मचारी हरवलेल्या मालमत्तेच्या नोंदवहीमध्ये टाकतात. येथे त्या वस्तूचे तपशील, म्हणजे वस्तूचे नाव, वजन, अंदाजे किंमत इत्यादी नोंदवले जातात. रेल्वे किंवा स्थानकावर कोणताही बॉक्स, ट्रंक, ब्रीफकेस आढळल्यास, रेल्वे संरक्षण दल किंवा रेल्वे पोलिसांच्या उपस्थितीत त्यामध्ये असलेल्या वस्तूंची यादी तयार केली जाते. या यादीच्या तीन कॉपी असतात. पहिली कॉपी सामानाच्या रजिस्टरमध्ये, दुसरी बॅगमध्ये आणि तिसरी प्रत रेल्वे संरक्षण दलाकडे ठेवली जाते. यानंतर बॉक्स सील केला जातो.
आपलं हरवलेलं सामान परत कसं मिळवायचं?
जर एखाद्या व्यक्तीने हरवलेलं सामान परत मिळवण्यासाठी संपर्क साधला आणि स्टेशन मास्टर त्याच्या दाव्यावर समाधानी असेल तर संबंधित वस्तू त्या व्यक्तीला दिली जाते. दावेदाराचा संपूर्ण पत्ता हरवलेल्या मालमत्तेच्या रजिस्टरमध्ये नोंदवला जातो. रेल्वेतून त्याचे सामान परत घेतल्यानंतर रजिस्टरमध्ये दावेदाराची सही देखील घेतली जाते.
PM Ujjwala Yojana: ‘या’ ग्राहकांना गॅस सिलिंडरवर पुन्हा मिळणार सबसिडी, फॉलो करा सोपी प्रोसेस
स्टेशन मास्तर नकार देऊ शकतात
स्टेशन मास्टरला संशय असल्यास, ते सामान देण्यास नकार देऊ शकतात. त्यानंतर हे प्रकरण विभागीय वाणिज्य अधीक्षकांकडे जाते. येथे दावेदार आणि मालाची कसून चौकशी केल्यानंतरच तुम्हाला तुमचा माल परत मिळू शकेल.
रेल्वेचा दुसरा नियम असा आहे की स्टेशन मास्टरने हरवलेली मालमत्ता त्याच्या हक्काच्या मालकापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कोणत्याही वस्तूवर नाव किंवा ओळख इत्यादी माहिती मिळाल्यावर ती त्याच्या हक्काच्या मालकापर्यंत पोहोचणे सोपे होते. काही दशकांपूर्वीपर्यंत, बॅग किंवा ब्रीफकेसच्या हँडलजवळ एक टॅग असायचा ज्यामध्ये लोक त्यांच्या व्हिजिटिंग कार्डचे नाव आणि पत्ता कागदावर लिहायचे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Indian railway, Railway