मराठी बातम्या /बातम्या /मनी /PM Ujjwala Yojana: ‘या’ ग्राहकांना गॅस सिलिंडरवर पुन्हा मिळणार सबसिडी, फॉलो करा सोपी प्रोसेस

PM Ujjwala Yojana: ‘या’ ग्राहकांना गॅस सिलिंडरवर पुन्हा मिळणार सबसिडी, फॉलो करा सोपी प्रोसेस

PM Ujjwala Yojana: ‘या’ ग्राहकांना गॅस सिलिंडरवर पुन्हा मिळणार सबसिडी, फॉलो करा सोपी प्रोसेस

PM Ujjwala Yojana: ‘या’ ग्राहकांना गॅस सिलिंडरवर पुन्हा मिळणार सबसिडी, फॉलो करा सोपी प्रोसेस

PM Ujjwala Yojana: लोकांना घरगुती गॅस सिलिंडरच्या सुविधेवर सबसिडीही (LPG Gas Subsidy) दिली जात होती, मात्र कोरोनामुळे ती बंद झाली आणि आता ती पुन्हा सुरू करण्यात आली आहे. परंतु आता ती सरसकट मिळणार नाही.

मुंबई, 5 जुलै : काही वर्षांपूर्वीपर्यंत, विशेषतः खेड्यापाड्यात लोक चुलीवर अन्न शिजवायचे. चुलीसाठी लागणारं इंधन म्हणजे जळण किंवा सरपण होय. जळणासाठी अर्थातच झाडं तोडावी लागतात. त्यामुळे पर्यावरणाची हानी तर झालीच, पण ज्या स्त्रिया चुलीवर स्वयंपाक करायच्या, त्यांनाही आरोग्यासह इतर अनेक अडचणींचा सामना करावा लागला. परंतु आता हे चित्र बऱ्यापैकी बदललं आहे. अलीकडच्या काळात चुलीवर अन्न शिजवल्याचं क्वचितच पाहायला मिळते. वास्तविक, याचे कारण म्हणजे लोकांच्या घरी एलपीजी गॅस (LPG Gas) आहेत. सरकारने खेडोपाडी पोहोचून लोकांना गॅस सिलिंडर (Gas cylinder) दिले आहेत. त्यांच्या वापरामुळे ना पर्यावरणाची हानी होत आहे, ना लोकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत आहे. लोकांना घरगुती गॅस सिलिंडरच्या सुविधेवर सबसिडीही (LPG Gas Subsidy)  दिली जात होती, मात्र कोरोनामुळे ती बंद झाली आणि आता ती पुन्हा सुरू करण्यात आली आहे. परंतु आता ती सर्वांनाच मिळणार नाही. चला तर मग आज आपण जाणून घेऊया की, ही सबसिडी कोणाला मिळेल आणि तुम्ही त्याचा फायदा कसा घेऊ शकता. चला तर मग जाणून घेऊया.

गॅस सिलिंडरवर सबसिडी कोणाला मिळते? (Who is getting the subsidy on Gas cylinder?)

गुरुवारी केंद्रीय पेट्रोलियम सचिव पंकज जैन (Pankaj Jain) यांनी माहिती दिली होती की, जून 2020 पासून एलपीजी गॅस सिलिंडरवर सबसिडी कोणालाही दिली जात नाही. तथापि, उज्ज्वला योजनेंतर्गत (PM Ujjwala Yojana) लाभ घेणाऱ्या ग्राहकांना 200 रुपये अनुदान दिले जात असल्याची माहिती त्यांनी दिली.

हेही वाचा- PM Awas Yojana: प्रधानमंत्री आवास योजनेची नवी यादी जाहीर, तुमचं नाव आहे की नाही? असं तपासा

गॅस सिलिंडरवरील अनुदानाचा फायदा कसा घ्यायचा? (How to take benefits of subsidy on Gas cylinder?)-

स्टेप 1- तुम्हाला गॅस सबसिडीचा लाभ घ्यायचा असेल, तर त्यासाठी तुम्ही उज्ज्वला गॅस योजनेचे लाभार्थी असायलं हवं. तुम्ही जर या योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्हाला तुमच्या गॅस एजन्सीकडे जावं लागेल.

स्टेप 2- तुम्हाला तुमची काही कागदपत्रे गॅस एजन्सीमध्ये जाऊन जमा करावी लागतील. उदाहरणार्थ, तुमचे गॅस पासबुक आणि याशिवाय तुम्हाला तुमच्या बँक खात्याची माहितीही येथे द्यावी लागेल.

स्टेप 3- यानंतर गॅस एजन्सी तुमच्या कागदपत्रांची पडताळणी करते आणि थेट तुमच्या बँक खात्यात सबसिडी देते. मात्र, सध्या उज्ज्वला योजनेशी संबंधित लोकांनाच या अनुदानाचा लाभ मिळत आहे.

First published:
top videos

    Tags: Gas, LPG Price, Subsidy